Breaking News

राजकारण

समसमान मत पडल्यास सरपंचांना मतदानाचा अधिकार : उपसरपंच निवडणुकीवर कोर्टाचा निर्णय

उपसरपंचाच्या निवडणुकीत पहिल्या फेरीत तसेच समसमान मते मिळाल्यास निर्णायक असा अतिरिक्त अधिकार सरपंचाला देणाऱ्या ग्रामविकास मंत्रालयाच्या परिपत्रकाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावली. न्या. मंगेश पाटील व न्या. संतोष चपळगावकर यांच्या खंडपीठासमक्ष सुनावणी झाली. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील नायगाव येथील ग्रामपंचायत सदस्य अविनाश श्रीराम राठोड यांनी तर औरंगाबाद तालुक्यातील कवडगाव ग्रामपंचायतचे सदस्य ज्ञानदेव रोडे, कविता भोजने, …

Read More »

400 कोटींच्या गौण खनिज घोटाळ्यात अडकणार एकनाथ खडसे? चौकशी सुरु

जळगावातील मुक्ताईनगर तालुक्यातील गौण खनिज घोटाळा प्रकरणी राज्य शासनाचे एटीएस पथक दाखल झाले आहे. चौकशीला प्रारंभ केला आहे. उत्खनन केलेल्या जागेचे मोजमाप करत आहे. हे पथक मुक्ताईनगरात दाखल झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तीन दिवस या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. या 400 कोटींच्या गौण खनिज घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मुक्ताईनगरचे आमदार …

Read More »

पंकजा मुंडेंना मोठा धक्का ; नड्डांच्या औरंगाबादमधील कार्यक्रमाचे निमंत्रणच नाही

2024 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे सोमवारी महाराष्ट्रात दाखल झाले. जे.पी. नड्डा यांच्या चंद्रपूर आणि औरंगाबाद दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र, जे.पी. नड्डा यांच्या या कार्यक्रमपासून भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना दूर ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. नुकत्याच बीड येथे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला पंकजा मुंडे …

Read More »

नागपुरातील जैन कलार समाजाच्या निवडणुकीत घोळ

जैन कलार समाजाच्या अलीकडेच झालेल्या निवडणुकीत मोठा घोळ झाल्याचा आरोप आपुलकी पॅनलचे अनिल तिडके यांनी पत्रकार परिषदेत केला.नागपूर धर्मादाय आयुक्त कार्यालयात यासंदर्भात तक्रार केल्याची माहिती तिडके यांनी दिली. काय आहे प्रकरण?👇👇👇 26 डिसेंबरला समाजाची निवडणूक झाली. 27 डिसेंबरला मतमोजणी अपेक्षित होती. मात्र, तसे न होता तीन दिवसांनंतरही संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडून निकाल घोषित करण्यात आलेला नाही. याच काळात घोटाळ्यांनी कूच केली. …

Read More »

नागपूर : रामटेकच्या ग्रामस्थांचा मनसेत प्रवेश,शेखर दूंडे यांच्या कामाचा धडाका

रामटेक लोकसभा व विधानसभा क्षेत्रातील देवलापार आदिवासी भागातील छवारी आणि छवारीटोला या गावातील ग्रामस्थांनी मनसेत प्रवेश केलाय. रामटेक तालुक्याचा विकास थांबला असून यास विद्यमान आमदार आणि खासदार जबाबदार आहेत, असा आरोप करीत अनेकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे व पक्षाचे रामटेक तालुका अध्यक्ष शेखर दुंडे यांच्यावर विश्वास दाखविला आहे. त्यांच्या बेधडक कार्यप्रणालीमुळे ग्रामस्थांचे सुटणारे प्रश्न लक्षात घेऊन, विद्यमान खासदार …

Read More »

… तर सत्तार यांच्यावर कारवाई : मुख्यमंत्री शिंदे यांचे संकेत

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अब्दुल सत्तार यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कडक शब्दात सुनावत नोटीस बजावली आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व माहिती घेत असून योग्य निर्णय घेऊ, असे नागपुरात सांगितले. काय आहे प्रकरण? राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना अब्दुल सत्तार हे महसूल राज्यमंत्री होते. यावेळी त्यांनी वाशिम येथील 37.19 एकर गायरान जमिनीचे अवैध …

Read More »

बाळासाहेब थोरात जखमी, नागपूरवरून उपचाराकरिता मुंबईला रवाना

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आज नागपुरात पहाटे मॉर्निंग वॉक करण्याकरिता गेले असता पाय घसरून पडले. यात त्यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे. हातात प्रचंड वेदना असलेल्या अवस्थेत त्यांना इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) येथे हलविण्यात आले. या ठिकाणी त्यांच्या सर्व तपासण्या झाल्या. यापूर्वी त्यांना हिवाळी अधिवेशनासाठी कर्तव्यावर असलेल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी तपासले होते. त्यांना पूढील उपचाराकरिता मुंबईला हलविण्यात …

Read More »

सत्तारांचे जमीन प्रकरण अधिवेशनात गाजणार : हरपूरमुळे शिंदे अडचणीत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नागपूर सुधार प्रन्यासच्या हरपूर भूखंड घोटाळ्याचे आरोप होत असताना, आता त्यांच्या सरकारमधील कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अब्दुल सत्तार यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कडक शब्दात सुनावत नोटीस बजावली आहे. या सर्व प्रकरणावरून आजपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात विरोधक सत्तार यांना घेरण्याच्या तयारीत आहेत. काय आहे प्रकरण? राज्यात महाविकास आघाडीचे सरकार …

Read More »

अब्दुल सत्तारांमुळे वैताग : कृषी प्रदर्शनासाठी अधिकाऱ्यांना कोटींचे ‘टार्गेट’?

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तारांकडून त्यांच्या मतदार संघात अर्थात सिल्लोड येथे कृषी महोत्सव आयोजित केला आहे. पण, यासाठी अधिकाऱ्यांना 15 कोटींचे लक्ष दिले असल्याची माहिती आहे. महोत्सवासाठी संपूर्ण कृषी खाते जणू कृषिमंत्र्यांच्या दावणीला बांधल्याचे चित्र आहे. राज्याच्या इतिहासात, आजवर असा अर्वाच्च भाषेत बोलणारा कृषीमंत्री कुणी झाला नसेल, असे वैतागलेले अधिकारी दबक्या आवाजात सांगतात. सिल्लोडमध्ये शासकीय निधीतून घेतलेल्या कृषी प्रदर्शनासाठी स्टॉल बुक …

Read More »

उद्धव ठाकरेंकडून दिशाभूल : हरपूर प्रकरणात शिंदेना बदनाम करण्याचा डाव, मोहन कारेमोरे यांचे फडणवीस यांना निवेदन

नागपूर सुधार प्रन्यासचे (नासुप्र) हरपूर येथील एकूण १६ भूखंड आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील व्यक्तींसाठी आरक्षित आहेत. तरीही ते गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमित करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकासमंत्री असताना घेतला होता, असा दावा विरोधकांनी केला. मात्र,जनतेला निव्वळ भ्रमित करण्याचा प्रकार उद्धव ठाकरेकडून सुरु आहे. यासंदर्भात अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी 26 मे 2020 रोजी …

Read More »