Breaking News

राजकारण

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना तहसिलदारांचा दणका

भाजपचे नेहमी चर्चेत असलेले आमदार गोपीचंद पडळकर आणि सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांना मिरज तहसीलदार दगडू कुंभार यांनी चांगलाच दणका दिला आहे. मिरजमधील वादग्रस्त जागेवर संबंधित मिळकतदारांचा हक्क देण्याचा आदेश तहसिलदारांनी मान्य केला आहे. तसेच ब्रम्हानंद पडळकर यांना या निकालाबाबत न्यायालयामध्ये दाद मागण्याचीही मुभा दिली आहे. प्रकरण काय? 7 जानेवारीला मध्यरात्री मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील …

Read More »

नारायण राणेंनी घातली शिवसेनेच्या महिला नेत्याशी हुज्जत

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे भाषण सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ उठून सभागृहातून बाहेर पडले. राणेंनी त्यांना अडवलं, त्याचवेळी भुजबळांनी त्यांना हात दाखवला. यावर राणे म्हणाले की, भुजबळांचं मला समर्थन आहे, म्हणूनच त्यांनी हात दाखवला. नारायण राणेंच्या औचित्यभंग करणाऱ्या भाषणामुळे टीकेचा सूर उमटत असताना ठाकरे शिवसेना गटाच्या नीलम गोऱ्हे यांनी विधानसभा सभापती नार्वेकर यांना भाषण थांबवायला सांगितले. यावर …

Read More »

जुनी पेंशन लागू करण्यास सकारात्मक : शिंदेची फडणवीस यांच्याशी विसंगत भूमिका

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांतील निवडणूक प्रचाराचा जोर शिगेला पोचला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी जुन्या निवृत्ती वेतन योजनेवर भर दिल्याने भाजप-शिंदे गटाची अडचण होत आहे. पार्श्वभूमीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसह शिक्षकांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे, अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली. जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात …

Read More »

सुनील केदारांची भाजपवर जुन्या पेन्शनवरून जोरदार टीका

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांमध्ये जोरदार प्रचार सुरु आहे. या निवडणुकीच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा जुनी पेन्शन योजना आहे. प्रत्येक उमेदवार हाच मुद्दा प्रामुख्याने उपस्थित करीत आहे. हाच धागा पकडून माजी क्रीडा मंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते सुनील केदार यांनी पेन्शन योजनेबाबत भाजप दुटप्पी धोरणावर टीका केली आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार सुधाकर अडबाले यांची प्रचारसभा …

Read More »

शिंदे गटाच्या आमदाराची शेतकऱ्याला शिवीगाळ

शिंदे गटाचे वादग्रस्त आमदार संजय गायकवाड नेहमी चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी थेट शिंदे गटावर नाराजी व्यक्त केल्याने ते पुन्हा ठाकरे गटात जाणार का यावर चर्चा रंगली होती. आमदार गायकवाड पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी एका शेतकऱ्याला शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यांनी शेतकऱ्याला शिवीगाळ केल्याची कबुलीही दिली. यावेळी गायकवाड म्हणाले की, मला मुंबई मंत्रालय येथून एक फोन …

Read More »

अनिल देशमुख घेणार नागपुरात फडणवीसांची भेट!

माजी गृहमंत्री अनिल देशमुख लवकरच नागपूरचा दौरा करणार असल्याचे कळते. “सध्या उच्च न्यायालयाने मुंबईबाहेर जाण्यास मनाई केलेली आहे. त्यामुळे या महिन्याच्या शेवटी कोर्टाची परवानगी घेऊन नागपूरमध्ये जाणार आहे. त्यावेळी मी विदर्भ तसेच माझ्या काटोल मतदारसंघाचा दौरा करणार आहे. कोर्टाची परवानगी घेऊन मी संपूर्ण महाराष्ट्रात तसेच विदर्भात पक्षाचे काम करेन,” अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली. शिंदे, फडणवीसांची घेणार भेट “मुख्यमंत्री …

Read More »

रेल्वेमंत्री दानवेंचे दुर्लक्ष!शेतजमीन संपादनाचा मुद्दा: पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प थंडबस्त्यात

पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचे भवितव्य तूर्तास अधांतरी आहे. रेल्वे मंत्रालयाने घेतलेल्या हरकतीनंतर प्रकल्प आहे तसाच पुढे सुरु ठेवणे अथवा रेल्वे मंत्रालयानुसार बदल करून पुन्हा नव्याने डीपीआर सादर करणे असे कोणतेही काम मागील 3 महिन्यांत झालेले नाही.मागील 3 महिन्यांपासून प्रकल्पाची फाईल दिल्लीत रेल्वे मंत्रालयात धूळ खात पडून आहे. संपादन आणि शेतकरी …

Read More »

पवारांमुळे मोठा ट्विस्ट : थोरातांना होती तांबेच्या बंडखोरीची कल्पना

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे मेव्हणे आमदार सुधीर तांबे यांनी बंडखोरी करत मुलगा सत्यजित तांबेला नाशिक पदवीधर निवडणुकीत उभं केलय. या बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात भूकंप आला. यावर काँग्रेसने जाहीर नाराजी व्यक्त करत आम्ही सत्यजित तांबे यांना मदत करणार नसल्याचे सांगितले. तांबेंच्या बंडखोरीवर अद्याप बाळासाहेब थोरात मौन बाळगून आहेत. यामुळे वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. काहीही …

Read More »

पटोले अडचणीत : नागपुरातून नानाविरोधात काँग्रेसच्याच दिग्गजांची ‘फिल्डिंग’!

✍️मोहन कारेमोरे शिक्षक मतदार संघाची निवडणूक जवळमोहन येत आहे. त्यादृष्टीकोनातून भाजप आणि काँग्रेसने कंबर कसली आहे. नागपूर विभाग शिक्षक मतदार संघात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे सुधाकर अडबाले यांना काँग्रेसने समर्थन जाहीर केले. मात्र, याविषयीची घोषणा माजी मंत्री विजय वडेट्टीवार, सुनील केदार यांच्या माध्यमातून करण्यात आली. बैठकीनंतर झालेल्या या घोषणेमुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने …

Read More »

‘जुनी पेन्शन’चा निर्णय विचारपूर्वक घेणार : फडणवीस

शासकीय सेवेत 2005 नंतर रुजू झालेल्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात निर्णय तडकाफडकी घेता येण्यासारखा नाही. हा निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल. दहा वर्षांत अडीच लाख कोटींवर हा खर्च जाणार आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात स्पष्ट केले. नागपूर शिक्षक मतदारसंघातील भाजप समर्थित उमेदवार नागो गाणार यांच्या प्रचारार्थ रेशीमबाग येथे आयोजित एका सभेत ते बोलत होते. खासदार कृपाल तुमाने, निवडणूक …

Read More »