विश्व भारत ऑनलाईन : काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोण विजयी होणार,याचा निर्णय बुधवारी होणार आहे. मतमोजणीसाठी पक्षाचे केंद्रीय निवडणूक प्राधिकरण सज्ज झाले आहे. या निवडणुकीत ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचे पारडे जड असून त्यांच्या विजयाची शक्यता व्यक्त केली जात आहे. या निवडणुकीत सोमवारी 96 टक्के मतदान झाले होते. खर्गे आणि शशी थरूर यांच्यात अध्यक्षपदासाठी सरळ लढत होत आहे. याकडे साऱ्या …
Read More »शिंदे-फडणवीसांमध्ये मतभेद? पोलीस बदली प्रकरण
विश्व भारत ऑनलाईन : पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात एकमत नसल्याची माहिती आहे. त्यामुळे पोलिस बदल्यांवरुन शिंदे-फडणवीसांमध्ये मतभेद झाल्याचे कळते. रविवारी पोलिस अधिकाऱ्यांच्या बदली मुद्यावर जवळपास दोन तास खलबत करुनही दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाले नसल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याची चर्चा आहे. रविवारी दिवसभरातील मुख्यमंत्री आणि …
Read More »सुनील केदार, राजेंद्र मुळक दगाबाज : वाचा कोणी केला आरोप?
विश्व भारत ऑनलाईन : नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेसचे अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडून आल्यानंतर मोठा वाद उफाळून आला आहे. काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य नाना कंभाले यांनी माजी मंत्री सुनील केदार हुकूमशाह आणि राजेंद्र मुळक दगाबाज असल्याचा आरोप रविभावन येथील पत्रकार परिषदेत केला. नेहमी आपल्या क्षेत्रातील सदस्याला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष करण्यासाठी केदार यांचे प्रयत्न असतात. मात्र, यावेळी आधी मदतीचे आश्वासन दिल्यानंतरही या दोन …
Read More »भाजप चिंतेत?: नागपूर जिल्हा परिषदेवर सुनील केदारांचे वर्चस्व
विश्व भारत ऑनलाईन : सर्वांचे लक्ष लागलेल्या नागपूर जिल्हा परिषदेत पुढील अडीच वर्षासाठी अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी सोमवारी झालेल्या निवडणूकीत माजी मंत्री सुनील केदार गटाच्या मुक्ता कोकर्डे या अध्यक्षपदी निवडून आल्या. भाजपलाही सुनील केदार यांचे वर्चस्व रोखण्यात यश आलेले नाही. परिणामी, भाजपसाठी ही बाब चिंतेची ठरली आहे. यातून सुनील केदारांची ग्रामीणमध्ये पकड किती मजबूत आहे याची प्रचिती आली. शिवाय केदारांना टाळून …
Read More »पुन्हा नागपुरात गडकरी, फडणवीस, बावनकुळे यांना धक्का, जिल्हा परिषदेत काँग्रेसने मारली अध्यक्ष, उपाध्यक्ष पदावर बाजी
विश्व भारत ऑनलाईन : नागपूर जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा काँग्रेसने गड कायम राखला आहे. काँग्रेसच्या सावनेर तालुक्यातील पाटणसावंगी येथील मुक्ता कोकरड़े नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष (मत प्राप्त 39) आणि काँग्रेसच्याच गोधणी येथील कुंदा राउत (मत प्राप्त 38)यांच्या गळ्यात उपाध्यक्ष पदाची माळ पडली. तर,भाजपच्या मदतीने उपाध्यक्ष पदासाठी उत्सुक असलेले काँग्रेसचे सदस्य नाना कंभाले यांना केवळ 15 मत मिळाली. त्यामुळे भाजपच्या नियोजनाला …
Read More »ग्रामपंचायत निकाल : दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
विश्व भारत ऑनलाईन : राज्यातील 18 जिल्ह्यातील 1 हजार 165 ग्रामपंचायतींपैकी 74 जागा बिनविरोध निवडून आल्यात. त्यामुळे रविवारी 1 हजार 79 जागांसाठी काल मतदान पार पडले. याच निवडणुकांचा आज निकाल लागणार आहे. तसेच सरपंचाची निवड थेट जनतेमधून होणार आहे.या निवडणुकीत दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला. यात नाना पटोले, विजयकुमार गावित, के.सी.पाडवी, उदय सामंत, राजन साळवी, भास्कर जाधव, रामदास कदम, परिणय फुके, …
Read More »दुर्लक्ष : ग्रामीण भागात रस्त्यांची दैना , 5 किलोमीटर ये-जा करनेही कठीण
विश्व भारत ऑनलाईन : सर्वच जिल्ह्यातील अनेक ग्रामीण रस्त्यांची देखभालही होत नाही. गावातील खराब रस्त्यांवर जर लोकप्रतिनिधींनी व प्रशासनाने नजर ठेवली तर कदाचित त्यांनाही नवसंजीवनी मिळू शकेल. परिसरातील अनेक रस्त्यात खड़े पडले आहेत. अनेक रस्ते पूर्ण उखडल्याने रस्त्यावर खड्डे निर्माण झाल्याने प्रवाशांना त्रास होत आहे. या मार्गावर डांबरीकरण करण्याची मागणी केली जात आहे. परंतु, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. गावातील रस्त्यांचे …
Read More »महाराष्ट्र : मंत्र्याचे ऑपरेशन करताना गेली लाईट आणि उडाला गोंधळ
विश्व भारत ऑनलाईन : औरंगाबादचे पालकमंत्री आणि रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरेंच्या दाताचे ऑपरेशन सुरु असतानाच अचानक लाईट गेली. यावेळी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी मोबाईलचा टॉर्च लावून भुमरे यांचे ऑपरेशन केले. मात्र, हॉस्पीटलमध्ये जनरेटरच नसल्याचा प्रकार भुमरे यांच्या निदर्शनास आला. यानंतर भुमरे यांनी फोनाफोनी करीत संताप व्यक्त केला. मंत्री झाल्यानंतर भुमरेंनी सरकारी दवाखाना काय हाल-हवालीत आहे हे पाहण्यासाठी दौरा केला. …
Read More »फडणवीसांना राज ठाकरेंचे पत्र : अंधेरी पोटनिवडणूकीत ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावे
विश्व भारत ऑनलाईन : अंधेरी पोटनिवडणुकीत मनसे भाजपला पाठिंबा देईल अशी शक्यता वर्तवली जात असतानाच राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या समर्थनार्थ थेट उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. अंधेरी पोटनिवडणूक भाजपने लढवू नये, ऋतुजा पटेल आमदार होतील हे महत्वाचे आहे, असे आवाहन राज ठाकरेंनी फडणवीसांना केले. आता फडणवीस यावर काय उत्तर देणार? …
Read More »इतके मंत्री असूनही औरंगाबादचा विकास का नाही?
विश्व भारत ऑनलाईन : केंद्रात औरंगाबादचे दोन केंद्रीय राज्यमंत्री, राज्याचे तीन कॅबिनेट मंत्री आणि एक विरोधी पक्षनेता असे सहा जण सरकारमध्ये आहेत. पण एवढी मंत्रिपदे मिळूनही जिल्ह्याचा विकास झाला नाही. तर या मंत्रिपदाचा काय उपयोग होईल, असा सूर पालकमंत्री, कृषिमंत्री, सहकारमंत्री आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांनी शनिवारी (१५ ऑक्टोबर) व्यक्त केला. आम्ही सर्वजण मिळून औरंगाबादच्या विकासासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन पालकमंत्री …
Read More »
विश्वभारत News Website