वर्धा लोकसभा क्षेत्रातील ग्रामीण रुग्णालयाला ऑक्सीजन कॉन्स्टेटर उपलब्ध करुन देण्याची केली मागणी. वर्धा: वर्धा लोकसभा मतदार संघातील पवनार जि. वर्धा हे गाव राष्ट्रीय महामार्गावर स्थित असुन या गावामध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 व राष्ट्रीय महामार्ग क्र. 353 आय या दोन राष्ट्रीय महामार्गाचा जंक्शन निर्माण झालेला आहे. वाढता वाहतुकीचा ओघ बघता या जंक्शनवर अनेक छोटे मोठे अपघात घडत असतात. भविष्यात या …
Read More »“त्या” फोटोप्रकरणी महापौर व आयुक्त यांनी स्वतःहुन भरला दंड
“त्या” फोटोप्रकरणी महापौर व आयुक्त यांनी स्वतःहुन भरला दंड चंद्रपूर, ता. १९ : चंद्रपूर महानगरपालिकेच्या आसरा कोव्हीड रुग्णालयाच्या उद्घाटनानंतर सामूहिक फोटो काढताना अनावधानाने कोव्हीड नियमांचे उल्लंघन झाले. याबाबत महापौर व आयुक्त यांनी दिलगिरी व्यक्त करीत, मास्क न घालता कोव्हीड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नियमानुसार ५०० रुपये दंड स्वतःहुन भरला तसेच सर्व पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे. मंगळवार दि. १८ …
Read More »फिटनेस हब जिमवर कारवाई; १५ हजारांचा दंड
फिटनेस हब जिमवर कारवाई; १५ हजारांचा दंड चंद्रपूर, ता. १९ : राज्य शासनाच्या निर्देशानुसार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, प्रतिष्ठाने, बाजारपेठ बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तरी सुद्धा शहरातील काही व्यावसायिक आपली प्रतिष्ठाने सुरु ठेवून कोरोना नियमांचे उल्लंघन करीत आहेत. अशा प्रतिष्ठानांवर मनपाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. बुधवारी (ता. १९) फिटनेस हब जिम येथे कारवाई करून १५ हजारांचा दंड …
Read More »जिल्ह्यात ‘काळया बुरशी’चा पहिला बळी
चंद्रपूर- कोरोना सोबत आता जिल्ह्यात काळया बुरशी आजाराने थैमान घातले असून, मंगळवारी रात्री एका 70 वर्षीय व्यक्तीचा यामुळे मृत्यू झाल्याची माहिती वैद्याकिय महाविद्यालयाचे नोडल अधिकारी डॉ. अक्षय काशटवार यांनी दिली. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये काळी बुरशी रोगाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. नाकाच्या आतल्या भागात वेगाने पसरणारी ही काळी बुरशी मृत्यूचे कारण ठरू शकते. चंद्रपूरात सध्या 50 रुग्ण आहेत. यासह राज्यात वाढणारे …
Read More »जागेच्या वादातून वडिलाची हत्या , पुरावा नष्ट करण्यासाठी रेल्वे रूळावर फेकला मृतदेह
राजुरा, एक एकर जागा विकल्याच्या कारणावरून मुलाने बंडीच्या उभारीने वडिलाची हत्या केली. हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी विरूर परिसरातील जंगल भागातील रेल्वे रूळावर मृतदेह फेकला. नात्याला काळीमा फासणारी ही घटना बुधवार, 19 मे रोजी राजुरा तालुक्यातील सिंधी या गावात उघडकीस आली. या घटनेचा अवघ्या दोन तासात छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. याप्रकरणी आरोपीस मुलास अटक करण्यात आली. तिरूपती …
Read More »तीन वेगवेगळ्या ठिकाणी वाघाने केला हल्ला
भद्रावती, जिल्ह्यात तेंदूपत्ता संकलन व शेतोपयोगी साहित्य आणण्यासाठी जंगलात गेलेल्या ग्रामस्थांवर तीन वेगवेगळ्या ठिकाणी वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात दोन महिलांचा आणि एका शेतकर्याचा मृत्यू झाला. या तिन्ही घटना बुधवार, 19 मे रोजी भद्रावती तालुक्यातील आयधुनिर्माणी जंगल परिसर, सिंदेवाही तालुक्यातील पेंढरी दिवाण तलाव परिसर तसेच सावली तालुक्यातील मंगर मेंढा परिसरात घडल्या. या वेगवेगळ्या घटनांत रजनी भालेराव चिकराम (रा. घोटनिंबाळा), सीताबाई …
Read More »परीक्षा शुल्क माफ करा, अन्यथा आंदोलन – अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा इशारा
चंद्रपूर, विद्यापीठाने उन्हाळी परीक्षा व महाविद्यालयीन शुल्क माफ करावे, अन्यथा आभासी पद्धतीने आंदोलन करू, असा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने दिला आहे. मागण्यांचे निवेदन विद्यापीठाच्या ई-मेल आयडीवर पाठविण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढले आहे. राज्यासह जिल्ह्यात टाळेबंदी लागू आहे. त्यामुळे पालकांच्या हाताला काम नाही. परिणामतः सर्वच घटकांतील लोकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या बिकट स्थितीत विद्यार्थ्यांकडून महाविद्यालय शुल्क …
Read More »गत 24 तासात 1160 कोरोनामुक्त, 370 पॉझिटिव्ह तर 26 मृत्यू
Ø आतापर्यंत 68,835 जणांची कोरोनावर मात, Ø ॲक्टीव पॉझिटिव्ह 8,373 चंद्रपूर, दि. 18 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 1160 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 370 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 26 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 78 हजार 509 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची …
Read More »पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर
चंद्रपूर दि. 18 मे: राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार दि.19 मे ते 21मे 2021 रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार दि. 19 मे 2021 रोजी सकाळी 9:00 वाजता कमलाई निवास, रामदासपेठ, नागपूर येथून ब्रह्मपुरीकडे प्रयाण करतील. सकाळी 11:00 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे आगमन …
Read More »बालकांची काळजी व संरक्षणासाठी टास्क फोर्स गठीत
कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांचे न्याय हक्क व यथायोग्य संगोपन होणार चंद्रपूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स गठीत करण्यात आली आहे. कोविड संसर्गामुळे ज्या बालकांनी पालक गमावले आहेत. त्यांना संरक्षण मिळावे तसेच ही बालके शोषणास बळी पडू नयेत अथवा अशी मुले तस्करी सारख्या गुन्ह्यामध्ये ओढली जाऊ नयेत, याची दक्षता जिल्हा …
Read More »
विश्वभारत News Website