Breaking News

नागपूर

रस्त्याच्या प्रकरणात सोयगाव तहसीलमध्ये विष घेण्याचा प्रयत्न

औरंगाबाद : कोणतीही सूचना व सुनावणीची नोटीस न देताच शेतातून बेकायदेशीर रस्ता दिल्याचा निकाल ऐकून ४५ वर्षीय महिलेने सोयगाव तहसील कार्यालयात कीटकनाशक प्राशन करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलीस पोहचले.गंभीर महिलेला तातडीने उपचारासाठी सोयगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.चंद्रकालाबाई पांडुरंग शिंदे (४५, रा. पळाशी, ता. सोयगाव)असे हृदयविकाराच्या झटका येऊन बेशुद्ध महिलेचे नाव आहे. प्रकरण असे… पळाशी शिवारात …

Read More »

रेल्वेत सराफा व्यापाऱ्यास लुटले

नागपूर : अमृतसर-नागपूर एक्स्प्रेसमधून तब्बल 52 लाखांच्या सोन्यावर चोरट्यानी हात साफ केले. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. लखविंदरसिंग (वय 49 ) यांचा अमृतसर येथे दागिन्यांचा मोठा व्यवसाय आहे.त्याचे 52 लाख 78 हजार रुपयांचे दागिने धावत्या रेल्वेतून चोरी झाले. हा व्यापारी नागपुरात उतरल्यावर बॅग तपासली असता त्याला धक्का बसला. ही घटना अमृतसर-नागपूर एक्स्प्रेसमध्ये सोमवारी पहाटे उघडकीस आली. अमृतसर-नागपूर एक्स्प्रेसच्या …

Read More »

गोंदियाऐवजी नागपुरातून सुटेल विदर्भ, महाराष्ट्र एक्सप्रेस

नागपूर : छत्तीसगडमधील राजनांदगाव ते कळमना रेल्वेमार्गाचे काम सुरू असल्याने काही दिवस नागपूरमार्गे अनेक गाड्या रद्द असणार आहेत. तर,विदर्भ एक्स्प्रेस सोमवारी नागपूरहून सुटेल आणि महाराष्ट्र एक्सप्रेस नागपूरपर्यंतच धावणार आहे.30 ऑगस्टपासून रेल्वेमार्गाचे काम सुरू असल्याने हावडा मार्गावरील अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. गोंदिया-सीएसएमटी विदर्भ एक्सप्रेस सोमवारी आणि गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस मंगळवारी गोंदिया ऐवजी नागपूरहून सुटेल. रद्द केलेल्या रेल्वे शालीमार-एलटीटी ज्ञानेश्वरी एक्सप्रेस, …

Read More »

‘पीडब्लूडी’त पदोन्नती कागदावरच

नागपूर : सार्वजनिक बांधकाम विभागातील (पीडब्लूडी) काही उपविभागीय अभियंत्यांची पदोन्नती हॊऊनही रुजू न झाल्याची माहिती आहे. त्यामुळे मागील तीन महिन्यापासून आपल्या आवडीच्या ठिकाणी पदस्थापना मिळावी, यासाठी या अभियंत्यांचा खटाटोप सुरु आहे. मागील जून मध्ये जवळपास संपूर्ण राज्यातून 15 उपविभागीय अभियंत्यांना कार्यकारी अभियंता पदावर महाविकास आघाडी सरकारच्या काळात पदोन्नती देण्यात आली होती. त्यापैकी 6 अभियंते नागपूर विभागातील आहेत. मात्र, आतापर्यंत कोणतेही …

Read More »

औरंगाबादेत ‘स्वाइन फ्लू’चा धोका!

औरंगाबाद : शहरात कोरोनानंतर आता स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. असे असताना मात्र महापालिकेने स्वाइन फ्लूसंदर्भात चाचण्या घेतल्याच नसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, स्वाइन फ्लू व कोरोना संसर्गाची लक्षणे सारखीच आहेत. याविषयी विचारणा करताच आता शनिवारपासून चाचण्या घेतल्या जातील, असे महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले. कोरोना पाठोपाठ राज्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने …

Read More »

जायकवाडी धरणाजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

  औरंगाबाद : जायकवाडी धरणाच्या मुख्य प्रवेशद्वारातून गुरुवारी २.५ फूट उंचावून पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. शुक्रवारी सायंकाळी आवक वाढल्याने यंदा पहिल्यांदाच २७ पैकी पाच आपत्कालीन दरवाजांसह २५ दरवाजे ४ फुटांनी उंचावून ७९ हजार १२४ क्युसेक विसर्ग गाेदावरीपात्रात सुरू आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जायकवाडीचा पाणीसाठा सध्या ९८.३५ टक्क्यांवर आहे. शुक्रवारी सकाळी धरणाचे १० ते २७ असे …

Read More »

नागपुरात ‘स्वाईन फ्लू’चे २० रुग्ण व्हेंटिलेटरवर

नागपूर : नागपुरात कोरोनाचा प्रकोप आटोक्यात आला, मात्र ‘स्वाईन फ्लू’ची दहशत वाढली आहे. पण प्रशासनाकडून नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना होत नसल्यामुळेच व्हेंटिलेटवरील रुग्णांची संख्या वाढत आहे. मागील २४ तासांत विविध रुग्णालयांत नवीन १७ स्वाइन फ्लूबाधितांची भर पडली आहे. विविध रुग्णालयात १६७ रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत, तर २० रुग्ण व्हेंटिलेटवर आहेत. महापालिकेच्या रुग्णालयात स्वाइन फ्लू बाधितावर उपचाराची यंत्रणा नाही. मेडिकल आणि मेयो, …

Read More »

पाऊस रुसलेलाच, बळीराजा चिंतेत औरंगाबाद जिल्ह्यात बाप्पाचे जल्लोषात आगमन

औरंगाबाद : जिल्ह्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र, जिल्ह्यात अजून ३९ टक्के तूट आहे.२४ जून रोजी ५१.२ मिमी तर ४ ऑगस्टला ४७.५ मिमी, ७ ऑगस्ट रोजी २२ मिमी, १५ ऑगस्ट रोजी १०.५ पाऊस पडला होता. त्यानंतर पावसाने दडी मारली होती.१ जून ते ३१ ऑगस्टपर्यंत एकूण ४८६.२ मिमी पावसाची नोंद आहे. आता परतीच्या पावसाला सुरुवात झाली, असे म्हणता येईल. मात्र …

Read More »

आज नागपूर, चंद्रपूरमध्ये जोरदार पावसाची शक्यता

नागपूर : नागपूर, चंद्रपूरसह काही जिल्ह्यात विजांसह काही ठिकाणी आज बुधवारी मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, पुणे, अहमदनगर,औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, यवतमाळ जिल्ह्यांचा समावेश आहे. मागील काही दिवसापासून पावसाने दडी मारली आहे.आता पुन्हा पाऊस धो-धो बरसेल, असे हवामान विभागाने सांगितले आहे. त्यामुळे …

Read More »

अधिकाऱ्यांच्या जंबो बदल्यांचा आठवडा! मोहन कारेमोरेंची पारदर्शकतेची मागणी

नागपूर : महसूल, परिवहन, वन, सिंचन, शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, गृह विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या या आठवड्यात होणार आहेत. मात्र, यात होणारा गैरव्यवहार थांबवावा, अशी मागणी अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी केली आहे. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात काम केल्यानंतरही काही सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांवर अन्याय झालेला आहे. काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीला एक-दोन वर्ष शिल्लक असूनही घराजवळ नोकरीचे स्वप्न …

Read More »