Breaking News

प्रशासन

नागपुरात संपामुळे 150 शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमूदत संप पुकारला आहे. आज संपाचा दुसरा दिवस आहे. तब्बल 18 लाख शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी कालपासून संपावर गेले आहेत. या संपाचा सर्वाधिक फटका रुग्णालयांना बसला असून संपामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. नागपूरात आरोग्य कर्मचारी संपावर असल्याने सर्वसामान्यांना फटका बसला आहे. नागपुरात संपामुळे 150 शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या आहेत. मेयो, मेडिकलमधील तपासण्यांना ब्रेक देण्यात आला आहे.

Read More »

संपातून माघार : आजपासून काही संघटना कामावर

जुनी पेन्शन योजना पूर्ववत करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही सकारात्मक असल्याने या संपातून माघार घेत असल्याची घोषणा राज्यातील प्राथमिक शिक्षकांची शिखर संघटना ‘महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने जाहीर केले.जुनी पेन्शन योजना राबविण्यासाठी सरकारला वेळ देण्यास संघाची तयारी असल्याचे प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संभाजी थोरात यांनी सांगितले. त्याचबरोबर आरोग्य संघटनांनीही या संपातून माघार घेत असल्याचे जाहीर केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री …

Read More »

‘पीडब्लूडी’च्या सचिव पदावर दशपुत्रे, तर मुख्य अभियंता म्हणून नंदनवार यांना पदोन्नती

सार्वजनिक बांधकाम विभागाचे (पीडब्लूडी) सचिव प्रशांत नवघरे यांचे अलीकडेच हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या जागेवर नागपूर विभागाचे मुख्य अभियंता दशपुत्रे यांची सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच नागपूर विभागात मुख्य अभियंता म्हणून दिनेश नंदनवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दशपुत्रे यांना सचिव आणि नंदनवार यांना मुख्य अभियंता पदावर पदोन्नती मिळाल्याने आनंद व्यक्त करण्यात येत आहे. कामाची पावती… सार्वजनिक बाधकाम विभागात …

Read More »

संपामुळे होणार ‘काम ठप्प’; जुन्या पेन्शनसाठी नागपुरातील संघटना आक्रमक

महसूल कर्मचारी संघटना,महाराष्ट्र राज्य महानगरपालिका, नगरपालिका-नगरपरिषद कर्मचारी संघटना फेडरेशनच्या वतीने 14 मार्चपासून पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बेमुदत संपाला नागपूर महापालिकेतील राष्ट्रीय नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉईज असोसिएशन (इंटक) व महाराष्ट्र जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेने पाठिंबा दर्शवला आहे. यांसदर्भात नागपूर मनपा प्रशासनाला संपाची नोटीस पाठवण्यात आली आहे. या संपात महापालिका व जिल्हा परिषदेतील सर्वच विभागातील कर्मचारी सहभागी होणार असल्याने दैनंदिन कामकाजावर परिणाम होण्याची …

Read More »

जुनी निवृत्तीवेतन योजना : मुख्य सचिवांच्या बैठकीवर कर्मचाऱ्यांचा बहिष्कार : संप

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या निवृत्तिवेतन योजनेसह अन्य मागण्यांसाठी सोमवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला असून मुख्य सचिवांनी तोडग्यासाठी सोमवारी बोलाविलेल्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय संघटनांनी घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक बोलविली, तरच पदाधिकारी बैठकीस जातील, असे महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे म्हणणे आहे. कर्मचारी संघटनांच्या ताठर भूमिकेमुळे राज्य सरकारपुढे पेच निर्माण झाला आहे. जुनी निवृत्तिवेतन …

Read More »

3 तलाठी लाच घेताना अटकेत : मंडळ अधिकाऱ्यांचा पैशांसाठी तलाठ्यावर दबाव?

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील पिशोर येथील महिला तलाठी लाच घेताना रंघेहाथ सापडली. तसेच एका दुसऱ्या प्रकरणात तलाठी कार्यालयात काम करणारा खासगी इसम सापडला. या घटना ताज्या असताना अकोल्यात एक तलाठी पुन्हा लाचलुचपत विभागाच्या कारवाईत अडकला. त्यामुळे पैसे घेण्यासाठी मंडळ अधिकाऱ्यांकडून दबाव असतो, असा सूर तलाठ्यांमध्ये दबक्या आवाजात आहे. अकोला प्रकरण काय आहे? शेतजमीनीचे हिस्सेवाटणी‎ करण्यासाठी चार हजारांची लाच‎ घेताना अकोल्यातील …

Read More »

जुनी पेन्शन योजना लागू केल्यास…फडणवीस यांचे मोठे विधान

राज्यातील शासकीय कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू करण्यावरून आक्रमक झाले आहेत. या योजनेबाबत आज विधानसभेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन केले. जुन्या पेन्शनसाठी आर्थिक तरतूद करावी लागेल. ही योजना लागू केल्यास 2030नंतर राज्यावर आर्थिक बोजा वाढेल, त्यामुळे ज्या राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे, त्यांचा अभ्यास आम्ही करत आहे. या प्रश्नावर चर्चेतून मार्ग काढू, संप नको, …

Read More »

शेतीवर अतिक्रमण : नकाशे होणार अद्ययावत

भारतीय सर्वेक्षण विभागातर्फे तब्बल 30 वर्षांनंतर महाराष्ट्रात ‘टोपोशीट’ बसविण्याचे काम खासगी कंपनीला देण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात तब्बल 556 टोपोशीट बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे नव्याने नकाशे तयार करण्यासाठी या टोपोशीटचा वापर होणार आहे. यासह राज्यात कोरस बसविण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येक रोअर बेस स्टेशनच्या परिघातील अक्षांश व रेखांश टाकल्यास जागेचा महसूल नकाशा मिळतो. या दोन्ही सुविधांमुळे राज्यातील शहर, जिल्हे, गावांचे …

Read More »

राज्य अर्थसंकल्पात तुम्हाला काय मिळाले? वाचा ठळक मुद्दे

राज्याचा अर्थसंकल्प ठळक मुद्दे अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित 1) शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी 2) महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास 3) भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास 4) रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा 5) पर्यावरणपूरक विकास अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित 1) शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी 2) महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास 3) …

Read More »

मंत्र्याची व्यथा व अश्रू : 7/12वर नाव लावण्यासाठी दिग्गज नेत्याचा संघर्ष

पतीच्या निधनाला 18 वर्ष झाली. पण यानंतर मलाही संघर्ष करावा लागला, असे माजी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या, यावेळी त्यांच्यासोबत घडलेल्या एका प्रसंगाबाबतची माहितीही त्यांनी दिली. ‘घरासाठीचे प्रॉपर्टी राईट्स आपण किती दिवसांपासून आणले आहेत. आपण नियम बनवले आहेत. 7/12 वर महिलांची नावं चढतात का? माझं उत्तर आहे नाही. मी दुसऱ्यांचं उदाहरण देणार नाही, मी माझं स्वत:चं उदाहरण तुम्हाला …

Read More »