Breaking News

प्रशासन

‘पीडब्लूडी’ला खड्डे दिसतील का? निव्वळ टोलवसुलीकडे लक्ष : व्यथा नागपूर-अमरावती रस्त्याची

नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत, काही ठिकाणी रस्तेही खराब झाले आहेत. या वर्दळीच्या मार्गावरील खड्डे तत्काळ दुरुस्त करावे, खड्डे असलेल्या मार्गावरील टोलवसुली बंद करावी, अशी मागणी नागरिक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (पीडब्लूडी)करीत आहेत. नागपूर-अमरावती महामार्गावर तीन टोल नाक्यावर वाहनांची गर्दी होत असल्याने वाहनधारकांचा वेळ वाया जातो. नाक्यावरील अनेक काउंटर्स बंद असतात. त्यामुळे रांगा लागतात व स्वयंचलित …

Read More »

खळबळ : तहसील कार्यालयात जप्त वाळूचे ट्रॅक्टर चोरीला

पैठण गोदावरी नदीतून वाळू तस्करी करताना जप्त केलेले ट्रॅक्टर तहसील कार्यालयातून अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली. महसूल विभागाकडून बुधवारी रात्री उशिरा चोरीला गेलेल्या ट्रॅक्टरची तक्रार पैठण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. त्यामुळे महसूल विभागाच्या कामकाजाचे पितळ उघडे पडले आहे. प्रकरण काय? पैठण गोदावरी नदीतून अवैधरित्या वाळू तस्करी करताना महसूल विभागाच्या औरंगाबाद पथकाने 12 जानेवारी रोजी रजनीकांत हिरालाल कटारिया (रा. …

Read More »

भाजप आमदाराची मंत्र्याविरोधात आयएएस अधिकाऱ्याकडे तक्रार

भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यात सारं काही सुरळीत सुरु आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचा विचार करताय. या दोन्ही पक्षात सर्व काही आलबेल नसल्याचं काही ठिकाणी पाहायला मिळत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील हा प्रकार आहे. जिल्हा वार्षिक योजना 2022-2023 अंतर्गत निधी वाटपात मोठा असमतोल झाल्याची तक्रार भाजपचे तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नियोजन विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली आहे. …

Read More »

वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी दिला वनरक्षकाचा बळी : अवैध वृक्षतोड प्रकरण

वन विकास महामंडळाच्या भिसी उपक्षेत्रातील जंगलात अवैध वृक्षतोड केल्याप्रकरणी वनरक्षक अमोल झलके यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबनानंतर त्यांचे चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड वनपरिक्षेत्र कार्यालयात स्थानांतरण करण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकारी मोकाट असून कनिष्ठ कर्मचाऱ्यावर कारवाई केल्याने संशय वाढला आहे.या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. चिमुर तालुक्यातील भिसी उपक्षेत्रातील नाला खोलीकरणाच्या नावाखाली वनरक्षक अमोल झलके यांनी महालगाव काळू वनविकास महामंडळातील जंगलात …

Read More »

‘जुन्या पेन्शन’साठी 14 मार्चपासून बेमुदत संप : राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा निर्णय

प्रलंबित जुनी पेन्शन योजनेची मागणी पुन्हा एकदा ऐरणीवर आली असून येत्या 14 मार्चपासून कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. नाशिक येथे रविवारी पार पडलेल्या राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या कार्यकारी मंडळाची महत्वाची बैठक नाशिक येथील नागरी सेवा प्रबोधिनी येथे पार पडली. या सभेत सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना …

Read More »

नागपुरात तलाठ्याने घेतली लाच : रेती तस्करीत मंडळ अधिकारी,2 तलाठी निलंबित

नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील रुयाड येथील तलाठी प्रफुल मानिकराव झाडे (वय 45) यास फेरफार करून देण्यासाठी 3 हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना फेरफारचे पैसे देण्यासाठी तलाठ्याने पैसे मागितल्याची चर्चा आहे. पुन्हा एकदा कनिष्ठ कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात आल्याने वरिष्ठ मोकाट राहत असल्याचे दिसून येते. मंडळ अधिकारी, तलाठी निलंबित तर, दुसरीकडे रेतीतस्करीत सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने यवतमाळ जिल्ह्यातील महागाव …

Read More »

‘जलयुक्त शिवार’ची कामे तातडीने सुरू करा-जिल्हाधिकारी पांडेय

जलयुक्त शिवार अभियानाबाबत तालुकानिहाय समिती स्थापन करावी. याबाबतची कामे सात दिवसांत सुरू करावे, अशा सूचना औरंगाबाद जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी दिल्या. समन्वयाने शिवार फेरीच्या माध्यमातून गावाचा जलआराखडा तयार करून जलयुक्त शिवार अभियानाचा दुसऱ्या टप्प्याची कामे सुरू करा, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी जलयुक्त शिवार अभियानाच्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. …

Read More »

बिअर बार मालकाकडून लाच : तिघे अटकेत

नाशकातील निफाड येथील बिअर बार मालकाकडून 9 हजारांची लाच घेताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या फिरत्या पथकातील कर्मचारी व अन्य दोघांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ अटक केली. हॉटेल व्यवसायात त्रुटी न काढण्यासाठी वार्षिक हप्ता म्हणून संबंधितांनी ही रक्कम मागितली होती. तक्रारदार व्यक्तीचा बार आणि रेस्टॉरंटचा व्यवसाय असून, त्याचे तीन ठिकाणी दुकाने आहेत. या तीनही दुकानांमधून हॉटेल व्यवसाय कामांमध्ये त्रुटी न काढता व्यवसाय …

Read More »

औरंगाबादमध्ये साडेआठ लाखांची लाच घेताना जलसंधारणचा अभियंता जाळ्यात

औरंगाबाद जिल्ह्यात महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंध विभागाने आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. औरंगाबादमध्ये एका बड्या सरकारी अधिकाऱ्याला तब्बल साडेआठ लाखांची लाच घेतना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. ऋषिकेश देशमुख असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. औरंगाबाद येथे जलसंधारण विभागात आठ लाख 53 हजारची लाच घेताना देशमुख यांना रंगेहात अटक करण्यात आली आहे. देशमुख हे वैजापूर जलसंधारण विभागात उपविभागीय अधिकारी म्हणून …

Read More »

विनंती बदल्या रखडल्याने तहसीलदार,पोलिसांमध्ये नाराजी

पदोन्नतीसाठी पात्र असतानाही पदोन्नत्या होत नसल्यामुळे राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांमध्ये ‘खदखद’ दिसते. पोलीस महासंचालक कार्यालय आणि गृहमंत्रालयात ताळमेळ नसल्याचा फटका पोलीस अधिकाऱ्यांना सोसावा लागत असल्याची भावना अनेक अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. तसेच महसूल विभागातील तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्या बदल्या अजूनही झालेल्या नाहीत. एक निवडणूक झाली की दुसरी डोके वर काढून तयार आहे. त्यामुळे सरकार मार्चनंतर बदल्या करणार की आता?असा प्रश्न सतावत आहे. …

Read More »