Breaking News

ऑरेंजसिटी

बालकांना परस्पर दत्तक देणे-घेणे वा खरेदी-विक्री करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा

बालकांना परस्पर दत्तक देणे-घेणे वा खरेदी-विक्री करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा अनाथ बालकांच्या असहाय्यतेचा फायदा घेणाऱ्यांवर होणार कठोर कार्यवाही चंद्रपूर, दि.11 मे :  कोरोनामुळे दोन्ही पालक गमवावे लागलेल्या बालकांना बेकायदेशीररित्या दत्तक घेऊन त्यांची विक्री करण्याचे प्रयत्न होत असल्याचे समाज माध्यमांवर पोस्ट दिसून येत आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी व त्या थांबवण्यासाठी त्याबाबतची माहिती मिळाल्यास चाइल्ड लाइन हेल्पलाईन क्रमांक 1098 वर संपर्क …

Read More »

विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची अॅटींजेन तपासणी मोहीम

विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची अॅटींजेन तपासणी मोहीम तपासणी मोहिमेत एकुण 7 व्यक्तीचा अहवाल सकारात्मक चंद्रपूर, दि.11 मे: कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी व एखाद्या बाधिताकडून इतर कुणालाही कोरोनाची लागण होऊ नये तसेच संचारबंदीत विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर चाप बसावा म्हणून रस्त्यावरच अँटीजेन तपासणी करण्याची मोहीम  जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊनप्रमाणे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. बंदच्या काळात …

Read More »

शहरातील मोठ्या व्यापाऱ्यांविरुद्ध उपायुक्त विशाल वाघ, उपायुक्त अशोक गराटे यांनी केली कारवाई,नियमभंग केल्याप्रकरणी 46 हजारांचा दंड वसूल

शहरातील मोठ्या व्यापाऱ्यांविरुद्ध उपायुक्त विशाल वाघ, उपायुक्त अशोक गराटे यांनी केली कारवाई नियमभंग केल्याप्रकरणी 46 हजारांचा दंड वसूल चंद्रपूर, ता. ११ : राज्य शासनाच्या निर्देशानुसार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, प्रतिष्ठाने, बाजारपेठा दुपारी ११ नंतर बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तरी सुद्धा शहरातील काही व्यावसायिक आपली प्रतिष्ठाने सुरु ठेवून कोरोना नियमांचे उल्लंघन करीत आहेत. अशा प्रतिष्ठानांवर मनपाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात …

Read More »

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत माहे, मे 2021 करिता नियंत्रित शिधाजिन्नसांचे मोफत वितरण

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत माहे, मे 2021 करिता नियंत्रित शिधाजिन्नसांचे मोफत वितरण चंद्रपूर दि.12 मे :बल्लारपूर तालुका शिधापत्रिका क्षेत्रात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत माहे, मे 2021 करिता कौटुंबिक शिधापत्रिकेवर देय असलेल्या नियंत्रित शिधाजिन्नसांचे परिमाण व दर निश्चित करण्यात आले असून राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे नियमित गहू व तांदूळ मोफत मिळणार आहे. तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना गहू …

Read More »

कोविड रुग्णांसाठी 200 ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर तातडीने उपलब्ध कोविड रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करणार- ना.विजय वडेट्टीवार

कोविड रुग्णांसाठी 200 ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर तातडीने उपलब्ध कोविड रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करणार- ना.विजय वडेट्टीवार चंद्रपूर,दि. 12 मे : चंद्रपुर जिल्ह्यातील कोविड रुग्णांची प्रकृती ऑक्सीजन अभावी गंभीर होत असल्याचे बघून  राज्याचे  आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी वेळोवेळी लक्ष घालून संबंधितांसोबत संपर्क साधून तातडीने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पुरवठा करण्याचे सांगितले. त्यांच्या प्रयत्नाला यश …

Read More »

रमजान ईद-2021 अत्यंत साधेपणाने साजरी करा –  जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

रमजान ईद-2021 अत्यंत साधेपणाने साजरी करा–  जिल्हाधिकारी अजय गुल्हाने रमजान ईद-2021 च्या मार्गदर्शक सूचना जाहीर चंद्रपूर,दि.11 मे: सध्या कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेली अतिसंसर्गजन्य परिस्थिती व वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा विचार करता पवित्र रमजान ईद अत्यंत साधेपणाने व शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे  पालन करत साजरी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.  महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महसूल व …

Read More »

शेतकऱ्यांसाठी कृषी पास सवलत देण्याची व्यवस्था करा – आमदार देवरावजी होळी

शेतकऱ्यांसाठी कृषी पास सवलत देण्याची व्यवस्था करा – आमदार देवरावजी होळी जिल्हा बंदीमुळे अनेक शेतकऱ्यांना आपल्या जिल्ह्याबाहेरील शेतीवर जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली असल्याने शेतकऱ्यांची मागणी वैनगंगा नदीकाठावर जिल्ह्यातील अनेकांची शेती मात्र जिल्हाबंदिमुळे अडचण गडचिरोली- शेतीच्या हंगामाला सुरुवात होत असून गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याला जोडणाऱ्या वैनगंगा नदीच्या या-त्या काठावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची शेती असून जिल्हाबंदी मुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतीवर जाण्यास अडचण …

Read More »

बल्लारपुरात 100 खाटांचे कोरोना उपचार केंद्र लोकार्पित- मुनगंटीवारांच्या आमदार निधीतून दोन रूग्णवाहिका

बल्लारपुरात 100 खाटांचे कोरोना उपचार केंद्र लोकार्पित   – मुनगंटीवारांच्या आमदार निधीतून दोन रूग्णवाहिका चंद्रपूर, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्यादृष्टीने रूग्णांना उत्तम आरोग्य सुविधा पुरविणे ही प्राथमिकता असून, बल्लारपूर शहरानजिक भिवकुंड विसापूर येथील सामाजिक न्याय विभागाच्या इमारतीत 100 खाटांचे कोरोना उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे. लवकरच बल्लारपूर तालुका क्रिडा संकुलात 100 खाटांचे डीसीएचसी रूग्णालय सुरू होईल. यात 70 सध्या खाटा, …

Read More »

पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस तात्काळ द्या – खा. बाळू धानोरकर यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस तात्काळ द्या   – खा. बाळू धानोरकर यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी चंद्रपूर, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असून, मृत्यूचे प्रमाणदेखील वाढत आहे. या प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी लस हाच एकमात्र पर्याय आहे. लसीच्या पहिला डोस अनेक नागरिकांनी घेतला आहे. परंतु, दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेक दिवस सकाळी 5 वाजता रांगेत लागून …

Read More »

पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली

पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली पुणे- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 23 मे रोजी ही परीक्षा होणार होती. यापूर्वी 25 एप्रिल रोजी होणारी परीक्षा कोरोनाच्या संसर्गामुळे 23 मे रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कायम असल्याने शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पाचवी आणि …

Read More »