Breaking News

क्राईम

संत्रापेटीत ड्रग्ज,नवी मुंबईत कारवाई

विश्व भारत ऑनलाईन : केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) शनिवारी नवी मुंबईत मोठी कारवाई केली. डीआरआयने शनिवारी १९८ किलो ‘हाय प्युरिटी’ क्रिस्टल मेथॅम्फेटामाइन (बर्फ) आणि 1,476 कोटी रुपये किमतीचे 9 किलो ‘हाय प्युरिटी’ कोकेन जप्त केले. हे ड्रग्ज संत्र्याच्या पेटीत लपवून तस्करीसाठी आणण्यात आले होते. याप्रकरणी डीआरआयने आयातदाराला अटक केली आहे. तसेच रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या वित्तसंस्थेसह कस्टम हाउस एजंट आणि …

Read More »

वन कर्मचाऱ्यावर चंदन तस्करांचा गोळीबार

विश्व भारत ऑनलाईन : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावजवळील पाटणा जंगलात चंदनाच्या वृक्षांची कत्तल करणाऱ्या टोळीला पकडण्यासाठी गेलेल्या वन कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याची घटना घडली. तस्करांनी वन कर्मचाऱ्यांच्या अंगावर कुऱ्हाड मारुन फेकत गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार केला व तेथून पळ काढला. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटणा जंगलात चंदनाची झाडे तोडणाऱ्या टोळीला हटकणाऱ्या वन विभागाच्या …

Read More »

धक्कादायक : दोर तुटला आणि ‘ती’ बचावली.. वाचा कुठे घडली घटना

सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी विवाहितेला फासावर लटकवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा येथे हा प्रकार उघडकीस आला.नशीब बलवत्तर होते म्हणून फाशीचा दोर तुटल्याने विवाहिता बचावली.मागच्या दाराने पळ काढत तिने कसेबसे बसस्थानक गाठत आपला जीव वाचला. तिने बहिणीला आपबिती सांगितल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली. यावरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांनी सासू, सासरे व दीर वेगळे राहू …

Read More »

औरंगाबाद : अधिकाऱ्याचे अपहरण, आरोपी अटकेत

विश्व भारत ऑनलाईन : औरंगाबाद जिल्ह्यातील इब्राहिमपूर या गावातून शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास राज्याच्या उद्योग मंत्रालयातील निवृत्त अधिकारी विश्वनाथ लक्ष्मण राजळे (६०) यांचे 4 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले. औरंगाबाद ग्रामीणच्या पोलिस पथकाने बदनापूर तालुक्यातील दावलवाडी शिवारातील एका पेट्रोल पंपावर रात्री ९ वाजेच्या सुमारास राजळे यांची सुटका करून सहा संशयित आरोपींना ताब्यात घेतले. विकास भगवान खरात(२२), पांडुरंग विष्णू …

Read More »

जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरी लावून देण्याचे आमिष… वाचा

विश्व भारत डेस्क : बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीचं आमिष दाखवत तिघांना लाखोंचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तिघांकडून तब्बल १८ लाख ५० हजार रूपये उकळले. पैशांच्या फसवणुकीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये आर्वीतील एका, चंद्रपुरामधील दोन आणि अमरावतीच्या एका आरोपीचा समावेश आहे. माहितीनुसार,आर्वी येथील नरसिंग सारसर या व्यक्तीने आर्वी येथीलच रितेश राजेश …

Read More »

नागपुरातील सक्करदरा उड्डाण पुलावर भीषण अपघात, दोन चिमुरड्यासह चौघे ठार

  नागपूर : शहरातील सक्करदरा परिसरात शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दुचाकीवरून जाणारे चौघे जण सुमारे 70 ते 80 फूट उंच फ्लायओवरवरून खाली फेकले गेल्याने चौघांचा मृत्यू झाला. माहितीनुसार, मृतांमध्ये 2 चिमुरड्यांचाही समावेश आहे. सक्करदरा परिसरात रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास फ्लायओवरवर गर्दीतून जाताना अनियंत्रित चारचाकी कारने दोन दुचाकींना जोरात धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरील चौघे …

Read More »

अप्पर जिल्हाधिकारी हत्याकांडातील आरोपींना जन्मठेप

नाशिक : अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे जळीत हत्याकांडचा तब्बल अकरा वर्षानंतर निकाल लागला आहे. मालेगाव अप्पर जिल्हा सत्र न्यायलयाने तिन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. 25 जानेवारी 2011 साली इंधन माफियानी जिल्हाधिकारी यांची इंधन टाकून हत्या केली होती. शिक्षेचे स्वरूप या घटनेतील मुख्य आरोपी पोपट शिंदे याचा पूर्वीच मृत्यू झाला. तर,यातील अल्पवयीन आरोपीवर बालन्यायालयात खटला सुरू असून उर्वरित उरलेल्या तिघांना …

Read More »

रस्त्याच्या प्रकरणात सोयगाव तहसीलमध्ये विष घेण्याचा प्रयत्न

औरंगाबाद : कोणतीही सूचना व सुनावणीची नोटीस न देताच शेतातून बेकायदेशीर रस्ता दिल्याचा निकाल ऐकून ४५ वर्षीय महिलेने सोयगाव तहसील कार्यालयात कीटकनाशक प्राशन करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलीस पोहचले.गंभीर महिलेला तातडीने उपचारासाठी सोयगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.चंद्रकालाबाई पांडुरंग शिंदे (४५, रा. पळाशी, ता. सोयगाव)असे हृदयविकाराच्या झटका येऊन बेशुद्ध महिलेचे नाव आहे. प्रकरण असे… पळाशी शिवारात …

Read More »

रेल्वेत सराफा व्यापाऱ्यास लुटले

नागपूर : अमृतसर-नागपूर एक्स्प्रेसमधून तब्बल 52 लाखांच्या सोन्यावर चोरट्यानी हात साफ केले. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. लखविंदरसिंग (वय 49 ) यांचा अमृतसर येथे दागिन्यांचा मोठा व्यवसाय आहे.त्याचे 52 लाख 78 हजार रुपयांचे दागिने धावत्या रेल्वेतून चोरी झाले. हा व्यापारी नागपुरात उतरल्यावर बॅग तपासली असता त्याला धक्का बसला. ही घटना अमृतसर-नागपूर एक्स्प्रेसमध्ये सोमवारी पहाटे उघडकीस आली. अमृतसर-नागपूर एक्स्प्रेसच्या …

Read More »

ऊसतोड मुकदमाचे अडीच लाख पळविले

औरंगाबाद : बँकेतून काढलेले पैसे पिशवीत ठेवून मोटरसायकलच्या डिक्कीत ठेवणे ऊसतोड मुकदमास चांगलेच महागात पडले आहे. ही घटना कन्नड तालुक्यातील पिशोर येथे घडली. पिशोर येथील बस स्टॅन्ड समोर गाडी उभी करून लघुशंकेवरून येण्याच्या वेळेत चोरट्यानी पैशाची पिशवी पळविल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. पिशोर नाक्यावरील एका खासगी बँकेतून अडीच लाख रुपये दशरथ राठोड व नारायण राठोड यांनी काढले. त्यांनतर ते लघुशंकेसाठी …

Read More »