Breaking News

क्राईम

खऱ्हा न मिळाल्याने आरोपीने फोडले डोके : नागपुरमधील न्यायालयातील प्रकार

खऱ्हा न मिळाल्याने नागपूर जिल्हा न्यायालयात आरोपीने स्वतःचे फरशीवर डोके फोडले. सागर बोरधरे असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर हत्येचा आरोप आहे. त्याच प्रकरणात जिल्हा न्यायालयात सध्या खटला सुरु आहे. तो नागपूर कारागृहात कच्चा कैदी म्हणून आहे. त्याची शुक्रवारी जिल्हा न्यायालयात हजेरी होती. त्यावेळी त्याला न्यायालयात खालच्या मजल्यावर ठेवण्यात आले होते. कुणालातरी त्याने खऱ्हा मागितला. मात्र, त्याला खऱ्हा मिळाला नाही. अखेर …

Read More »

जमिनीच्या वादातून महिला नायब तहसीलदारास मारहाण

बीड जिल्ह्यातील केजच्या नायब तहसीलदार आशा वाघ-गायकवाड यांच्यावर अज्ञात व्यक्तीने ज्वलनशील पदार्थ टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. प्राप्त माहितीनुसार, शुक्रवार, दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास केज तहसीलच्या संजय गांधी विभागाच्या नायब तहसीलदार आशा वाघ-गायकवाड त्यांच्या घरी दुपारचे जेवण करून तहसील कार्यालयाकडे येत होत्‍या. यावेळी त्यांना एका कारमधून त्यांच्या भावाची बायको सुरेखा मधुकर वाघ व सुरेखा यांचा भाऊ हरिदार भास्कर महाले व …

Read More »

पार्किंगच्या वादात नागपुरात तरुणाचा खून

घरासमोर वाहन पार्क केल्याने दोन गटात वाद विकोपाला गेला. यात झालेल्या हाणामारीत एका तरुणाचा खून झाला. ही घटना नागपुरातील यशोधरानगर परिसरात घडली. घटनेत दोघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या युवकाचे नाव योगेश धामने (वय 19) असे आहे.तो इंदिरा गांधीनगर परिसरातील रहिवासी होता. या घटनेत रामभाऊ शाहू व मोनू असे दोघे जण …

Read More »

शिवसेनेच्या दिग्गज नेत्याचा अपघात

शिवसेनेचे दिग्गज नेते आणि माजी आरोग्‍य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या कारला अपघात झाला. शुक्रवार,सकाळी 11.40 वाजता मुंबई-अहमदाबाद महामार्गावर काशी मिरा परिसरातील सगणाई नाका येथे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या गाडीला डंपरने मागच्या बाजूने धडक दिली. सावंत हे या अपघातात जखमी झाले आहेत. वाहतूक पोलिसांनी त्यांना तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. त्यानंतर सावंत हे स्वतः रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल …

Read More »

300 एकर जमिनीची परस्पर विक्री, आरएफओ-वनपाल निलंबित

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. 300 एकर शेतजमिनीचा परस्पर सौदा वनविभागाने केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. यात वनपरीक्षेत्र अधिकारी, वनपाल यांना नाशिक उपवनसंरक्षक वावरे यांनी निलंबित केले आहे.तसेच सखोल चौकशी करण्याची विनंती जिल्हाधिकारी नाशिक यांना वनविभागाने केली आहे. नांदगाव तालुक्यातील भादुरी वनपरी मंडळातील मौजे डॉक्टरवाडी येथील 300 एकर जमीन (119 हेक्टर) आहे.

Read More »

‘भ्रष्टाचार’ तपासासाठी माजी कर्मचाऱ्यांची नेमणूक करू नये

भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचा तपास करणे हे मोठे क्लिष्ट काम आहे. अशा महत्वाच्या प्रकरणासाठी माजी कर्मचाऱ्यांची नेमणूक करू नये,असे निर्देश केंद्रीय दक्षता आयोगाने सार्वजनिक क्षेत्रातील बँक, विमा कंपन्या तसेच सरकारी विभागांना दिले आहेत. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा तपास करण्यासाठी माजी कर्मचारी नेमले जाऊ नयेत, असे आदेश दोन दशकांआधी दिले होते. काही संस्थांमध्ये तपासासाठी माजी कर्मचारी नेमले जाण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे हे निर्देश दिले …

Read More »

महिला पोलीस जागीच ठार : दुचाकीची बैलगाडीला धडक

रस्त्यांच्या देखभाल – दुरुस्तीसाठी नवे पायाभूत सुविधा विकास महामंडळ; आणखी एका महामंडळाची भर, रस्त्यांवरील खड्डे जाणार का ?

जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे दुचाकीची बैलगाडीला धडक बसून झालेल्‍या अपघातात महिला पोलिस जागीच ठार झाली. सुनीता ईश्वरसिंग ढोबाळ असे त्‍यांचे नाव आहे. या दुर्घटनेत त्‍यांचा मुलगा जखमी झाला आहे. ही दुर्घटना भोकरदन रोडवरील राजूरजवळच्या ठाकूरद्वार हॉटेलसमोर रविवारी सकाळी घडली. सुनीता ढोबाळ आज सकाळी आपल्‍या मुलासह दुचाकीवरून भोकरदन तालुक्यातील इब्राहिमपूर या मूळगावी जात होत्‍या. राजूरजवळ त्‍यांची दुचाकी बैलगाडीला धडकली. सुनीता ढोबाळ …

Read More »

गडचिरोलीतही शिक्षक भरती घोटाळ्याची पाळेमुळे : चौकशी थंडबस्त्यात

राज्यात 2012 नंतर शिक्षक भरतीवर बंदी आहे. त्यानंतरही काही शिक्षण अधिकाऱ्यांनी बनावट मान्यतेवर अनेक शिक्षण संस्थांना शिक्षक भरतीची परवानगी दिली होती. या प्रकरणाची पाळेमुळे मुंबई ते गडचिरोलीपर्यंत असून वरिष्ठांच्या आशीर्वादाने विभागीय चौकशी थंडबस्त्यात ठेवल्याचे चित्र आहे. अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन झाल्याशिवाय खासगी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये नवीन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येऊ नये, असा निर्णय घेण्यात आला होता. …

Read More »

नागपुरात गडकरींना धमकी : 100 कोटी द्या, अन्यथा बॉम्बस्फोट

१०० कोटी द्या…अन्यथा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी आणि जनसंपर्क कार्यालयात बॉम्बस्फोट करू, अशी धमकी देणारा फोन शनिवारी आला. हा फोन कर्नाटक राज्यातून आला असून ती धमकी कुख्यात डॉन दाऊन इब्राहिमच्या नावावर मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली. नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील जनसंपर्क कार्यालयात शनिवारी साडेअकरा ते साडेबारा वाजतादरम्यान सलग तीन धमकीचे फोन आले. त्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ …

Read More »

पुण्यात घेतली फोन-पेवरून लाच : उद्योग निरीक्षकाला अटक

जिल्हा उद्योग केंद्रातील एका निरीक्षकाने चक्क फोन पे-द्वारे हजार रुपयांची लाच घेतली. त्यानंतर शुक्रवारी त्याला दोन हजार रुपयांची लाच घेताना कार्यालयातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. चंद्रभान परशुराम गोहाड (वय.57) असे लाचखोर उद्योग निरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी गोहाड याच्या विरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 26 वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. प्रकरण काय आहे? फिर्यादी …

Read More »