Breaking News

क्राईम

गरम पाण्यात पडून चिमुकलीचा मृत्यू : औरंगाबादतील घटना

औरंगाबादमध्ये गरम पाण्यात पडून चार वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जिल्ह्यातील वाळूज परिसरात ही घटना आहे. घटनेनंतर चिमुरडीवर रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालाय. श्रेया असं मृत लहानगीचं नाव आहे. माहितीनुसार, श्रेया जेवन झाल्यानंतर हात धुण्यासाठी गेली. मात्र तेथे पाय घसरुन ती खाली पडली. त्याठिकाणी बादलीत हीटरच्या साह्याने पाणी केलं होतं. हीटरने गरम झालेल्या पाणी अंगावर …

Read More »

नाशिक : सागवनाची कत्तल

नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील चिखली गावाजवळ वनविभागाने सव्वा लाख किमतीचे सागवान लाकूड जप्त केले. चिखली गावानजीक वनविभागाच्या कंपार्टमेंटमध्ये मौल्यवान सागाच्या झाडांची कत्तल करुन ते गुजरात राज्यात विक्री करण्याची तयारी असल्याचे कळते.तसेच यासंदर्भात वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती वनविभाग प्रादेशिकच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानुसार पथकाने बुधवार दि.(२३) रोजी मध्यरात्री सापळा रचला. सव्वा लाखाचा माल जप्त सागवान झाडांची कत्तल करुन ठेवलेले …

Read More »

अमरावतीत १५ वर्षीय मुलाच्या चेहऱ्यात घुसला बाण

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहरातील शासकीय क्रीडांगण परिसरात पंधरा वर्षातील मुलाच्या चेहऱ्यात बाण घुसल्याची घटना घडली आहे. वेदांत गणेशराव डहाले असे जखमी मुलाचे नाव आहे. वेदांतवर दर्यापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल केले आहे. अमरावतीमधील दर्यापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शासकीय क्रीडा परिसरात विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण सुरू असताना वेदांतच्या चेहऱ्यात बाण घुसला. सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडली …

Read More »

झोक्यात मान अडकून मुलाचा मृत्यू

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरातल्या मुंदडानगर भागातील एका १५ वर्षाच्या मुलाचा झोका घेत असताना गळ्याला गळफास लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. घटना कशी घडली? शहरातील वेदांत संदीप पाटील (१५) हा विद्यार्थी त्याच्या घरी झोका खेळत अभ्यास करत होता. यावेळी झोका गरगर फिरून त्याची मान त्यात अडकली. त्यामुळे त्याचा करूण अंत झाला आहे. वेदांत इयत्ता नववीच्या वर्गात शिकत असल्याची प्राथमिक माहिती …

Read More »

वाघ तस्कर जाळ्यात : नागपूर व भंडारा वनविभागाची कारवाई

भंडारा जिल्ह्यातील नाकडोंगरी वन परिक्षेत्रातील गोबरवाही येथे वाघ नखांसह वन्य जीवांच्या विविध अवयवांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई नागपूर व भंडारा वन विभागाच्या फिरते पथकांनी शनिवारी सायंकाळी संयुक्‍तपणे केली. आरोपींकडून वाघाचे अवयव जप्त करण्यात आले असून, यामध्‍ये 15 वाघनखे, 3 सुळे दात, 10 जोड दात (दाढ), 5 किलो हाडांचा समावेश आहे. वनविभागाच्या माहितीनुसार, संजय श्रीराम पुस्तोडे …

Read More »

फडणवीसांविरोधात फेसबुक पोस्ट : पुण्यात तरुणाविरोधात गुन्हा

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्या व्यक्तीविरुद्ध पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम १५३ अंतर्गत हा गुन्हा दखल करण्यात आला आहे. अनिल हरपळे असे या व्यक्तीचे नाव असून तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची साथ सोडून महविकास आघाडी …

Read More »

कैद्याला मागितली 50 हजाराची लाच : हवालदारासह महिलेला पकडले

पॅरोलवरील कैद्याकडून 50 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी येरवडा कारागृहातील हवालदार बाजीराव जोतिबा पाटील (वय 54) आणि रेहाना आसिफ सय्यद (वय 48) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रांगेहाथ पकडले. याप्रकरणी एका कैद्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदार कैद्यास शिक्षा झालेली आहे. त्याला पॅरोल मंजूर करण्यात आला असून, सध्या तो कारागृहाबाहेर आहे. यादरम्यान हवालदार बाजीराव पाटील यांनी कैद्याला 50 हजार रुपयांची लाच …

Read More »

मटण सूपमध्ये भात का?मारहाणीत वेटरचा मृत्यू

मटणाच्या सूपमध्ये भात का दिलाय,तुमचं जेवण व सर्विस चांगली नाही, असे प्रश्न विचारत दोन ग्राहकांनी हॉटेलमधील वेटरला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली.या मारहाणीत वेटर गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर भागातील सासुरवाडी खाणावळ या भागात घटना घडली आहे. माहितीनुसार, मटणाच्या सूपमध्ये भात का आहे ? तुमचं जेवण व सर्विस चांगली नाही, असं म्हणत …

Read More »

11 दुचाकी, ऑटो चोरणाऱ्यांना अमरावतीत अटक : वाचा नागपूर कनेक्शन…

अमरावती जिल्ह्यात दुचाकी चोर सक्रिय आहेत. पोलिसही सतर्क झाले आहेत. दुचाकी चोरांची सुळसुळाट झाल्याचे समोर येताच पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेने सूत्रे हलवत तब्बल ११ मोटरसायकल आरोपींकडून जप्त केले. त्या मूळ मालकाकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केली. यामुळे अनेक दुचाकी मालकांनी सुटकेचा श्वास सोडत पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. मंगवारी गस्त घालत असताना पोलिसांना अशी माहिती मिळाली की,दोन व्यक्ती चित्रा चौकात …

Read More »

नागपुरात तिहेरी हत्याकांडाने खळबळ

नागपुरात गेल्या 24 तासात दोघांची हत्या झाली होती. तर यानंतर आता नागपुर ग्रामीणमध्ये तिसरी हत्येची घटना बुटीबोरी येथे घडली आहे. नागपूरच्या इमामवाडा भागात दोन मजुरांनी संगनमत करून मित्राची हत्या केली. त्यानंतर मृतदेह विहिरीत फेकून दिला होता. पाचपावली भागात तिघांनी मिळून एकाची हत्या केली. तिसरी घटना जिल्ह्यातील बुटीबोरी येथे झाली आहे. पोलीस खबऱ्या असल्यावरून दोघांनी सुनील भजे नावाच्या व्यक्तीची हत्या केली. …

Read More »