बंगलोर येथून द्राक्षे भरून नागपूरला येणारा ट्रक समृद्धी महामार्गावर बुधवारी सकाळी उलटला. या आठवड्यात समृद्धी प्रवेश व्दारावर घडलेला हा तिसरा अपघात आहे. या घटनेत ट्रक चालक अभिजीत मंडल जखमी झाला.बंगलोर येथून द्राक्षे भरून ट्रक क्र डब्ल्यू बी ६७ सी १३४४ ने समृद्धी महामार्गाने नागपूरला येत असताना अनियंत्रित होऊन उलटला. ट्रकमधील द्राक्षाचे बॉक्स रस्त्यावर पडले होते. पोलीस घटनास्थळी दाखल झाले.जखमी चालक …
Read More »बडनेऱ्यात महाप्रसादाच्या कार्यक्रमातून 5 महिलांचे मंगळसूत्र चोरी
अमरावतीच्या बडनेरा येथील झीरी मंदीर परिसरात मॉ कनकेश्वरी यांचे प्रवचन होते. प्रवचनानंतर महाप्रसादाचे आयोजन केले होते. दरम्यान महाप्रसादाच्या वेळी भाविकांची प्रचंड गर्दी झाली. याच गर्दीचा फायदा घेवून एकाचवेळी पाच महिलांच्या गळ्यातील ६८ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र चोरीला गेले. ही चोरी करणाऱ्या चार महिलांना तत्काळ नागरिकांनी पकडले. त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही घटना रविवारी (दि. ५) सायंकाळी घडली. वर्षा रविन्द्र घ्यार …
Read More »शिंदे-फडणवीसविरुद्ध आक्षेपार्ह ट्विट : नागपुरात तरुणावर गुन्हा, भाजप आमदाराची तक्रार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्वीट केल्यावरून नागपूर पोलिसांनी मुंबईतील एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी कसबा पोटनिवडणूक संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाने आक्षेपार्ह मजकूर टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदाराची तक्रार नागपुरातील लकडगंज पोलिस स्टेशनमध्ये सार्थक कपाडी या तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे. तो मुंबईतील …
Read More »नागपुरात यू-ट्यूब बघून अल्पवयीन मुलीने स्वत:चीच केली प्रसूती
गर्भवती असल्याची माहिती दडवून ठेवणाऱ्या अल्पवयीन मुलीने यू-ट्यूब पाहून स्वत:च प्रसूती करून बाळाला जन्म दिल्याची घटना नागपुरातून समोर आली. हे बाळ रडल्यास साऱ्यांना माहिती होईल, आपले बिंग फुटणार या भीतीतून नंतर पट्ट्याने गळा आवळून त्याचा जीव घेतला. हृदयाचा थरकाप उडविणारी ही घटना शुक्रवारी मध्यरात्री शहरातील अंबाझरी पोलिस स्टेशनच्या हद्दीत उघडकीस आली. मुलीची प्रकृती चिंताजनक असून, तिच्यावर शासकीय इस्पितळात उपचार सुरू …
Read More »बारावी पेपरफुटीप्रकरणी पाच जणांना अटक
बारावी गणिताचा पेपर फुटल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. साखरखेर्डा पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून यात दोन शिक्षकांचा समावेश आहे. पेपर सुरु होण्याचा अर्धा तासापूर्वी गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. एकच खळबळ उडाला होती. याप्रकरणात दोन शिक्षकांसह आजुबाजुच्या गावातल्या तीन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यावर कलम 420 आणि 120 ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र …
Read More »महिला पुरवठा अधिकारी लाच घेताना अटकेत
पाच हजार रुपयांची लाच घेताना पुरवठा निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. गुरुवारी दुपारी साडेपाच वाजता दरम्यान यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील तहसील कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. स्नेहल राजेंद्र देशमुख (वय 36) असे या पुरवठा निरीक्षकाचे नाव आहे. आर्णी तालुक्यातील तळणी येथील रास्तभाव दुकानदाराला अंत्योदयमधील कमिशनचे बिल काढण्यासाठी पाच हजाराची लाच मागितल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यावरून गुरुवारी …
Read More »रुग्णाकडून परिचारिकेला मारहाण : पोलिसांचा तपास सुरु
जिल्हा शासकीय रुग्णालयात महिला रुग्णाने परिचारिकेसह एका महिला कर्मचाऱ्यास मारहाण केली. दोन्ही जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.मीना चौधरी या कर्मचारीने महिला रुग्ण कक्षातील स्वछता करण्यासाठी रुग्णाच्या नातलगांना कक्षाबाहेर जाण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने अंबड येथील महिला रुग्नाने मीना चौधरी व परिचारिका जाधव यांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी नाशिकमधील सरकारवाडा पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. पोलीस या घटनेचा …
Read More »लग्नात नाचता नाचता 19 वर्षीय तरुणाला हृदयविकाराचा झटका
मराठवाड्यातील नांदेडमधून एक दु:खद बातमी समोर आली आहे. एका 19 वर्षीय तरुणाचा वरातीत नाचता नाचता मृत्यू झाला. सदर घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अचानक हृदयविकाराचा झटका येऊन तरुणाचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.नांदेडच्या किनवट तालुक्यातील शिवणी येथील मुत्तेन्ना जामगेवाड हा तरुण तेलंगणातील पार्डी येथे नातेवाईकाच्या लग्नात गेला होता. लग्नाच्या रात्री उशिरा कार्यक्रमात तेलगू चित्रपटातील गाण्यावर जबरदस्त डान्स करत …
Read More »नागपुरात बाळ तस्करीचा पर्दाफाश!18 पेक्षा अधिक बाळांची विक्री, सूत्रधार अटकेत
बाळाची तस्करी करणाऱ्याला नागपुरातून अटक करण्यात आली आहे. या रॅकेटची सूत्रधार आयशा खान ऊर्फ श्वेताने अटकेतील रेखा अप्पाजी पुजारी (वय 54, रा. निर्मल कॉलनी) या महिलेच्या माध्यमातून आतापर्यंत 18पेक्षा अधिक बाळांची विक्री केली, अशी धक्कादायक आहे. रेखाला पाच दिवसाची पोलिस कोठडीत असून, गुन्हेशाखा पोलिस तिची कसून चौकशी करीत आहेत. सखोल चौकशीनंतर बाळविक्रीचा आकडा वाढू शकतो. माहितीनुसार, आयशा खान ही धंतोलीतील …
Read More »महाराष्ट्रात मुंगसाची शिकार, गुजरातच्या चौघांना अटक
नाशकातील दिंडोरी तालुक्यातील अकराळे परिसरातील न्याहारी डोंगराच्या राखीव वन क्षेत्रात मुंगसाची शिकार करणाऱ्याना वनविभागाने जेरबंद केले. प्रकरण असे… दिंडोरी तालुक्यातील नाशिक कळवण रस्त्यालगत असणाऱ्या ऐतिहासिक न्याहारी डोंगराच्या पायथ्याशी वनविभागाचे राखीव वनक्षेत्र आहे.या परिसरात गेल्या काही दिवसापासून वन्य प्राण्यांची शिकार केली जात असल्याची माहिती वन विभागाला मिळाली. त्यानुसार गुरुवारी गुजरात राज्यातील पाच संशयताच्या टोळीने न्याहारी डोंगराच्या पायथ्याशी वनविभागाच्या क्षेत्रात दोन मुंगसाची …
Read More »
विश्वभारत News Website