Breaking News

क्राईम

औरंगाबादमध्ये साडेआठ लाखांची लाच घेताना जलसंधारणचा अभियंता जाळ्यात

औरंगाबाद जिल्ह्यात महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंध विभागाने आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. औरंगाबादमध्ये एका बड्या सरकारी अधिकाऱ्याला तब्बल साडेआठ लाखांची लाच घेतना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. ऋषिकेश देशमुख असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. औरंगाबाद येथे जलसंधारण विभागात आठ लाख 53 हजारची लाच घेताना देशमुख यांना रंगेहात अटक करण्यात आली आहे. देशमुख हे वैजापूर जलसंधारण विभागात उपविभागीय अधिकारी म्हणून …

Read More »

चंद्रपूर : ब्रम्हपुरीत भीषण अपघात, 31 जखमी

लग्नाचे वरात घेऊन जाणाऱ्या टेम्पो चालकाचा चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथील टिळक नगर जवळ गाडीवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो वाहन पलटून वाहनात बसलेले 31 जण जखमी झाले असून यात आठ जण गंभीर जखमी झाले असल्याची घटना आज दुपारी दोनच्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार लाखांदूर तालुक्यातील भागडी येथे नातेवाईकांकडे नामकरण विधीचा कार्यक्रम असल्याने रणमोचन येथील दोनाडकर व आप्त परिवार हे मालवाहक टेम्पो वाहनाने …

Read More »

दिग्गज क्रिकेटरची पत्नीला बॅटने मारहाण

भारतीय क्रिकेटचा माजी खेळाडू विनोद कांबळी अडचणीत सापडला आहे. त्याच्या पत्नीने शुक्रवारी त्याच्याविरोधात मद्यधुंद स्थितीत मारहाण केल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी कांबळीविरोधात भादंवि कलम 324 व 504 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. डोक्याला दुखापत विनोद कांबळीने आपल्याला स्वयंपाकाच्या पॅनचे हँडल फेकून तिच्या डोक्याला दुखापत केल्याचा आरोप अँड्रिया कांबळीने केला आहे. त्याचवेळी हे प्रकरण सोडवले जात असल्याचा दावाही त्यांनी केला …

Read More »

नागपूर हायकोर्टातील चंदनाचे झाड पळविण्याचा प्रयत्न : दोघांना अटक

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ (हायकोर्ट)परिसरातील चंदनाचे झाड तोडून ते पळविण्याचा प्रयत्न दोन चोरट्यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. चोरटे या प्रयत्नात अयशस्वी ठरले अन् पोलिसांनी त्यांना गजाआड केले. ही घटना शुक्रवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ परिसरात घडली. न्यायमूर्ती व वकिलांची वाहने या परिसरात पार्क करण्यात येतात. त्यामुळे नागपूर खंडपीठाचा परिसर बराच मोठा …

Read More »

नागपूरजवळ अंधश्रद्धेतून झाली वाघाची शिकार : 7 आरोपीना अटक

महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पातील पवनी बफर वन क्षेत्रात 12 जानेवारीला वाघाची शिकार झाली.या प्रकरणात 7 आरोपींना अटक करण्यात आली. सध्या सर्व आरोपी नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात आहे. आरोपींकडून मिळालेली माहिती पडताळण्याचे काम सुरू आहे. त्यावरून वाघाची शिकार अंधश्रद्धेतून झाल्याची शक्यता वनाधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. यातील अटक केलेल्या जितेंद्र वरखडे या आरोपीने गुन्ह्यात वापरलेले एक हत्यार दाखवले. त्याला वन विभागाने जप्त केले. ताब्यात …

Read More »

घटस्फोट होताच सुनेने पती, सासऱ्याला लगावली कानशिलात : कोर्ट परिसरात हाणामारी

न्यायालयीन परिसरात घटस्फोट घेतल्यानंतर सुनेने सासऱ्याच्या व पतीच्या श्रीमुखात लगावली. त्यामुळे दोन गटात न्यायालयाच्या आवारातच फिल्मी स्टाईल हाणामारी झाली. मंगळवारी दुपारी घडलेल्या या प्रकारानंतर जालना जिल्ह्यातील भोकरदन पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरण काय? पोखरी गावातील युवतीचा विवाह आडगाव भोंबे( ता. भोकरदन) येथील शुभम विनायक साळवे यांच्या सोबत झाला होता. मात्र त्यांच्यात आपसात पटत नव्हते. त्यामुळे ही …

Read More »

जळगावात तीनशे रुपयांची लाच घेताना महिला तलाठी जाळ्यात

सातबारा उतार्‍यावर नाव लावण्यासाठी तीनशे रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या भुसावळ तालुक्यातील साक्री येथील महिला तलाठी एम.एन.गायकवाड यांना जळगाव एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे महसूल विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे. भुसावळ तालुक्यातील साक्री येथील तलाठी एम. एन. गायकवाड यांनी सातबारा उतार्‍यावर नाव लावण्यासाठी तीनशे रुपयांची लाच मागून ती खडका कार्यालयात स्वीकारली. मंगळवार, दुपारी तीनच्या सुमारास जळगाव एसीबीच्या पथकाने त्यांना सापळा …

Read More »

नागपुरात केंद्रीय मंत्र्याच्या नावे कोटींची मागितली खंडणी : चौघांना अटक

नागपुरातील एका मोठ्या कोळसा व्यापाऱ्याला चौघांनी थेट केंद्रीय कोळसा मंत्र्यांच्या नावावर तब्बल १ कोटी खंडणीची मागणी केली. खंडणी न दिल्यास बदनाम करण्याची धमकी दिली. प्रकरणी पोलिसांनी नागपुरातील तीन तोतया पत्रकारांसह चौघांना अटक केली आहे. पीयूष पुरोहित, राष्ट्रभान पोर्टलचा पत्रकार संजय बघेल, संजीत बघेल आणि वंश अग्रवाल ऊर्फ मयंक कुमार अशी आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना चार दिवस पोलिस कोठडीचे आदेश …

Read More »

गडचिरोली-छत्तीसगड सीमेवर गायींची अवैध विक्री : शिंदे लक्ष देणार काय?विखे पाटील ‘महसूल’मध्ये रमले

✍️मोहन कारेमोरे : संपादक✍️ गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा येथील पेंढरी रस्ता आणि छत्तीसगडच्या सीमेवरील बठेहार या गावातून गायींची बेकायदेशीर खरेदी-विक्री केली जात आहे. याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील लक्ष देतील काय, असा प्रश्न आहे. विखे पाटील यांच्याकडे महसूल खात्याचा पदभार आहे. तर, पशुसंवर्धन खात्याचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे आहे. मात्र, महसूल कडे अधिक लक्ष तर पशुसंवर्धनकडे दुर्लक्ष …

Read More »

नागपूर आरटीओ रवींद्र भूयारांनी महिला अधिकाऱ्याचा केला लैंगिक छळ : चौकशी सुरु

नागपूर शहर प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांच्यावर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील महिला कर्मचाऱ्याने गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी परिवहन आयुक्तांनी महिला तक्रार निवारण समितीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले. रवींद्र भुयारी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. तक्रारदार महिलेचे आरोप बिनबुडाचे आहेत. चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीला सामोरे जाणार असून, तिथे बाजू मांडणार …

Read More »