Breaking News

क्राईम

नागपूर : गोळीबारात जखमी झालेल्या जवानाचा मृत्यू

नागपूर जिल्ह्यातील कन्हान खाण परिसरातील गोळीबारात गंभीर जखमी जवानाचा अखेर कामठी येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. वेकोलीच्या खाण क्रमांक सहा परिसरात महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानावर बेछूट गोळीबार करण्यात आला होता. गंभीर जखमी झालेला मिलिंद समाधान खोब्रागडे (वय २९, मूळ रा. अकोला) याच्यावर कामठीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. या प्रकरणात पोलिसांनी समीर सिद्दीकी (वय २९ रा. कॉलरी टेकडी) व राहुल …

Read More »

उपकोषागार अधिकारी १५ हजारांची लाच घेताना जाळ्यात

तक्रारदाराचे थकीत वेतनाचे बिल मंजूर करण्यासाठी व कोणतेही आक्षेप न घेण्याच्या मोबदल्यात नाशिकच्या चांदवड उपकोषागार अधिकाऱ्याला अटक करण्यात आली. १५ हजार रुपयांची लाचेची मागणी करीत तडजोडीत १० हजारांची लाच स्वीकारताना उपकोषागार अधिकारी सुनील तडवी (वय ४९) यांना नाशिक लाचलुचपत विभागाने रंगेहाथ अटक केली. नाशिक येथील ४९ वर्षीय तक्रारदाराचे थकीत वेतनाचे बिल मंजूर करण्यासाठी व कोणतेही आक्षेप न घेण्याच्या मोबदल्यात १५ …

Read More »

नागपुरात १० वर्षांनंतर भरती घोटाळा उघड : ९ अधिकाऱ्यांचा भांडाफोड

नागपुरात तब्बल ९ वर्षांनंतर आयकर विभागातील एक भरती घोटाळा उघडकीस आलाय. हा घोटाळा उघड होताच सीबीआयने ९ अधिकाऱ्यांना अटक केली आहे. हे सर्व अधिकारी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या २०१२-१४ दरम्यान झालेल्या परीक्षांमधून भरती झाले होते. या घटनेमुळे अधिकारी वर्गांत आणि परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी वर्गात एकच खळबळ उडाली आहे. सीबीआयने अटक केलेल्यांमध्ये स्टेनोग्राफर रिंकी यादव, सरिता, अनिल कुमार, राहुल कुमार, अभय …

Read More »

नागपूर : समृद्धी महामार्गावर दोन कारचा अपघात

रस्त्यांच्या देखभाल – दुरुस्तीसाठी नवे पायाभूत सुविधा विकास महामंडळ; आणखी एका महामंडळाची भर, रस्त्यांवरील खड्डे जाणार का ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे रविवारी लोकार्पण झाले. या महामार्गावरून वाहतूक सुरू झाली. मात्र, वाहनांच्या सुसाट वेगामुळे अपघाताची घटना घडली आहे. नागपूर -शिर्डी हे अंतर कमी झाले असले, तरी सुसाट वाहनांमुळे महामार्ग पोलिसांची चिंता वाढलीय. समृद्धी महामार्गावर पहिला अपघात सोमवारी झाला. वायफळ टोल नाक्यावर वेगाने येणाऱ्या मर्सिडीज कारने पुढच्या स्विफ्ट कारला जोरदार धडक दिली. …

Read More »

भंडाऱ्यात चिमुकल्याचा टाकीत बुडून मृत्यू

अंगणात खेळताखेळता दीड वर्षीय चिमुकला नळाच्या पाण्याच्या टाकीत पडलाय. यातच त्याचा बुडून दुर्दैवी अंत झालाय. प्रियांशू जितेंद्र मेहर असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. ही घटना भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव येथे घडली. माहिती अशी, घटनेच्या वेळी प्रियांशूची आई आंघोळीला गेली होती. त्यावेळी प्रियांशू हा घराबाहेरील अंगणात खेळत होता. खेळता-खेळता नळाच्या टाकीकडे गेला. आंघोळ करुन चिमुकल्याची आई परतल्यानंतर प्रियांशू न दिसल्याने …

Read More »

20 हजारांची लाच घेताना महिला मंडल अधिकारी ताब्यात

पुण्यातील पवन मावळ भागातील शिवणे येथील महिला मंडल अधिकार्‍यासह एका सहकार्‍यास 20 हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.मंडल अधिकारी संगीता राजेंद्र शेरकर व खासगी व्यक्ती संभाजी लोहोर असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. प्रकरण काय आहे? यातील तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या भडवली येथील जमिनीच्या 7 /12 उतार्‍यावर त्यांचे नाव लावण्याकरिता मंडल अधिकारी संगीता शेरकर व संभाजी …

Read More »

चंद्रपूर जिल्ह्यात खळबळ : न्यायालयाच्या प्रवेशद्वारावरच युवतीने घेतला गळफास

चंद्रपूरातील ब्रम्हपुरी येथील नवीन न्यायालयाच्या प्रवेश द्वारावर एका तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली. मंगळवारी पहाटे उघडकीस आलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्या की घातपात? याबाबत तर्क लावले जात आहे. पौर्णिमा मिलिंद लाडे (27), असे मृत तरुणीचे नाव आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कोरेगाव येथील रहिवासी असलेली ही तरुणी ब्रम्हपुरी येथे आली होती. आज, मंगळवारी पहाटेच्या सुमारास ती तालुका न्यायालय इमारतीच्या …

Read More »

औरंगाबाद : १२८ लाचखोर ताब्यात ; महसूल विभाग आघाडीवर

यंदा लाचलुचपत विभागाने लावलेल्या १०५ सापळ्यांत ११ महिन्यांत १४० लाचखोर अधिकारी- कर्मचारी तसेच खासगी व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे. राज्यात सर्वाधिक सापळे पुणे विभागाने यशस्वी केले असून १४३ प्रकरणात २०२ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. यानंतर नाशिक विभागाने ११५ प्रकरणांमध्ये तब्बल १७२ आरोपींवर गुन्हे दाखल केले आहे. लाचखोरांविरोधात यशस्वी सापळे रचून आरोपी ताब्यात घेण्याच्या कारवाईत विभागाचा राज्यात तिसरा क्रमांक लागतो.राज्यात …

Read More »

वाळूची अवैध वाहतूक रोखणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला ट्रकसोबत फरफटत नेले

वाळूची अवैध वाहतूक रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकातील सहायक पोलिस निरीक्षक योगेश इंगळे यांना वाळू तस्कराने ट्रकसोबत फरफटत घेऊन जात जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना अर्जुननगर ते पीडीएमसी दरम्यानच्या मार्गावर बुधवारी सकाळी ७.३५ वाजेच्या सुमारास घडली आहे.याप्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी एपीआय योगेश इंगळे यांच्या तक्रारीवरून शोएब अहमद एजाज (रा. आझादनगर), रेहान शेख गुलाब शेख (रा. सबा नगर) व …

Read More »

अश्लिल चित्रफीत बनवून अधिकाऱ्याकडे ५० लाखांच्या खंडणीची मागणी

एका अधिकाऱ्याची अश्लिल चित्रफीत तयार करून ५० लाखाची खंडणी मागणाऱ्या टोळीचा चंद्रपूरात स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. मंगळवारी रोख ३० हजार व ५ लाखाचा चेक घेताना त्यांना अटक करण्यात आल्याने चंद्रपूरात खळबळ उडाली आहे. यामध्ये सादीक खॉन, झिबल भारसाखरे यांच्यासह तीन महिला आरोपींचा समावेश आहे. मंगळवारी चंद्रपूर शहरातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांना तक्रारीद्वारे, काही इसमांनी संगणमत करून त्यांना …

Read More »