‘किस्मत अगर खराब हो तो ऊंट पर बैठे इंसान को भी कुत्ता काट लेता है’, अशी एक हिंदीत म्हण आहे. याचाच प्रत्यय एका घटनेतून आलाय. एका गरीब व्यक्तीला १ कोटी रुपयांची लॉटरी लागली. अचानक इतके पैसे जवळ आल्याने त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. आता या पैशांनी आपण चांगले आयुष्य जगू असा विचार त्याने केला. मात्र, त्याच्या या आनंदावर काही दिवसातच …
Read More »शिव भोजन थाळीचे बील काढण्यासाठी 80 हजाराची लाच : लाचलूचपतच्या पोलीस निरीक्षकही जाळ्यात
✳️पहिली घटना शिवभोजन थाळीचे थकीत देयक काढण्यासाठी 80 हजाराची लाच घेताना वाशिम येथील पुरवठा निरीक्षकाला अटक करण्यात आली आहे. निलेश विठ्ठल राठोड असे पुरवठा निरीक्षकाचे नाव आहे. ही कारवाई अमरावती लाचलूचपत विभागाने केली. ✳️दुसरी घटना नांदेड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या मीना बकाल आणि त्यांचे पती कुलभूषण बावस्कर या दोघांना 60 हजारांची लाच घेताना अटक करण्यात …
Read More »42 लाखांच्या लाचप्रकरणी तहसीलदार, तलाठ्यासह पाच जणांवर गुन्हा
ट्रस्टच्या जागेचे अकृषक प्रमाणपत्र (एनए) मंजुरीसाठी तलाठ्याने स्वतःसाठी व वरिष्ठ अधिकार्यांसाठी तब्बल 42 लाखांच्या लाचेची मागणी केली, असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या कारवाईत शिरूरच्या तत्कालीन तहसीलदार रंजना उमरहांडे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणावर गुन्हे दाखल? तत्कालीन तहसीलदार उमरहांडे यांच्यासह शिरूर महसूल सहायक कार्यालयातील तहसीलदार स्वाती सुभाष शिंदे, शिरूरचा तहसीलदार सरफराज …
Read More »मुलाच्या श्वसनलिकेत अडकलं चॉकलेट आणि गमावला जीव
तेलंगण राज्यातील वारंगळ शहरातील एक अतिशय हृदयद्रावर घटना घडली आहे.या शहरात एक आठ वर्षीय मुलाचा चॉकलेट खात असताना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे चॉकलेट या मुलाच्या वडिलांनी परदेशातून आणले असल्याचे समजते. संदीप सिंह असे या ८ वर्षीय मुलाचे नाव आहे. संदीप हा आपल्या वडिलांनी आणलेले चॉकलेट खात होता. मात्र चॉकलेटचा एक तुकडा त्याच्या गळ्यात अडकला. संदीपला श्वास घेण्यास त्रास होऊ …
Read More »पुण्याजवळ महाराष्ट्र एक्सप्रेसवर दगडफेक
गोंदियाहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या महाराष्ट्र एक्सप्रेसवर पुणेनजीक उरुळी कांचन येथे दगडफेक झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली. घटनेत रेल्वेच्या एका डब्याच्या खिडकीची काच फुटली आहे. काचा बंद असल्यामुळे सुदैवाने कोणताही प्रवासी जखमी झाला नाही. गोंदिया कोल्हापूर एक्सप्रेस 11040 गोंदियाहून सुटल्यावर दुसऱ्या दिवशी पुणे विभागात येते आणि त्यानंतर कोल्हापूरपर्यंत धावते. शुक्रवारी सायंकाळी ही गाडी पुणे विभागात दाखल झाली. उरुळी स्थानक परिसर …
Read More »अमिताभसोबत काम केलेल्या अभिनेत्याला नागपुरातून अटक
नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलेल्या नागपुरातील प्रियांशू रवी क्षत्रिय या कलाकाराला नागपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्यावर चोरी आणि घरफोडीचा आरोप आहे. प्रियांशूनं झुंड सिनेमात बाबू ही भूमिका केली होती. ती चांगलीच गाजली होती. नागपूरचे क्रीडा शिक्षक विजय बारसे यांच्या आयुष्यावर आधारित ‘झुंड’ हा सिनेमा काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला होता. नागराज मंजुळे यांनी या सिनेमाचं …
Read More »गरम पाण्यात पडून चिमुकलीचा मृत्यू : औरंगाबादतील घटना
औरंगाबादमध्ये गरम पाण्यात पडून चार वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जिल्ह्यातील वाळूज परिसरात ही घटना आहे. घटनेनंतर चिमुरडीवर रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालाय. श्रेया असं मृत लहानगीचं नाव आहे. माहितीनुसार, श्रेया जेवन झाल्यानंतर हात धुण्यासाठी गेली. मात्र तेथे पाय घसरुन ती खाली पडली. त्याठिकाणी बादलीत हीटरच्या साह्याने पाणी केलं होतं. हीटरने गरम झालेल्या पाणी अंगावर …
Read More »नाशिक : सागवनाची कत्तल
नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील चिखली गावाजवळ वनविभागाने सव्वा लाख किमतीचे सागवान लाकूड जप्त केले. चिखली गावानजीक वनविभागाच्या कंपार्टमेंटमध्ये मौल्यवान सागाच्या झाडांची कत्तल करुन ते गुजरात राज्यात विक्री करण्याची तयारी असल्याचे कळते.तसेच यासंदर्भात वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती वनविभाग प्रादेशिकच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानुसार पथकाने बुधवार दि.(२३) रोजी मध्यरात्री सापळा रचला. सव्वा लाखाचा माल जप्त सागवान झाडांची कत्तल करुन ठेवलेले …
Read More »अमरावतीत १५ वर्षीय मुलाच्या चेहऱ्यात घुसला बाण
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहरातील शासकीय क्रीडांगण परिसरात पंधरा वर्षातील मुलाच्या चेहऱ्यात बाण घुसल्याची घटना घडली आहे. वेदांत गणेशराव डहाले असे जखमी मुलाचे नाव आहे. वेदांतवर दर्यापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल केले आहे. अमरावतीमधील दर्यापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शासकीय क्रीडा परिसरात विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण सुरू असताना वेदांतच्या चेहऱ्यात बाण घुसला. सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडली …
Read More »झोक्यात मान अडकून मुलाचा मृत्यू
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरातल्या मुंदडानगर भागातील एका १५ वर्षाच्या मुलाचा झोका घेत असताना गळ्याला गळफास लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. घटना कशी घडली? शहरातील वेदांत संदीप पाटील (१५) हा विद्यार्थी त्याच्या घरी झोका खेळत अभ्यास करत होता. यावेळी झोका गरगर फिरून त्याची मान त्यात अडकली. त्यामुळे त्याचा करूण अंत झाला आहे. वेदांत इयत्ता नववीच्या वर्गात शिकत असल्याची प्राथमिक माहिती …
Read More »
विश्वभारत News Website