Breaking News

क्राईम

अमरावतीत विवाहितेची विष घेऊन आत्महत्या

अमरावतीमधील विलासनगर परिसरात राहणाऱ्या एका विवाहितेने विषारी द्रव्य घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी समोर आली. विवाहितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी विवाहितेच्या पती व सासूविरुद्ध कौंटूबिक छळ तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. विलास विजय रामटेके असे गुन्हा दाखल झालेल्या मृत विवाहितेच्या पतीचे नाव आहे. विलासने तक्रारदार महिलेच्या मुलीसोबत प्रेमविवाह केला होता. त्यानंतर विलास हा सतत मुलीला मारहाण …

Read More »

शिकारीसाठी शेतात लावलेल्या वीज तारांना स्पर्श ; दोन तरुणांचा मृत्यू

शिकारीसाठी शेतामध्ये लावलेल्या वीज प्रवाहित लोखंडी तारांना स्पर्श झाल्याने दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात ही घटना घडली. देवरी शहरालगतच्या मोठा परसटोला परिसरात या घडलेल्या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. आशिष कोसरे (२६), अनमोल गायकवाड (२२, दोघेही रा. परसटोला (देवरी)असे मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.

Read More »

धक्कादायक : खून करुन मुंडक्याचा केला फुटबाॅल

चंद्रपूर शहराजवळील दुर्गापूर येथेल महेश मेश्राम यांचा खून केल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली. दुर्गापूर मुख्य मार्गावर हा खून झाला. मेश्राम हा तो नुकताच कारागृहातून पॅरोलवर बाहेर आला होता. पाेलिसांनी दाेघांना अटक केली आहे. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापुरात येथे रात्री साडे नऊ ते साडे दहा वाजेच्या सुमारास घडली. मेश्राम यांना आधी टाेळक्याने मारहाण केली. त्यानंतर धारदार शस्त्राने त्याचे मुंडक धडावेगळे …

Read More »

मोबाईल : 6 वर्षीय मुलाने आईच्या बँक खात्यातून उडविले 1 लाख 78 हजार

पालकांचे मोबाइल वापरत त्यावर दिवसभर ऑनलाईन गेम मुले खेळतात. ऑनलाईन गेमचा फटका आता लहान मुलांसह त्यांच्या पालकांनाही सहन करावा लागतोय. एका अवघ्या ६ वर्षीय मुलाने ऑनलाईन गेम खेळण्याच्या नादात त्याच्या आईच्या बँक खात्यातून १ लाख ७८ हजार रुपये उडविले. बँक खात्यातून पैसे कमी झाल्याचे लक्षात येताच पालकांनी सायबर सेलकडे धाव घेतले. पोलिसांनी मोबाइल तपासला असता मुलाने गेमच्या नादात आई वडिलांचे …

Read More »

भारत जोडोत जात असताना काँग्रेस नेते नसीम खान यांच्या गाडीचा अपघात

काँग्रेस पक्षाच्या मुंबईतील प्रमुख चेहऱ्यांपैकी एक माजी मंत्री नसीम खान यांच्या गाडीचा नांदेडमध्ये अपघात झालाय. नांदेडच्या भिलोली टोलनाक्यावर शनिवारी हा अपघात झाला. यावेळी नसीम खान प्रवास करत असलेल्या कारला एका दुसऱ्या कारने समोरून धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, दोन्ही कारच्या बोनेटचा भाग पूर्णपणे चेपला गेला आहे. सुदैवाने या अपघातात नसीम खान यांना फारशी दुखापत झालेली नाही. केवळ …

Read More »

मुलगा पाण्यात पडला, वाचवण्यासाठी आईचीही उडी…

पोटच्या गोळ्यासाठी आई जगातील सर्व संकटांना तोंड देऊ शकते, हे म्हणतात ते काही खोटं-नाट नाही. आई मुलांसाठी जीवही द्यायची वेळ आली तरी मागे हटत नाही. राजस्थानमधील डुंगरपूर जिल्ह्यात असेच एक प्रकरण घडले आहे. एका आईने मुलाला बुडण्यापासून वाचवण्यासाठी जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेतली. खूप प्रयत्न करूनही ती ना मुलाला वाचवू शकली ना स्वतःला वाचवू शकली. त्यानंतर तेथे पोहोचलेल्या …

Read More »

अभियंत्याला ५० लाखांची लाच घेताना अटक

मुंबई महापालिकेच्या पूर्व विभागाचे कार्यकारी अभियंता यांना अनधिकृत शेड न तोडण्यासाठी ५० लाखांची लाच घेताना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली. कार्यकारी अभियंता सतीश पवार यांनी एका कंपनीची अनधिकृत शेड न तोडण्यासाठी ५० लाखांच्या लाचेची मागणी केली होती. यानंतर कंपनीच्या मालकांनी कार्यकारी अभियंता सतीश पवार यांच्याविरोधात मुंबई पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली …

Read More »

सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकाऱ्याला पुण्यातून अटक

सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकारी रामनारायण लक्ष्मीनारायण गगराणी (वय -65, रा. शारदानगर, नांदेड) यांना नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने शुक्रवारी पुण्यातील कोथरूड-कर्वेनगर परिसरातून अटक केली. गगराणी यांच्याविरूध्द नांदेड जिल्ह्यातील वजीराबाद पोलिस ठाण्यात अपसंपदा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्या गुन्हयात गगराणी यांना अटक करण्यात आली आहे. गगराणी यांना पुण्याच्या कर्वेनगर परिसरातून पथकाने नांदेड अ‍ॅन्टी करप्शनच्या टीमने ताब्यात घेतले. गगराणी यांनी त्यांच्या ज्ञात उत्पन्नापेक्षा 28 …

Read More »

बैल चारत असताना वाघाचा हल्ला : शेतकरी ठार

बैल चारत असताना वाघाने हल्ला करुन एका शेतकऱ्यास ठार केले. ही घटना गुरुवारी (दि.३) दुपारी दोन वाजताच्या सुमारास गडचिरोलीपासून ८ किलोमीटर अंतरावरील राजगाटा चेक गावानजीक घडली. सुधाकर भोयर (वय ५० रा.राजगाटा चेक) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सुधाकर भोयर हे आज बैल घेऊन शेतावर गेले होते. शेतालगतच्या जंगलात बैल चारत असताना अचानक भोयर यांच्यावर वाघाने हल्ला केला. यात ते …

Read More »

कुरकुऱ्याचा ट्रक नदीत कोसळला

मुंबई-आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील सावळदेजवळ तापी नदीच्या पुलावरून कठडा तोडून ट्रक नदीपात्रात कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात चालकाचा मृत्यू झाला असून क्लीनरला वाचवण्यात यश आले आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून पुणे येथून मध्य प्रदेशकडे एक आयशर कुरकुरे घेऊन जात होता. हा आयशर शिरपूर तालुक्यातील सावळदे गावाजवळील तापी नदीच्या पुलावर आला असता चालकाचे अचानक गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे हा ट्रक …

Read More »