नागपुरातील प्रसिद्ध कळमना बाजारमधील मिरची बाजारातील एका यार्डला आज बुधवारी पहाटे 2 वाजेच्या सुमारास आग लागली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यात प्रामुख्याने 7 ते 10 अडतीया व व्यापाऱ्यांचा माल होता. या आगीत 5 कोटींच्या जवळपास नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
Read More »नागपूर विद्यापीठात खळबळ! लैंगिक छळ आणि १६ लाख
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात एक खळबळजनक व धक्कादायक प्रकार समोर आले आहे. नागपूर विद्यापीठाचे प्रभारी जनसंपर्क अधिकारी आणि जनसंवाद विभागाचे प्राध्यापक धर्मेश धवनकर यांनी विभागातील सात प्राध्यापकांना त्यांच्या विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार आली असल्याचे बोलून ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला आहे. लैंगिक शोषणाच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी 16 लाख रुपये घेतल्याची तक्रार सातही प्राध्यापकांनी कुलगुरू, राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे केली. काय आहे …
Read More »लक्ष द्या ! बेशिस्तपणे वाहने पार्क करताय… वाचा
विश्व भारत ऑनलाईन : सध्या नागपूर ट्रॉफिक पोलिसांविरोधात नागरिक सोशल मीडियावर रोष व्यक्त करीत आहेत. रोषच नव्हे तर तक्रारीही करीत आहेत. अलीकडेच शहरातील सक्करदरा भागातील तिरंगा चौकातील एका हॉटेलसमोर दुचाकी पार्क केली होती. वाहतूक पोलिसांनी कंत्राट दिलेल्या टोइंग व्हैनने दुचाकी उचलत असताना हॉटेलच्या सुरक्षा रक्षकाने त्याला विरोध केला होता. यावरुन झालेल्या वादानंतर पोलिसाने त्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली. तिथे उपस्थित …
Read More »हृदय श्वसनक्रिया बंद पडल्याने 4 वर्षीय वाघिणीचा मृत्यू
विश्व भारत ऑनलाईन : हृदयक्रिया बंद पडल्यानेच वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना हिंगणा परिक्षेत्रात घडल्याची माहिती समोर आली आहे.वाघांच्या वाढत्या मृत्यूमुळे वन विभाग चिंतेत असतानाच परत एका वाघिणीचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे नागपूर जिल्ह्यात वाघांची शिकार वा मृत्यूच्या घटना नव्या नाहीत. यापूर्वी २३ मार्च २०२१ रोजी पेंच व्याघ्र प्रकल्पातील नागवाडी परिक्षेत्राच्या शेजारील एफडीसीएमच्या रिसाला परिक्षेत्रात एक वाघ कुजलेल्या स्थितीत आढळून …
Read More »नागपूरजवळ वाघाचा मृत्यू
विश्व भारत ऑनलाईन : नागपूर जिल्ह्यातील हिंगण्याजवळ सातनवरी भागात वाघाचे शव मिळाले. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. माहिती मिळताच हिंगणा वनविभागाची टीम घटनास्थळी पोचली. नैसर्गिक मृत्यू असल्याची माहिती आहे. ही घटना महसूलच्या जागेत असल्याचे कळते. याबाबत वनविभागाने तपास सुरु केलाय. मात्र, संशयास्पद काहीही आढळून आलेले नाही.
Read More »दिवाळीपूर्वी छापेमारी : नागपुरात २० लाखांचा भेसळयुक्त अन्नपदार्थ साठा जप्त
विश्व भारत ऑनलाईन : अन्न व औषध प्रशासनाने नागपुरात राबविलेल्या मोहिमेत तब्बल २० लाखांचा अन्नपदार्थांचा भेसळयुक्त साठा जप्त केला. नागपुरात १६ ठिकाणी धाड टाकण्यात आली. यामध्ये १० हजार ८८३ किलो वजनाच्या अन्नपदार्थांचा साठा भेसळीच्या संशयावरून जप्त केला. जप्त केलेल्या मालाची किंमत २० लाख १९ हजाराच्या घरात आहे. यात तेलापासून वेगवेगळ्या खाद्य पदार्थांचा समावेश आहे. दिवाळीच्या काळात अन्न पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात …
Read More »अमरावती-नागपूर-जबलपूर शनिवारपासून धावणार : सणासुदीत १७९ ‘स्पेशल ट्रेन’ची व्यवस्था
विश्व भारत ऑनलाईन : प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे.जबलपूर-नागपूर-अमरावती ही रेल्वे उद्या शनिवारपासून सुरु होत आहे. तसेच देशभरात सणासुदीचे काळ सुरू आहे. अशावेळी नोकरी, व्यवसायानिमित्त आपले गाव सोडून इतर राज्यात गेलेल्यांना सण साजरा करण्यासाठी सहजरित्या आपल्या घरी जाता यावे, म्हणून रेल्वेने प्रवाशांसाठी विशेष सोय केली आहे. रेल्वे विभागाने सणासुदीनिमित्त या वर्षी छठपूजेपर्यंत १७९ पेअर स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. या …
Read More »ठाकरेंची सेना खिळखिळी करण्याचा शिंदेंचा प्रयत्न : खासदार कृपाल तुमानेंचा गौप्यस्फोट
विश्व भारत ऑनलाईन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांसह बंडखोरी करत उद्धव ठाकरेंना सत्तेतून खाली खेचले. शिंदेंनी केलेले बंड हे उद्धव ठाकरेंसाठी मोठा झटका ठरले.पण, त्यानंतर शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेवरच प्रहार केला. आमदारांपाठोपाठ खासदार आणि राज्यभरातले जिल्हाप्रमुख इतर पदाधिकारीही फोडले. त्यानंतर शिंदे उद्धव ठाकरेंना पुन्हा एक झटका देणार आहे. शिंदे गटाचे रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी हा गौप्यस्फोट केला. दसऱ्याच्या मुहूर्तावर …
Read More »नागपूर जिल्हा परिषद निवडणूक 17 ऑक्टोबरला
विश्व भारत ऑनलाईन : नागपूर जिल्हा परिषदेच्या आगामी सव्वादोन वर्षासाठी 17 ऑक्टोबरला अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे. यंदा अनुसूचित जमातीसाठी अध्यक्षपद राखीव आहे. भाजपकडे या प्रवर्गातील एकही सदस्य नाही. त्यामुळे पुन्हा काँग्रेसच्या एखादा सदस्याला अध्यक्ष पदाची संधी मिळू शकते, त्यादृष्टीकोनातून अंतर्गत राजकारण सुरु झालेय.
Read More »कर्मचाऱ्यांसह एसडीएम, तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांविरोधात एकवटले, आजचे बंड रद्द
विश्व भारत ऑनलाईन : औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण सतत अपमान करून कामाचा तगादा लावतात, यासह अनेक तक्रारींचा पाढा महसूल खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे वाचला होता. यात जिल्हाधिकारी चव्हाण यांच्याविरोधात कर्मचाऱ्यांसह उपविभागीय अधिकारी, तहसीलदारही एकवटले होते. मात्र, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मध्यस्थी करून आज जिल्हाधिकारी यांच्याविरोधात होणारे आंदोलन मागे घेण्यास महत्वाची भूमिका बजावली. बंडाचे कारण? …
Read More »
विश्वभारत News Website