जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल शाखेतील लिपिकाने शासकीय योजनांच्या विविध हेड मधुन घोटाळा केला. यात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. घोटाळ्याचा आकडा 26 कोटींचा असून लिपीकावर कारवाई करण्यात आली आहे. पण वरिष्ठांवर कारवाईचे धाडस दाखविणार काय ? असा प्रश्न आहे. लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागातील लिपिक मनोज नागनाथ फुलेबोयणे याने मागील सात वर्षात तब्बल 26 कोटी रुपयेचा अपहार केल्याची माहिती उघड झाली. …
Read More »नागपूर जिल्हा परिषदेचा अजब कारभार : कंत्राटदारांना दिली २८ कामे, एकही सुरू नाही
जिल्ह्याच्या विकासासाठी जनता जिल्हा परिषदेकडे आशेने बघते. पण नागपूर जिल्हा परिषद अध्यक्षांच्या आदेशाला अधिकारी केराची टोपली दाखवत असतील, तर सामान्य जनतेचे काय? असा प्रश्न आहे. तशी वेळ नागपूर जिल्हा परिषदेत आली आहे. काही कंत्राटदारांना जलजीवन मिशनची २८ कामे देण्यात आल्याचा मुद्दा गेल्या आठवड्यातील सर्वसाधारण सभेत उपस्थित करण्यात आला होता. कामे सुरू न करणाऱ्यांवर कारवाई करून त्यांचे कंत्राट रद्द करण्याचे निर्देश …
Read More »तलाठी, मंडळ अधिकारी वाळू माफियांच्या पाठीशी? जिल्हाधिकारी म्हणतात फोटो, व्हिडीओ पाठवा
जळगावात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या शासन आपल्या दारी योजनेच्या कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी पाचोरा उपविभागीय (प्रांत) कार्यालयात जिल्ह्यातील पहिलीच आढावा बैठक घेतली. अतिक्रमणामुळे जिल्हाधिकारी यांचे वाहन प्रांत कार्यालयाबाहेरच अडकल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा बैठकीत अतिक्रमणावरून पालिका व पंचायत समितीच्या घरकुल योजनेची चांगलीच झाडाझडती घेतली. पंचायत समिती घरकुल योजनेचे वाभाडे तसेच पंचायत समिती अंतर्गत सुरु असलेल्या पंतप्रधान घरकुल योजनेचे काम समाधानकारक नसल्याने गटविकास …
Read More »IAS सुनील केंद्रेकरांना कोणत्या पक्षाची ऑफर?केंद्रेकरांची राजकारणात एंट्री?
धडाकेबाज आयएएस अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुनील केंद्रेकरांना बळजबरीने स्वेच्छानिवृत्ती घेण्यास भाग पाडल्याचा दावा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. केंद्रेकरांनी स्वच्छानिवृत्ती घेतली नसून, त्यांना ती घेण्यास भाग पाडण्यात आले, असे ते म्हणाले. केंद्रेकरांचा सरकारमधील काहींना त्रास विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांच्या निवृत्तीला अद्याप 2 वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. पण तत्पूर्वीच त्यांनी स्वच्छेनिवृत्ती घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात …
Read More »कोतवाल भरतीत गैरव्यवहार : भंडाऱ्यात दोन तहसीलदार आणि एक उपजिल्हाधिकारी निलंबित
भंडारा जिल्ह्यात पोलिस पाटील, कोतवाल पद भरतीत अनियमतीतता आढळल्याने दोन तहसीलदार आणि एक उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यासंदर्भात भंडारा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी शासनास अहवाल दिला. स्कृत दर्शनी अनियमतीतता आढळल्याने राज्य शासनाने तीन अधिका-यांना शासन सेवेतून निलंबित केले आहे. यामध्ये भंडारा उपविभागीय अधिकारी, भंडारा तहसीलदार तसेच पवनी तहसीलदार यांचा समावेश आहे. जिल्ह्यात पोलिस पाटील, कोतवाल पद भरती …
Read More »तलाठी भरतीसाठी दलाल झाले सक्रिय? प्रश्न पारदर्शकतेचा
उच्च दर्जाचे तंत्रज्ञान असलेली उपकरणे वापरून पेपर फोडणाऱ्या अनेक टोळ्या सक्रिय असल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा उमेदवारांनी केला आहे. अनेक गावे गैरप्रकारात सहभागी असल्याचे याआधी समोर आले आहे. सूक्ष्म आकाराचा कॅमेरा, प्रश्नपत्रिकेचे छायाचित्र परीक्षा केंद्राबाहेर पाठवणे, बाहेरून ‘मायक्रो ब्लूटूथ’द्वारे उत्तरे मागवण्याचे प्रकार याआधी समोर आले आहेत. वादग्रस्त भरती? तलाठी भरती-२०१९, आरोग्य पदभरती-२०२२, म्हाडा भरती, पिंपरी चिंचवड पोलीस भरती-२०२२, मुंबई पोलीस भरती-२०२३ …
Read More »IAS सुनील केंद्रेकरांना त्रास देणारे कोण?औरंगाबाद विभागीय आयुक्त केंद्रकरांनी का घेतली स्वेच्छानिवृत्ती?वाचा…!
मराठवाड्यात वाढत्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी औरंगाबाद विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांनी काही दिवसांपूर्वी एक सर्व्हे सुरु केला होता. या सर्व्हेनंतर त्यांनी खरीप आणि रब्बी दोन हंगामाच्या सुरवातीला पेरणीसाठी शेतकरी कुटुंबाला प्रत्येकी दहा हजार एकरी मदत करण्याचा निकष काढला होता. यासंदर्भात रिपोर्टही सरकारकडे पाठवला होता. मात्र त्यांच्या या भुमिकेमुळे सरकार आणि सनदी अधिकाऱ्यांच्या लॉबीचा त्यांना त्रास झाल्याची चर्चा आहे. त्यामुळेच दोन ते …
Read More »कार्यकारी अभियंता गैरहजर : माजी गृहमंत्री प्रचंड चिडले.. वाचा?
‘इथून पुढची सगळी युद्ध ही पाण्याच्या प्रश्नावर होणार असून त्याची सुरुवात पुण्यातून होणार’, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिला आहे. कुकडीचे पाणी नगरचे भाजपचे मंत्री पळवत असल्याने वळसे-पाटील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते. नगर जिल्ह्यातील मंत्री कुकडी प्रकल्पातील पाणी नगर जिल्हयात पळवत आहेत. यामुळे पुणे …
Read More »लाचखोर IAS अधिकारी रामोडच्या मुदतवाढीसाठी महसूलमंत्री विखे पाटलांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती शिफारस
लाचखोर निलंबित आयएएस अधिकारी डॉ. अनिल रामोड याला पुण्याच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदावर एक वर्षाची मुदतवाढ मिळावी, अशी शिफारस महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. मात्र, मुदतवाढीच्या निर्णयाआधीच रामोड 8 लाख घेताना सीबीआयच्या जाळ्यात सापडला. विखे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 1 जूनला रामोड याला मुदतवाढ मिळावी, असे पत्र दिले होते. त्यात त्यांनी रामोड हे ऑक्टोबर 2020 पासून विभागीय …
Read More »तहसीलदार, उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये घोळ? महसूल मंत्री विखे पाटील काय म्हणाले?
महाराष्ट्रात सध्या महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू आहे. या संदर्भात काही अधिकारी व कर्मचारी महाराष्ट्र अपिलेट ट्रिब्युनल (मॅट)मध्ये गेले आहेत. त्यांनी त्यांच्या बदल्यांना स्थगिती मिळवली आहे. या संदर्भात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, या बदलल्यांमध्ये कोणतीही अनियमितता नाही. या बदल्या नियमानुसारच झालेल्या आहेत. दोनशे बदल्यांपैकी फक्त चार ते पाच प्रकरणांमध्ये संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या या …
Read More »
विश्वभारत News Website