Breaking News

प्रशासन

शिंदे-फडणवीस यांच्यात चर्चा,लवकरच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या!

विश्व भारत ऑनलाईन : मुंबई : शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यातील बऱ्याच आयएएस अधिकाऱ्यांना बदलीची प्रतीक्षा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रशियाच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत यासंदर्भात चर्चा केल्याचे समजते. काही मर्जीतील अधिकाऱ्यांची नियुक्ती पुढील आठवड्यात होऊ शकते. तर, यातील काही बदल्या दुसऱ्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे. ठाकरे सरकारच्या मर्जीतील अधिकाऱ्यांना बाजूला करण्याची नियोजन या सरकारचे आहे. अनेक …

Read More »

‘पीडब्लूडी’त बदल्या पारदर्शक करा, अन्यथा कोर्टात याचिका-मोहन कारेमोरे

नागपूर : शासकीय बदल्या म्हटलं की, आर्थिक व्यवहार आलाच. त्यातच सार्वजनिक बांधकाम विभागातील (पीडब्लूडी) बदल्यांचा विषय समोर आल्यास सर्वांच्या भूवया उंचावतात. यंदा बदल्यांमध्ये पारदर्शकता न ठेवल्यास न्यायालयात याचिका दाखल करणार, असा इशारा अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी दिला आहे. एकाच ठिकाणी ठाण मांडून ‘पीडब्लूडी’मध्ये बऱ्याच वर्षांपासून एक अधिकारी एकाच पदावर वर्षांनवर्षे कार्यरत आहेत. तर काही अधिकारी …

Read More »

जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी बेमुदत आंदोलनाच्या तयारीत

विश्व भारत ऑनलाईन : राज्य शासनाच्या सेवेत सन २००५ नंतर रुजू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी 21 सप्टेंबरला राज्यव्यापी रॅलीचे आयोजन केले आहे. तसेच सरकारने वेळीच लक्ष न दिल्यास 17 लाख कर्मचारी बेमुदत आंदोलनाच्या तयारीत आहेत.राजस्थान आणि छत्तीसगढ सरकारने त्यांच्या सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर महाविकास …

Read More »

बदलीसाठी आग्रह धरू नका

विश्व भारत ऑनलाईन : भरती झालेले अन्य जिल्ह्यातील शिक्षक नियुक्ती नंतर पुन्हा आपल्या जिल्ह्यात जाण्यासाठी आग्रही असतात. बदली करून घेणे हा तुमचा हक्क आहे. परंतु, ज्या जिल्ह्यात भरती झाली, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपण ज्ञानदान करणे गरजेचे आहे. त्यासाठी तत्काळ बदलीचा आग्रह न धरता थोडा धीर धरावा, असा सल्ला राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिला. शिक्षण सेवकांच्या मानधनाचा प्रश्‍न मागील …

Read More »

नागपुरातील विद्यार्थ्यांना दिलासा, मेट्रो सुटेल ‘या’ वेळेत

नागपूर : शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन महामेट्रोने सोमवार, १२ सप्टेंबरपासून सकाळी ६.१५ मेट्रोसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. शेवटची मेट्रो रात्री १० वाजता सुटेल. मेट्रोच्या वर्धा मार्गासाठी कस्तुरचंद पार्क आणि खापरी तर हिंगणा मार्गासाठी बर्डी व लोकमान्य नगर अशा चारही स्थानकांवरून सोमवारपासून सकाळी ६.१५ पासून मेट्रोसेवेला सुरुवात होईल. रात्री १० पर्यंत मेट्रो धावेल. या दोन्ही मार्गांवर मेट्रोच्या फेऱ्यांमध्येही वाढ …

Read More »

अप्पर जिल्हाधिकारी हत्याकांडातील आरोपींना जन्मठेप

नाशिक : अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे जळीत हत्याकांडचा तब्बल अकरा वर्षानंतर निकाल लागला आहे. मालेगाव अप्पर जिल्हा सत्र न्यायलयाने तिन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. 25 जानेवारी 2011 साली इंधन माफियानी जिल्हाधिकारी यांची इंधन टाकून हत्या केली होती. शिक्षेचे स्वरूप या घटनेतील मुख्य आरोपी पोपट शिंदे याचा पूर्वीच मृत्यू झाला. तर,यातील अल्पवयीन आरोपीवर बालन्यायालयात खटला सुरू असून उर्वरित उरलेल्या तिघांना …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या कामामुळे अधिकारी वैतागले

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यकारभार हाती घेतल्यापासून आता जवळपास दोन महिने झाले आहेत. मात्र या दोनच महिन्यात मुख्यमंत्री रात्री उशीरापर्यंत बैठका आणि कामकाज करत असल्याने एकनाथ शिंदेंवर अधिकारी वर्ग नाराज असल्याची चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री शिंदे हे प्रोटोकॉल पाळत नसल्याने अधिकारी वर्ग त्रस्त आहे. मुख्यमंत्र्यांच्या नियोजित दौऱ्यात अनेकदा परस्पर फेरफार केली जाते. या बदलाची माहिती पोलीस आणि …

Read More »

रस्त्याच्या प्रकरणात सोयगाव तहसीलमध्ये विष घेण्याचा प्रयत्न

औरंगाबाद : कोणतीही सूचना व सुनावणीची नोटीस न देताच शेतातून बेकायदेशीर रस्ता दिल्याचा निकाल ऐकून ४५ वर्षीय महिलेने सोयगाव तहसील कार्यालयात कीटकनाशक प्राशन करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलीस पोहचले.गंभीर महिलेला तातडीने उपचारासाठी सोयगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.चंद्रकालाबाई पांडुरंग शिंदे (४५, रा. पळाशी, ता. सोयगाव)असे हृदयविकाराच्या झटका येऊन बेशुद्ध महिलेचे नाव आहे. प्रकरण असे… पळाशी शिवारात …

Read More »

चौकशी प्रलंबित, तरीही पदोन्नतीचा प्रस्ताव

– मोहन कारेमोरे मुंबई : जळगावच्या तत्कालीन एका तहसीलदाराविरोधात विभागीय चौकशी प्रलंबित असताना त्यांचा उपजिल्हाधिकारी पदोन्नतीसाठी प्रस्ताव विभागीय आयुक्ताकडून मागितला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाचे महसूल व वन विभागाचे सहसचिव डॉ. माधव वीर यांनी त्यांचा उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती देण्यासाठी विभागीय आयुक्तांकडून प्रस्ताव मागवला आहे, हे विशेष. असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी केला आहे. त्यासंदर्भात गुप्ता …

Read More »