Breaking News

सुजाता सौनिक यांना दिलासा : गृह सचिवपदी इक्बालसिंह चहल : भंडारा SP ची बदली

मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंह चहल यांची गृह खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी बदली करण्यात आली आहे. चहल हे मुख्यमंत्री कार्यालयात येण्याआधी मुंबई महापालिका आयुक्त होते. प्रशासनात मुख्य सचिवानंतर गृह सचिव हे पद महत्त्वाचे मानले जाते. गृह सचिवपदाचा पदभार मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडेच होता.

पोलीस सेवेतील पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : भारतीय पोलीस सेवेतील पाच अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गुरुवारी गृहविभागाकडून जारी करण्यात आले. राज्य गुप्तवार्ता विभागाचे सह आयुक्त निसार तांबोळी यांची नागपूर शहर पोलीस सहआयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. याशिवाय शारदा राऊत यांची विशेष पोलीस महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, मुंबई (सागरी सुरक्षा व विशेष सुरक्षा) यापदी बदली करण्यात आली आहे. भंडाऱ्याचे पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांचीही सहाय्यक पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) या पदी बदली करण्यात आली आहे. तसेच १३ ऑगस्टला जारी करण्यात आलेल्या बदलीतील आदेशांमध्ये बदल करण्यात आले आहे. त्यानुसार नुरुल हसन यांची भंडारा अधीक्षक पदी व निलेश तांबे यांची पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण (नागपूर) या पदी बदली करण्यात आली आहे.

About विश्व भारत

Check Also

मंत्र्याच्या आग्रहावरून जिल्हाधिकाऱ्यांची बदली

उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने एमपीडीए कायद्याचा बेजबाबदारपणे वापर केल्याचा ठपका ठेवल्यापासून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद चांगलेच …

दोन न्यायाधीश निलंबित : मुंबई हायकोर्टाचा निर्णय

सातारा जिल्हा न्यायाधीश धनंजय निकम आणि पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश इरफान शेख या दोघांना सेवेतून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *