Breaking News

विश्व भारत

‘पीडब्लूडी’चे कार्यकारी अभियंता बांधवकर सेवानिवृत्त : टिकले यांनी स्वीकारला पदभार

सार्वजनिक बांधकाम विभागातील (पीडब्लूडी) कार्यकारी अभियंता (विशेष प्रकल्प) मिलिंद बांधवकर नियत वयोमानासमोर निवृत झाले. त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.बांधवकर यांच्या निवृत्तीनंतर नवे कार्यकारी अभियंता म्हणून टिकले यांनी पदभार स्वीकारून कामकाजाला सुरुवात केला.

Read More »

जलसंपदा विभागात पदोन्नती घोटाळा

जलसंपदा विभागाचा अजब- गजब कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. पदोन्नतीसाठी पात्र जलसंपदा विभागातील उपविभागीय अधिकाऱ्यांना डावलून कार्यकारी अभियंता या पदावर सहायक अभियंता (श्रेणी-1) या पदावरील अभियंत्यांना पदोन्नती देण्यात आली. विशेष म्हणजे ही पदोन्नती देताना कार्यकारी अभियंता या पदावर केवळ ‘अकरा महिन्यांचा तात्पुरता पदभार देण्यात येत आहे, असे जलसंपदा विभागाने आदेशात म्हटले आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाचा सावळा गोंधळ उघड झाला …

Read More »

बीडीओ निलंबित : विहीर मंजूरीसाठी शेतकऱ्यांकडे पैशांची मागणी; सरपंचाने केली नोटांची उधळण

विहीर मंजूर करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील फुलंब्री पंचायत समितीचे गटविकास (बीडीओ) अधिकाऱ्याने शेतकऱ्यांना पैसे मागितले. त्यामुळे संतप्त सरपंचाने पंचायत समिती कार्यालयासमोर नोटा उधळत आंदोलन केल्याची घटना फुलंब्री तालुक्यात शुक्रवारी (ता.31) घडली. यात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी बीडीओ ज्योती कवडदिवे यांना तात्काळ निलंबित केले आहे. काय आहे प्रकरण? गेवराई पैधा गावचे सरपंच मंगेश साबळे यांनी गळ्यात दोन लाख रुपयांच्या …

Read More »

तीन अफेअर, तरीही ‘ही’ अभिनेत्री अविवाहित

अजय देवगण व तब्बूची मुख्य भूमिका असलेल्या ‘भोला’ चित्रपटाची चर्चा सुरू आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटातील अजयसह तब्बूच्या भूमिकेचेही विशेष कौतुक होताना दिसत आहे. तब्बूने आजवर बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. तब्बू तिच्या कामाबरोबरच खासगी आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत असते. अजूनही ती अविवाहितच आहे. पण तिचं नाव कलाक्षेत्रातील काही मंडळींशी जोडलं गेलं. ‘प्रेम’ चित्रपटामध्ये तब्बूसह संजय …

Read More »

महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नावे फसवणूक : पैसेही उकळले

छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्या पत्नी आणि लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएस अधिकारी मोक्षदा पाटील यांचं फेक ट्वीटर अकाऊंट तयार करण्यात आले.त्यानंतर या ट्वीटरच्या माध्यमातून पैसे उकळण्यात आले. हा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) या ठिकाणी उघडकीस आला आहे. मागच्या काही वर्षांपासून ऑनलाईन फसवणूकीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. आपला ओटीपी, बँक अकाऊंट नंबर, क्रेडिट किंवा डेबिट …

Read More »

रामभक्तांविरोधात वनविभागाची पोलिसात तक्रार

हिंदूंचे श्रद्धास्थान अयोध्येतील राम मंदिरासाठी आलापल्ली येथून सागवान पाठवण्यात येणार आहे. तत्पूर्वी येथील रामभक्तांनी त्या सागवानाचे काष्ठपूजन करून शोभायात्रा काढली. परंतु, या राम भक्तांविरोधात वनविकास महामंडळाने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. प्रशासनाच्या या हेकेखोर वृत्तीवर रामभक्तांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. प्रकरण काय आहे? जगातील सर्वोत्कृष्ट सागवान म्हणून आलापल्ली वनविभागातील सागवान ओळखल्या जाते. ब्रिटनपासून नव्या संसद …

Read More »

कृषीमंत्र्याच्या सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात भ्रष्टाचाराचं पीक : महसूल, कृषी विभागाकडून सामान्यांची गळचेपी

✍️मोहन कारेमोरे राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड मतदारसंघामध्येच कृषी अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर आले आहे. लाचलुचपत प्रतिबंध विभागाने याप्रकरणी तीन जणांना रंगेहात पकडले आहे. यात तालुका कृषी अधिकारी शिरीष घनबहादुर, मंडळ कृषी अधिकारी विजयकुमार नरवडे, कंत्राटी ऑपरेटर सागर नलावडे आणि कृषी अधिकारी बाळासाहेब संपतराव निकम यांना 24 हजार 500 रुपये घेताना रंगेहात अटक केली आहे. लाचलुचपत प्रतिबंध …

Read More »

तुमसर, भंडारा, गोंदियात युरियाचा तूटवडा : शेतकरी चिंतेत

ऐन रब्बी‎ हंगामात पूर्व विदर्भात(भंडारा, तुमसर, गोंदिया) युरिया खताचा तुटवडा‎ निर्माण झाला आहे. रब्बीच्या ‎उत्पादनात घट होऊ शकते. ‎शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण‎ आहे.अति पावसामुळे खरीप हंगाम ‎पूर्णतः वाया गेल्यामुळे शेतकरी‎ आधीच मेटाकुटीला आला आहेत.‎ असे असताना खरिपातील‎ नुकसान रब्बी हंगामात भरुन‎ काढण्यासाठी शेतकरी प्रयत्नरत‎ आहेत. मात्र, ही आशाही आता‎ पूर्णतः मावळताना दिसत आहे.‎ जानेवारीमध्येच युरिया खताचा‎ तुटवडा निर्माण झाला आहे. कृषी‎ …

Read More »

अमरावतीत बदली घोटाळा : 200 कर्मचाऱ्यांची होणार चौकशी, बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रे

जिल्हाअंतर्गत व आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत सोयीच्या ठिकाणी बदली आणि पदस्थापनेसाठी अनेक शिक्षकांनी दुर्धर आजार तसेच अपंगत्वाच्या बनावट प्रमाणपत्रांचा आधार घेतल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. यासंदर्भात प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांनी अमरावती विभागीय आयुक्‍त निधी पांडे यांना निवेदन दिले. बनावट प्रमाणपत्राच्या आधारे बदली घेणाऱ्या अमरावती विभागातील दोन हजारावर शिक्षकांच्या कागदपत्रांची चौकशी व वैद्यकीय तपासणी करण्याचे आश्वासन विभागीय आयुक्त …

Read More »

गजानन महाराजांच्या भक्तांसाठी खूशखबर… वाचा

विदर्भाची पंढरी अशी ओळख असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील शेगावच्या संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे. कारण, भाविकांसाठी शेगाव स्टेशनला 3 ट्रेनचा थांबा देण्यात आला आहे. अकोला स्थानकावरून जाणाऱ्या नागपूर-पुणे एक्स्प्रेससह तीन एक्स्प्रेस गाड्यांना प्रायोगिक तत्वावर 6 महिने थांबा देण्यात आला आहे. प्रवाशांच्या प्रतिसादानुसार हा थांबा कायमस्वरुपी केला जाऊ शकतो. नागपूर-पुणे-नागपूर एक्स्प्रेस, अमृतसर-नांदेड एक्स्प्रेस, जम्मुतावी-नांदेड हमसफर एक्स्प्रेस …

Read More »