Breaking News

विश्व भारत

विदर्भात उद्यापर्यंत ढगाळ वातावरण : तीन दिवसांत तापमान वाढेल

राज्यात सोमवार, अर्थात 20 मार्चपासून विदर्भ वगळता उर्वरित भागात पावसाळी वातावरण कमी होणार आहे. विदर्भात मंगळवारपर्यंत ढगाळ वातावरण राहील. सोमवारपासून पुढील तीन दिवसाच्या कमाल तापमानात 4 अंश सेल्सियसने वाढ होण्याचा अंदाज आहे. राज्यात गारपिटीचा कालावधी 26 जानेवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत असतो. कधी मार्चअखेर किंवा एप्रिलमध्येही गारपीट होते. देशात सर्वात जास्त गारपीट महाराष्ट्रात होते. त्यातही उत्तर विदर्भात तिचा जोर अधिक असतो. …

Read More »

550 एकर जमीन : 30 वर्षांपासून करतात पायी प्रवास, कोण हे सन्यासी बाबा?

असे म्हणतात की, जो भक्तीमध्ये दंग होतो तो दैवी शक्तीसमोर सर्व मोह माया विसरून जातो. उत्तर प्रदेशातील साहिर औरैया येथे राहणारे ध्रुवदास बाबा गेल्या तीस वर्षांपासून पायी तीर्थयात्रा करत आहेत. महाराजांनी देशभरातील मंदिरांना भेटी दिल्या आहेत. या महाराजांची एक डायरी आहे, ज्यामध्ये ते आपल्या सर्व चांगल्या-वाईट कर्मांचा हिशेब लिहितात, आज जाणून घेऊयात, संन्यासी बाबांचा प्रवास. ध्रुवदास महाराजांच्या आईचे लहानपणीच निधन …

Read More »

आधी हनीमून करू द्या, नंतर लग्नाचं बघू : मलायका-अर्जुनचा हटके अंदाज

प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा ही डान्स आणि फिटनेससाठी ओळखली जाते. ती नेहमी चर्चेत असते. आपल्‍या प्रोफेशनल जीवनशैलीसोबतच मलायकाची पर्सनल जीवनशैलीही नेहमी चर्चेत असते. मलायका आणि अरबाज खान हे 2016 पासून वेगळे झाले. त्‍यानंतर ती अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आली. अर्जुन-मलायकाची जोडी तीच्या चाहत्यांना खूप आवडते आणि चाहते त्‍यांच्या लग्नाबद्दल तीला नेहमी सोशल मिडीयावर प्रश्न विचारत असतात. मलायका काय म्हणाली… आम्‍ही प्री-हनिमून …

Read More »

तांदूळ हजार रुपये किलो… कुठे मिळतोय?

जगभर तांदळाचे अनेक प्रकार असून बहुतांश लोकांच्या आहारात भात असतोच. चव व सुगंधाप्रमाणे तांदळाच्या किमतीही कमी-जास्त असतात. जगातील सर्वात महागडा तांदूळ अरब देशांमध्ये पिकवला जातो. या तांदळाची किंमत एक हजार रुपये प्रतिकिलो असते. हा तांबडा तांदूळ तिकडे विशेषतः बिर्याणीसाठी वापरला जातो. वाळवंटात पिकणारा तांदूळ चवीला अतिशय स्वादिष्ट व भरपूर पोषणमूल्यांचा असतो असे मानले जाते. जगभरातील श्रीमंत लोक असा तांदूळ मागवत …

Read More »

मायबाप सरकार शेतकऱ्यांचे हाल बघा न? : गारपिटीचा पिकांना तडाखा,संपामुळे पंचनामे रखडले

राज्याला गारपिटीचा जबरदस्त तडाखा बसत आहे. सलग दोन दिवस सुरू गारपिटीमुळे राज्याच्या अनेक भागांतली पिकं मातीमोल झाली. मराठवाड्याला गारपिटीचा सर्वाधिक फटका बसला. अवकाळी पावसामुळे मराठवाड्यात सहा तर विदर्भात एक बळी गेला. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातली रब्बी पिकं या गारपिटीनं आणि अवकाळी पावसानं उध्वस्त झाली. त्यातच राज्य सरकार कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे नुकसानीचे पंचनामे रखडले. लातूर वादळी वाऱ्यासह गारपीट झालीय. आणि त्याचा …

Read More »

संपामुळे महसुलात मोठी घट : दस्त नोंदणी निम्म्यावर

कर्मचाऱ्यांच्या संपाचा दस्त नोंदणीला मोठा फटका बसला आहे. राज्यभरातील, विशेषत: ग्रामीण भागांतील नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या कार्यालयांत कर्मचारी नसल्याने दस्त नोंदणी निम्म्यावर आली आहे. त्यामुळे मुद्रांक शुल्काच्या रुपाने मिळणाऱ्या महसुलात मार्चमध्ये घट होईल. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागातर्फे मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहाराची दस्त नोंदणी करण्यात येते. त्यातून मुद्रांक शुल्काच्या रुपात राज्याला मोठा महसूल मिळतो. जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी …

Read More »

गडचिरोलीत वीज कोसळून नववीतील विद्यार्थिनीचा मृत्यू

गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील माल्लेर चक येथील एका विद्यार्थिनीचा शनिवारी वीज कोसळून मृत्यू झाला. स्वीटी बंडू सोमनकर (वय 15) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती कुनघाडा येथील विश्वशांती विद्यालयात नववीच्या वर्गात शिकत होती. घटना कशी घडली? आज सकाळी शाळा सुटल्यानंतर स्वीटी सोमनकर ही सायकलने दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या माल्लेर चक या आपल्या गावाकडे जात होती. मात्र, त्याचवेळी मेघगर्जना आणि विजांच्या …

Read More »

जळगावजवळ कुशीनगर एक्सप्रेसमध्ये लागली आग

कुशीनगर एक्सप्रेसमध्ये एका प्रवाशाच्या बॅगने अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. मात्र तरूणाने प्रसंगावधान राखत बॅगेची आग विझवून लागलीच बाहेर फेकली. यामुळे मोठा अनर्थ टळला. लोकमान्य टिळक टर्मिनस येथून गोरखपुरच्या दिशेने जाणारी कुशीनगर एक्सप्रेस मधील इंजिनपासून तिसऱ्या क्रमांकाच्या जनरल बोगीमध्ये नांदगाव ते न्यायडोंगरी रेल्वे स्थानकादरम्यान एका प्रवाशी बॅगने अचानक पेट घेतला. सदरचा प्रकार प्रवाशांच्या लक्षात येताच डब्ब्यात एकच खळबळ उडाली. …

Read More »

‘पीडब्लूडी’सचिव दशपुत्रे यांनी स्वीकारला पदभार : मोहन कारेमोरे यांनी केले स्वागत

नागपूर विभागाचे मुख्य अभियंता दशपुत्रे यांची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्लूडी) सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक आणि सामाजिक कार्यकर्ते मोहन कारेमोरे यांनी अलीकडेच दशपुत्रे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाचे (पीडब्लूडी) सचिव प्रशांत नवघरे यांचे अलीकडेच हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या जागेवर दशपुत्रे यांनी पदभार स्वीकारला आहे.

Read More »

तुम्हाला पाणीपुरी आवडतेय?ही बातमी वाचा

पाणीपुरी खायला अनेकांना प्रचंड आवडते. काही जण तर पाणीपुरीशिवाय राहूच शकत नाहीत. पाणीपुरी हा पदार्थ कॉलेजच्या गॅदरिंगपासून, घरच्या घरी बनवण्यापर्यंत ते अगदी लग्नात खाण्यापर्यंत सगळ्यांनाच आवडतो. त्यामुळे आपणही पाणीपुरीचा बेत कधीच चुकवत नाही. परंतु तुम्हाला माहितीये का, पाणीपुरी खाण्याचे अनेक फायदे आहेत,त्यातून फक्त फायदेच नाहीत तर त्याचे अनेक तोटेही आहेत. चला तर मग जाणून घेऊया की आपण खातो ती टेस्टी …

Read More »