ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एका हॉटेल चालकाने चिकन,मटणाचा फुकट सूप देण्याचे सुरू केले होते. ग्राहकांचा प्रतिसाद वाढल्याने एका हॉटेल चालकावर कोयत्याने वार करुन बेदम मारहाण करण्यात आली.ही घटना पुण्यातील खडकी भागात घडली. या प्रकरणी दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यावसायिक स्पर्धेतून उपहारगृहाचालकावर हल्ला करण्यात आल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे.मुलायम रामकृपाल पाल (वय 27, रा.दुर्गा माता मंदिराजवळ, मिलिटरी डेअरी …
Read More »नागपुरात प्रॉपर्टीवरून मित्राचा खून
प्रॉपर्टी डीलिंगच्या व्यवसायात असलेल्या दोन मित्रांमध्ये कमिशनच्या पैशावरून एकाचा खून करण्यात आला.ही घटना नागपूर येथील अग्रसेन चौकात घडली. परवेज शेख उर्फ पापा मिया शेख (वय ३०, रा. खरबी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी संशयीत आरोपी प्रॉपर्टी डीलर परवेज याकुब खान (वय २८, रा. पारडी) याच्यासह त्याच्या चार सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. परवेज खान व परवेज शेख या दोघांची …
Read More »‘जलयुक्त शिवार’ची कामे तातडीने सुरू करा-जिल्हाधिकारी पांडेय
जलयुक्त शिवार अभियानाबाबत तालुकानिहाय समिती स्थापन करावी. याबाबतची कामे सात दिवसांत सुरू करावे, अशा सूचना औरंगाबाद जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी दिल्या. समन्वयाने शिवार फेरीच्या माध्यमातून गावाचा जलआराखडा तयार करून जलयुक्त शिवार अभियानाचा दुसऱ्या टप्प्याची कामे सुरू करा, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी जलयुक्त शिवार अभियानाच्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. …
Read More »शेतकरी वाऱ्यावर : न्यायाधिशाविना नागपूर महसूल न्यायाधिकरण
महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणात न्यायाधीस नसल्याने शेतकऱ्यांच्या प्रकरणावर परिणाम होत आहे. नागपूर येथील महसूल न्यायाधिकरणात दोन न्यायाधीस पाहिजेत. मात्र, एक न्यायाधीस एक पद रिक्त आहे. मागील एक वर्षांपासून एका देवस्थानचे प्रकरण थंडबसत्यात अडकून पडले आहे, असा दावा नागपूर हायकोर्टातील वकील मनोज मिश्रा यांनी केला आहे. तसेच कर्मचारी निव्वळ मोबाईलवर असतात. कामाचा ढिगारा असतानाही न्यायाधिकरणात कर्मचारी मनोरंजन करीत असतात. विदर्भातील बऱ्याच शेतकऱ्यांचे …
Read More »केदार करणार मध्यस्थी : पटोले-थोरात वाद, पटोलेंची भूमिका अयोग्य!
राज्यातील काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यात वादाची ठिणगी पेटली आहे. हा वाद शांत करण्यासाठी 15 फेब्रुवारीला मुंबईत बैठक होणार आहे. यात विदर्भातील काँग्रेसचे दिग्गज नेते सुनील केदार यांची भूमिका महत्वाची असेल. चार भिंतीच्या आत हा वाद संपवायचा आहे. हायकमांडकडे न जाता राज्यातील वाद येथेच कसा मिटविता येईल, याकडे लक्ष केंद्रीत केले जाणार …
Read More »नागपुरात हरविला विराट कोहलीचा मोबाईल
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटीसाठी भारतीय क्रिकेट संघ नागपुरात आहे. या दोन्ही संघाची नागपुरात जोरदार तयारी सुरु असताना माजी कर्णधार विराट कोहलीच्या ट्विटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याच्या या ट्वीटवर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. आपला नवा कोरा फोन हरवला असून तो कोणाला सापडला का, असा प्रश्न कोहलीने ट्विटच्या माध्यमातून केला आहे. अर्थातच नागपुरात खळबळ माजली असली तरी हा फोन …
Read More »सिद्धार्थ-कियाराचा लग्न सोहळा अचानक थांबवावा लागला : काय कारण?
बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी अखेर विवाहबद्ध झाले असले तरी काहीतरी समस्या डोके वर काढत आहे. राजस्थान जैसलमेर या ठिकाणी असलेल्या सूर्यगढ पॅलेसमध्ये दोघांनी सप्तपदी घेत लग्नगाठ बांधली. रविवारी 5 फेब्रुवारीपासून सिद्धार्थ-कियारा यांच्या विवाहापूर्वीच्या सभारंभांना सुरुवात झाली होती. मात्र याच दरम्यान सिद्धार्थचे वडील सुनील मल्होत्रा यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याचे वृत्त आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोमवारी 6 फेब्रुवारीला सूर्यगढ …
Read More »बिअर बार मालकाकडून लाच : तिघे अटकेत
नाशकातील निफाड येथील बिअर बार मालकाकडून 9 हजारांची लाच घेताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या फिरत्या पथकातील कर्मचारी व अन्य दोघांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ अटक केली. हॉटेल व्यवसायात त्रुटी न काढण्यासाठी वार्षिक हप्ता म्हणून संबंधितांनी ही रक्कम मागितली होती. तक्रारदार व्यक्तीचा बार आणि रेस्टॉरंटचा व्यवसाय असून, त्याचे तीन ठिकाणी दुकाने आहेत. या तीनही दुकानांमधून हॉटेल व्यवसाय कामांमध्ये त्रुटी न काढता व्यवसाय …
Read More »बाळासाहेब थोरात भाजपात? भाजपच्या मोठ्या नेत्याचा दावा
नाशिक पदवीधर निवडणुकीनंतर आमदार सत्यजीत तांबे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली.तर दुसरीकडे बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे.अशातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठे वक्तव्य केले. सर्वांसाठी आमच्या पक्षाचे दरवाजे उघडे आहेत, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी सत्यजीत तांबे यांच्यासह थोरातांना थेट ऑफरच दिली आहे. …
Read More »न्यायमूर्ती गौरी यांची राजकीय पक्षाशी जवळीक : नियुक्तीला आव्हान, सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
मद्रास हायकोर्टाच्या अतिरिक्त न्यायमूर्तीपदी निुयक्ती झालेल्या अॅड. लक्ष्मणा चंद्र व्हिक्टोरिया गौरी यांच्या नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली. ही सुनावणी मंगळवारी अर्थात आज होईल. व्हिक्टोरिया गौरी यांचा भाजपशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला आहे. गौरी यांना अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्त करण्याबाबत केंद्र सरकारने काढलेल्या अधिसूचनेकडे लक्ष वेधून ज्येष्ठ वकील राजू रामचंद्रन यांनी नव्याने उल्लेख …
Read More »
विश्वभारत News Website