Breaking News

विश्व भारत

70 व्या वर्षी ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने केले लग्न

मराठीतील ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते गेली अनेक वर्ष अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून अनेक दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांसाठी आतापर्यंत घेऊन आल्या आहेत. त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या त्यांच्या चाहत्यांशी संपर्कात रहात असतात. तर आता पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली असल्याचं त्यांनी सोशल मीडियावरून सांगितले. वंदना गुप्ते यांच्या लग्नाचा नुकताच 50वा वाढदिवस …

Read More »

‘… तुला लाज वाटली पाहिजे’, या अभिनेत्रीवर चिडले हिंदू

एका फॅशन वीकमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नूने डीप नेक गाऊन परिधान केला होता. मात्र, तिने जो गाऊन परिधान केला त्यावर हिंदू देवीचा अपमान केला आहे. तापसीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या फोटोंवर लोक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले, ‘अशा अश्लील ड्रेससोबत मां लक्ष्मीचा हार घातला, तुला लाज वाटली पाहिजे.’ आणखी एका यूजरने लिहिले की, ‘तापसीला लाज वाटली पाहिजे. …

Read More »

गुढीपाडवा : कडूलिंबाच्या पानांचा प्रसाद बनवा घरीच

चैत्र पाडव्याला घरोघरी गुढी उभारून मराठी नववर्षावचे स्वागत करून सुरुवात करतो. यंदाचा गुढीपाडवा आणि मराठी नववर्ष 22 मार्च रोजी सर्वत्र साजरा होत आहे. या दिवशी घरातील वातावरण प्रसन्न ठेवत असून सर्वजण आपआपल्या दारात गुढ्या उभारून त्याचे पूजन करतात. यावेळी खास करून पुरणपोळीचा बेत आखला जातो. सोबतचं नैवेद्यासाठी कडूलिंबाच्या पानांचाही वापर केला जातो. कडूलिंबाच्या पाने आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असल्याने या दिवशी …

Read More »

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्नुषा स्वामिनी सावरकर यांचे निधन

  स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्नुषा तसेच हिंदुमहासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कै. विक्रमराव सावरकर यांच्या अर्धांगिनी स्वामिनी सावरकर यांचे पुणे येथे अल्पशा आजाराने वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने सावरकरभक्तांमध्ये शोककळा पसरली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा वारसा आयुष्यभर जपत त्यांनी विक्रमराव सावरकर यांनाही त्यांच्या संघटन कार्यात साथ दिली. प्रज्वलंत या सावरकरांच्या विचारांवरील मासिकाचे कामकाज त्यांनी सांभाळले. मुरबाड (ठाणे) येथील …

Read More »

चंद्रपूर, गडचिरोलीत भूकंप

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुका आणि गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील महागाव (बु.) येथे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती आहे. तेलंगणा राज्यातही काही भागांना भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. भूकंपाची तीव्रता ३.१ रिष्टर स्केल होती. जमिनीच्या ५ किमी आत हे धक्के बसल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. गोदावरी फॉल्ट परिसर हा भूकंपप्रवण भाग असल्याचे सांगितले जात आहे. मंगळवार, २१ मार्च रोजी सकाळी ८.४२ वाजता …

Read More »

एक लाखाची लाच : अहवाल चांगला तयार करण्याचे प्रकरण

पतसंस्थेचे लेखापरीक्षण करण्यासाठी तीन लाखांच्या लाचेची मागणी करून, त्यापैकी एक लाखाची रक्कम स्वीकारताना विशेष लेखापरीक्षक आणि खासगी लेखापरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि. 20) रंगेहाथ पकडले. नेवासा फाटा येथे लावलेल्या सापळ्यात दोघांना पकडण्यात आले. जिल्हा विशेष लेखापरीक्षक कार्यालयातील विशेष लेखापरीक्षक किसन दिंगबर सागर (रा. छत्रपती संभाजीनगर) आणि खासगी लेखापरीक्षक तय्यब वजीर पठाण (रा. जवळे खुर्द, ता. नेवासा) अशी दोघा लाचखोरांची …

Read More »

कोणी दिला दगा?महाराष्ट्राला वेठीस ठेवून कर्मचाऱ्यांना काय मिळाले?

जुनी पेन्शनसह अन्य मागण्यांसाठी मागील 7 दिवसांपासून सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. या संपामुळे राज्यातील शासकीय रुग्णालय ते निमशासकीय कर्मचारीही संपात सामील झाले होते. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठे हाल सहन करावे लागले. या संपामुळे आमदार ते सर्वसामान्यांच्या टीकेला सुद्धा कर्मचाऱ्यांना सामना करावा लागला. मुख्यमंत्री शिंदेंनी आश्वसन दिल्यानंतर हा संप मागे घेतला. पण, या 7 दिवसांच्या संपातून कर्मचाऱ्यांच्या हाती काय लागले? हा …

Read More »

विदर्भात उद्यापर्यंत ढगाळ वातावरण : तीन दिवसांत तापमान वाढेल

राज्यात सोमवार, अर्थात 20 मार्चपासून विदर्भ वगळता उर्वरित भागात पावसाळी वातावरण कमी होणार आहे. विदर्भात मंगळवारपर्यंत ढगाळ वातावरण राहील. सोमवारपासून पुढील तीन दिवसाच्या कमाल तापमानात 4 अंश सेल्सियसने वाढ होण्याचा अंदाज आहे. राज्यात गारपिटीचा कालावधी 26 जानेवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत असतो. कधी मार्चअखेर किंवा एप्रिलमध्येही गारपीट होते. देशात सर्वात जास्त गारपीट महाराष्ट्रात होते. त्यातही उत्तर विदर्भात तिचा जोर अधिक असतो. …

Read More »

550 एकर जमीन : 30 वर्षांपासून करतात पायी प्रवास, कोण हे सन्यासी बाबा?

असे म्हणतात की, जो भक्तीमध्ये दंग होतो तो दैवी शक्तीसमोर सर्व मोह माया विसरून जातो. उत्तर प्रदेशातील साहिर औरैया येथे राहणारे ध्रुवदास बाबा गेल्या तीस वर्षांपासून पायी तीर्थयात्रा करत आहेत. महाराजांनी देशभरातील मंदिरांना भेटी दिल्या आहेत. या महाराजांची एक डायरी आहे, ज्यामध्ये ते आपल्या सर्व चांगल्या-वाईट कर्मांचा हिशेब लिहितात, आज जाणून घेऊयात, संन्यासी बाबांचा प्रवास. ध्रुवदास महाराजांच्या आईचे लहानपणीच निधन …

Read More »

आधी हनीमून करू द्या, नंतर लग्नाचं बघू : मलायका-अर्जुनचा हटके अंदाज

प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा ही डान्स आणि फिटनेससाठी ओळखली जाते. ती नेहमी चर्चेत असते. आपल्‍या प्रोफेशनल जीवनशैलीसोबतच मलायकाची पर्सनल जीवनशैलीही नेहमी चर्चेत असते. मलायका आणि अरबाज खान हे 2016 पासून वेगळे झाले. त्‍यानंतर ती अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आली. अर्जुन-मलायकाची जोडी तीच्या चाहत्यांना खूप आवडते आणि चाहते त्‍यांच्या लग्नाबद्दल तीला नेहमी सोशल मिडीयावर प्रश्न विचारत असतात. मलायका काय म्हणाली… आम्‍ही प्री-हनिमून …

Read More »