नागरिकांना गावातून थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणे सोयीस्कर व्हावे, या उद्देशाने प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापनेचा निर्णय घेण्यात आला. प्रत्यक्षात जिल्हाधिकारी कार्यालयातील असा कोणताही स्वतंत्र मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन झालाच नाही. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवक -जावक विभागातच नागरिकांच्या तक्रारी घेतल्या जात आहेत, ही बाब समोर आली. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १७ जानेवारी २०२० रोजी सरकार गतिमान करण्यासाठी जिल्हाधिकारी …
Read More »मंडळ अधिकारी निलंबित
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील गणेशनगरमधील अवैध खडीक्रशर प्रकरणात मंडल अधिकारी बी. एन. पैठणकर यांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी ही कारवाई केल्याने महसूल विभागामध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणी अधिकाऱ्याचे निलंबन झाले असले, तरी प्रशासन अवैध उत्खनन करणाऱ्या खडीक्रशरचालकांवर कारवाईस धजावणार का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. मालेगावचे अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे व जिल्हा गौण खनिज …
Read More »‘पीडब्लूडी’मध्ये चार काेटींचा घाेटाळा ; कारवाई थंडबस्त्यात
रत्नागिरीच्या चिपळूण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या(पीडब्लूडी)लेखा विभागातील दोघांनी ४ कोटी ८ लाखाचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला होता. मात्र, यात अनेकांना अभय देण्यात येत असल्याची माहिती आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांवर संशयाची सुई आहे. प्रकरण काय आहे? ठेकेदारांनी ठेवलेली अनामत रक्कम परस्पर ऑनलाईन पद्धतीने बोगस ठेकेदाराच्या नावाने वळवले आहे. या प्रकरणी एका महिलेसह सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या दोन …
Read More »राज ठाकरेंना अनभिज्ञ् ठेवण्याचा ‘प्लॅन’ : दुरुगकरच्या कारनाम्यामुळे मनसेला निवडणुकीत फटका!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे आज शुक्रवारी नागपुरात येत आहेत. अनेकांकडून खंडणी घेतल्याच्या आरोपाने मनसेचा नागपूर जिल्हाध्यक्ष (ग्रामीण)आदित्य दुरुगकर याच्यावर राज ठाकरे कोणती कारवाई करणार?याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनसेची जनमाणसातील प्रतिमा मलीन होत आहे. येत्या काळात महानगरपालिका निवडणूक असल्याने दुरुगकरच्या खंडणीमुळे मनसेला चांगलाच फटका बसू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या दौऱ्याला विशेष महत्त्व …
Read More »खंडणीखोर दुरुगकरची हकालपट्टी कधी? : राज ठाकरे उद्या नागपुरात
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे उद्या शुक्रवारी (ता.२३) नागपूर येत असून ते खंडणीखोर नागपूर जिल्हाध्यक्ष (ग्रामीण)आदित्य दुरुगकर याच्यावर राज ठाकरे काय कारवाई करतात याकडे सर्व सैनिकांचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे यांच्यासमक्ष खंडणीचा विषय कोणी काढू नये याची खबरदारी विदर्भातील एक बडा आणि दुरुगकरचा पाठिराखा असलेल्या एक पदाधिकारी घेत आहे. त्याकरिता नागपूर विमातळापासूनच ठाकरे यांच्या मागेपुढे कार्यकर्त्यांची फौज ठेवली …
Read More »राज्यात जुनी पेन्शन योजना लागू होणार? फडणवीस विधिमंडळात काय म्हणाले…
देशभरातील कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. काही राज्य सरकारांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसादही दिला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, अशी मागणी पुढे आली. मात्र,अधिवेशनाच्या विधिमंडळात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली असून ही योजना लागू करता येणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ‘जुनी पेन्शन योजना लागू …
Read More »नागपूर : कामगार कल्याण मंडळात भ्रष्टाचार, बोगस लाभार्थ्यांच्या नावाने कोट्यवधींची लूट
नागपूरच्या सावनेर तालुक्यातील परिसरातल्या 18 बोगस कामगारांच्या नावानं कामगार कल्याण मंडळाने निधी वाटप केल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे एका मृत व्यक्तीच्या नावानं तब्बल 2 लाख 34 हजार रुपये लाटण्यात आले. कामगाराला जर या मंडळाशी संबधित कुठल्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्या कामगाराची मंडळाकडे नोंदणी असणं बंधनकारक आहे. मात्र ज्या कामगारांना लाभ देण्यात आले आहेत, त्यातील एकही कामगार नोंदणीकृत नसल्याचं …
Read More »राज ठाकरेंना धक्का,नागपूर जिल्हाध्यक्ष खंडणीत अडकल्याने मनसेची डोकेदुखी
नागपूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुगकर खंडणी प्रकरणात अडकल्याने राज ठाकरे यांना धक्का बसलाय. या प्रकरणामुळे मनसेची चांगलीच डोकेदुखी वाढू शकते. अशा खंडणीखोर पदाधिकाऱ्याला अटक झाल्याने पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी होऊ शकते. काही आठवड्यापूर्वी राज ठाकरेंनी विदर्भाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी ग्राऊंड लेव्हलवरची परिस्थिती जाणून घेतली होती.कार्यकारिणी बरखास्त केली आणि घटस्थापनेला नवीन कार्यकारिणी स्थापन करण्याची घोषणा केली. …
Read More »खंडणी मागणारा नागपूर मनसेचा जिल्हाध्यक्ष अटकेत
एका दुकानदाराला दोन लाखांची खंडणी मागणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुगकरला गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना उमरेड तालुक्यातील कुही येथे घडली. दुरुगकर हा चार-पाच कार्यकर्त्यांना घेऊन कुही गावात गेला. आम्ही अन्न व प्रशासन विभागाचे (एफडीए) अधिकारी आहोत, असे सांगून एका दुकानाची झाडाझडती घेतली. दुकानात सुगंधी तंबाखू आढळल्याचे सांगून दोन लाखांची खंडणी मागितली. दुकानदाराला खरंच अधिकारी असल्याचे समजले. …
Read More »मृद व जलसंधारण विभागात 670 पदांसाठी भरती, मार्चमध्ये परीक्षा
मृद व जलसंधारण विभागात ‘गट ब’ (अराजपत्रित) संवर्गातील ६७० पदांची सरळसेवेने भरती करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. डिसेंबरमध्ये भरती प्रक्रियेची कार्यवाही सुरू होईल. ३१ डिसेंबरपूर्वी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध होणार असून मार्च २०२३ मध्ये परीक्षा होईल. या भरती प्रक्रियेसाठीच्या निवड समितीला ३१ डिसेंबरपूर्वी जाहिरात प्रसिद्ध करावी लागणार आहे. उमेदवारांचे अर्ज मागविणे, परीक्षेचे ओळखपत्र पाठविण्याची प्रक्रिया ३१ जानेवारीपर्यंत होईल. परीक्षेचा कालावधी १५ …
Read More »
विश्वभारत News Website