Breaking News

विश्व भारत

आंनदवार्ता : आता हजार रुपयांत होणार कॅन्सरवर उपचार

एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झाला की, त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. केवळ वेदनाच नव्हते तर उपचारांसाठी होणारा खर्च देखील जास्त असून तो प्रत्येकालाच परवडत नाही. मात्र आता या रूग्णांसाठी एक दिलासादायक आणि चांगली बातमी आहे. ब्रेस्ट कॅन्सर म्हणजेच स्तनांचा कर्करोग आता अवघ्या हजार रुपयांत बरा होणार आहे. मुंबईतील टाटा रुग्णालयात याबाबत महत्त्वाचं संशोधन केलंय. संशोधनाच्या अहवालाअंती योग आणि व्यायाम केल्याने स्तनांच्या कर्करुग्णांत …

Read More »

नागपूर : गोळीबारात जखमी झालेल्या जवानाचा मृत्यू

नागपूर जिल्ह्यातील कन्हान खाण परिसरातील गोळीबारात गंभीर जखमी जवानाचा अखेर कामठी येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. वेकोलीच्या खाण क्रमांक सहा परिसरात महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानावर बेछूट गोळीबार करण्यात आला होता. गंभीर जखमी झालेला मिलिंद समाधान खोब्रागडे (वय २९, मूळ रा. अकोला) याच्यावर कामठीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. या प्रकरणात पोलिसांनी समीर सिद्दीकी (वय २९ रा. कॉलरी टेकडी) व राहुल …

Read More »

हिवाळ्यात वजन कमी करण्यासाठी पीठ खा : पण कोणते…

वजन कमी करण्यासाठी व्यायामापासून ते वेगवेगळ्या डाएटपर्यंत सर्व गोष्टी आपण करतो. मात्र आहारात काही छोटे छोटे बदल करूनही वजन कमी करता येऊ शकते. सर्वजण आहारात मोठ्या प्रमाणावर गव्हाच्या पिठाचा वापर करतात. मात्र तुम्हाला माहित आहे का गव्हाऐवजी शिंगाड्याचे पीठ खाण्यासाठी वापरले तर हे तुमचे वजन कमी करण्यास मदत करते. चला तर मग जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी शिंगाड्याचे पीठ आहारात …

Read More »

नागपूर जिल्हा परिषदेचा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ : संगणक टायपिंगच्या निकाल वाटपात विलंब!

✍️विश्व भारत विशेष नागपूर जिल्हा परिषद नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असते. आता संगणक टायपिंग (GCC-TBC) प्रमाणपत्राचे निकाल वाटप करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय. मात्र, नागपूरच्या शिक्षण उपसंचालकांना दिनांक 2 डिसेंबर 2022 रोजी निकालाच्या कागदपत्रांची फाईल वाटप करण्यासाठी नागपूरच्या माध्यमिक विभागाकडे जमा करण्यात आली होती. पण, आजपर्यंत फाईल वाणिज्य टायपिंग इन्स्टिटयूटकडे वाटप करण्यात आली नसून नागपूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाने इतका विलंब …

Read More »

समृद्धीवर नागपूर-शिर्डी बस धावणार : उद्यापासून शुभारंभ

नागरिकांना आरामदायक व जलद प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नागपूर ते मुंबई समृध्दी महामार्ग निर्माण करण्यात येत आहे. ११ डिसेंबर रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शुभहस्ते या महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी पहिल्या टप्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. सदर मार्ग नागरिकांच्या प्रवासासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.प्रवाशांना जलद व आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणेसाठी एसटी महामंडळाकडून १५ डिसेंबर पासून …

Read More »

उपकोषागार अधिकारी १५ हजारांची लाच घेताना जाळ्यात

तक्रारदाराचे थकीत वेतनाचे बिल मंजूर करण्यासाठी व कोणतेही आक्षेप न घेण्याच्या मोबदल्यात नाशिकच्या चांदवड उपकोषागार अधिकाऱ्याला अटक करण्यात आली. १५ हजार रुपयांची लाचेची मागणी करीत तडजोडीत १० हजारांची लाच स्वीकारताना उपकोषागार अधिकारी सुनील तडवी (वय ४९) यांना नाशिक लाचलुचपत विभागाने रंगेहाथ अटक केली. नाशिक येथील ४९ वर्षीय तक्रारदाराचे थकीत वेतनाचे बिल मंजूर करण्यासाठी व कोणतेही आक्षेप न घेण्याच्या मोबदल्यात १५ …

Read More »

तुपाने पचनसंस्थेचे नुकसान? गायीचे खावे की म्हशीचे?

आयुर्वेदानुसार, आहारात रोज तुपाचा समावेश आरोग्यासाठी लाभकारक आहे. तुपामुळे जेवणाची चवच वाढत नाही, तर यामुळे शरीरातील पेशींना पोषणही मिळते. स्टीडफास्ट न्युट्रिशनचे संस्थापक अमन पुरी यांच्यानुसार तूप अनेक प्रकारे हेल्दी आहे. याने हाडे मजबूत होतात. मानसिक आरोग्यासाठी हे चांगले आहे. यामुळे पचनक्रिया सुधारते. तूप का खायला हवे? -सांध्यांतील ल्युब्रिकेशनसाठी -केस गळती थांबवण्यासाठी -दृष्टी योग्य राहण्यासाठी -लिपिड प्रोफाईल योग्य ठेवण्यासाठी -ट्राय ग्लिसराईड …

Read More »

विश्वास नांगरे पाटील, आरती सिहंसह बड्या पोलिस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

काही दिवसांपूर्वी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारकडून राज्यातील बड्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तर काही अधिकाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली आहे. या बदलीच्या यादीत विश्वास नांगरे पाटील सदानंद दाते, अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिहं यांचाही समावेश आहे. या बदली आणि पदोन्नतीबाबत शासन आदेश जारी केले गेले आहेत. विश्वास नांगरे पाटील …

Read More »

नागपुरात १० वर्षांनंतर भरती घोटाळा उघड : ९ अधिकाऱ्यांचा भांडाफोड

नागपुरात तब्बल ९ वर्षांनंतर आयकर विभागातील एक भरती घोटाळा उघडकीस आलाय. हा घोटाळा उघड होताच सीबीआयने ९ अधिकाऱ्यांना अटक केली आहे. हे सर्व अधिकारी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या २०१२-१४ दरम्यान झालेल्या परीक्षांमधून भरती झाले होते. या घटनेमुळे अधिकारी वर्गांत आणि परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी वर्गात एकच खळबळ उडाली आहे. सीबीआयने अटक केलेल्यांमध्ये स्टेनोग्राफर रिंकी यादव, सरिता, अनिल कुमार, राहुल कुमार, अभय …

Read More »

नागपूर : समृद्धी महामार्गावर दोन कारचा अपघात

रस्त्यांच्या देखभाल – दुरुस्तीसाठी नवे पायाभूत सुविधा विकास महामंडळ; आणखी एका महामंडळाची भर, रस्त्यांवरील खड्डे जाणार का ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे रविवारी लोकार्पण झाले. या महामार्गावरून वाहतूक सुरू झाली. मात्र, वाहनांच्या सुसाट वेगामुळे अपघाताची घटना घडली आहे. नागपूर -शिर्डी हे अंतर कमी झाले असले, तरी सुसाट वाहनांमुळे महामार्ग पोलिसांची चिंता वाढलीय. समृद्धी महामार्गावर पहिला अपघात सोमवारी झाला. वायफळ टोल नाक्यावर वेगाने येणाऱ्या मर्सिडीज कारने पुढच्या स्विफ्ट कारला जोरदार धडक दिली. …

Read More »