सार्वजनिक बांधकाम विभागातील (पीडब्लूडी) वरिष्ठ लिपिक प्रभाकर गभणे यांना उत्कृष्ट कर्मचारी पुरस्काराने गौरविण्यात आले. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्यातर्फे गभणे यांचा सत्कार करण्यात आला. गभणे हे माजी सैनिक असून त्यांच्या कामाची दखल राज्य सरकारने घेतली आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Read More »वाघ धोक्यात : नागपुरातील गोरेवाडा प्राणीसंग्रहालयात पर्यटक बसला अपघात
नागपुरातील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयातील पर्यटनही आता व्याघ्र प्रकल्प पर्यटनाच्या वाटेवर आहेत. नुकताच येथे एका पर्यटक बसचा अपघात झाला. वाघांच्या पिंजरा परिसरात हा अपघात होऊन एका बसचा काच फुटल्याने पर्यटकांसाेबतच वन्यप्राण्यांच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे लाखो रुपयाचे एक वाहन(बस) मात्र परिसरात उभेच आहे.गेल्या आठवड्यातच वाघांच्या पिंजरा परिसरात एकापाठोपाठ एक अशी तीन पर्यटक वाहने होती. त्यातील एका …
Read More »कोट्यवधींचा गौण खनिज घोटाळा
सांगलीतील तासगाव तालुक्यात दगड खाण पट्ट्यामधून हजारो ब्रास गौण खनिजाचे अवैध उत्खनन सुरू आहे. स्टोन क्रशरच्या मालकांनी परवान्यापेक्षाही कित्येक पट जास्त गौण खनिजाचे अवैध व बेकायदेशीर उत्खनन करून राज्य शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवण्याचा सपाटा लावला आहे. प्रशासन मात्र गांधाराची भूमिका घेऊन गप्प बसलेले आहे. यामुळे कुंपणच शेत खातयं की काय, अशी शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे.तालुक्यात एकूण 12 …
Read More »महादेवाचे मंदिर बांधायला लागली तब्बल 100 वर्षे 👉कुठे आहे हे मंदिर?वाचा…
तुम्हाला अशा एका मंदिराविषयी आम्ही सांगणार आहोत, जे आश्चर्यापेक्षा कमी नाही. हे मंदिर बांधण्यासाठी 100 वर्षांहून अधिक काळ लागल्याचे सांगितले जाते. हे मंदिर महाराष्ट्राच्या औरंगाबाद जिल्ह्यातील एलोरा अर्थात वेरूळच्या लेण्यांमध्ये आहे. वेरूळचे प्रसिद्ध कैलास मंदिर म्हणून हे ओळखले जाते. 276 फूट लांब आणि 154 फूट रुंद या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ एक खडक कापून हे मंदिर बांधण्यात आले आहे. जर …
Read More »महावितरणचे दोन अभियंते लाचलूचपतच्या जाळ्यात
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केलीय. पालघरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात महावितरण कंपनीच्या पालघरच्या अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंत्यास अटक करण्यात आली. संबंधित अभियंत्यांनी तक्रारदार व्यक्तीच्या वीज वापरात अनियमितता असल्याने कारवाई टाळण्यासाठी दोन लाखांची लाचेची मागणी केली होती. तडजोडी नंतर एक लाख रुपये स्वीकारताना कार्यकारी अभियंता प्रताप मचिये आणि अधीक्षक अभियंता किरण नागावकर यांना रंगेहाथ पकडले. तक्रारदाराच्या वीज वापरात …
Read More »… तर सत्तार यांच्यावर कारवाई : मुख्यमंत्री शिंदे यांचे संकेत
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अब्दुल सत्तार यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कडक शब्दात सुनावत नोटीस बजावली आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व माहिती घेत असून योग्य निर्णय घेऊ, असे नागपुरात सांगितले. काय आहे प्रकरण? राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना अब्दुल सत्तार हे महसूल राज्यमंत्री होते. यावेळी त्यांनी वाशिम येथील 37.19 एकर गायरान जमिनीचे अवैध …
Read More »बाळासाहेब थोरात जखमी, नागपूरवरून उपचाराकरिता मुंबईला रवाना
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आज नागपुरात पहाटे मॉर्निंग वॉक करण्याकरिता गेले असता पाय घसरून पडले. यात त्यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे. हातात प्रचंड वेदना असलेल्या अवस्थेत त्यांना इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) येथे हलविण्यात आले. या ठिकाणी त्यांच्या सर्व तपासण्या झाल्या. यापूर्वी त्यांना हिवाळी अधिवेशनासाठी कर्तव्यावर असलेल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी तपासले होते. त्यांना पूढील उपचाराकरिता मुंबईला हलविण्यात …
Read More »सत्तारांचे जमीन प्रकरण अधिवेशनात गाजणार : हरपूरमुळे शिंदे अडचणीत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नागपूर सुधार प्रन्यासच्या हरपूर भूखंड घोटाळ्याचे आरोप होत असताना, आता त्यांच्या सरकारमधील कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अब्दुल सत्तार यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कडक शब्दात सुनावत नोटीस बजावली आहे. या सर्व प्रकरणावरून आजपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात विरोधक सत्तार यांना घेरण्याच्या तयारीत आहेत. काय आहे प्रकरण? राज्यात महाविकास आघाडीचे सरकार …
Read More »अब्दुल सत्तारांमुळे वैताग : कृषी प्रदर्शनासाठी अधिकाऱ्यांना कोटींचे ‘टार्गेट’?
राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तारांकडून त्यांच्या मतदार संघात अर्थात सिल्लोड येथे कृषी महोत्सव आयोजित केला आहे. पण, यासाठी अधिकाऱ्यांना 15 कोटींचे लक्ष दिले असल्याची माहिती आहे. महोत्सवासाठी संपूर्ण कृषी खाते जणू कृषिमंत्र्यांच्या दावणीला बांधल्याचे चित्र आहे. राज्याच्या इतिहासात, आजवर असा अर्वाच्च भाषेत बोलणारा कृषीमंत्री कुणी झाला नसेल, असे वैतागलेले अधिकारी दबक्या आवाजात सांगतात. सिल्लोडमध्ये शासकीय निधीतून घेतलेल्या कृषी प्रदर्शनासाठी स्टॉल बुक …
Read More »नागपूर हिवाळी अधिवेशन : मास्क बंधनकारक, सर्व शासकीय कार्यालयांना जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र
हिवाळी अधिवेशन असल्याने नागपूरमधल्या सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी तसेच कर्मचारी यांच्यासाठी मास्कसक्ती करण्यात आली आहे. शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांनीही मास्क लावणं बंधनकारक असणार आहे. लवकरच सर्व नागरिकांसाठीही आम्ही असे आदेश काढणार आहोत अशीही माहिती जिल्ह्याधिकाऱ्यांनी एका वाहिनीशी बोलताना दिली. करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत नागपूरमध्ये करोनाचे रूग्ण वाढले होते. त्या पार्श्वभूमीवर आता चौथ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन शासकीय …
Read More »
विश्वभारत News Website