Breaking News

Vishwbharat

चंद्रपूर जिल्ह्यात (दि.9सप्टेंबर) 24 तासात आणखी 276 कोरोना बाधित – दोन कोरोना बाधितांचा मृत्यू

🔺चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 4662 चंद्रपूर(दि.9सप्टेंबर):- जिल्ह्यामध्ये 24 तासात आणखी 276 कोरोना बाधितांची नोंद झाली असून जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 4 हजार 662 वर पोहोचली आहे. सध्या उपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या 2 हजार 245 असून आतापर्यंत 2 हजार 364 बाधित कोरोनातून बरे झाले आहेत. जिल्ह्यात 24 तासात दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये, ब्रह्मपुरी तालुक्यातील नांदगांव येथील 60 वर्षीय …

Read More »

वर्धा कोरोना ब्रेकिंग: आज जिल्ह्यात 185 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर तिघांचा मृत्यू

वर्धा :- रविवार दि. 9 सप्टेंबर 2020 रोजी जिल्ह्यात 796 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले असून यामध्ये 185 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यात  102 पुरुष आणि 83 महिलांंचा समावेश आहेत.यामध्ये वर्धा तहसीलमध्ये 89 रुग्ण आढळले असून यामध्ये 47 पुरुष तर 42 महिलांचा समावेश आहे.तसेच सेलूमध्ये 12 रुग्ण आढळले असून यामध्ये 11 पुरुष तर 1 महिलांंचा समावेश आहे.तसेच देवळीमध्ये 17 …

Read More »

वर्धा-सेवाग्राम रस्ता रुंदीकरणाचे काम थांबविण्याच्या सूचना – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

वृक्ष न तोडता रस्ता रुंदीकरणाला पर्याय सुचविण्यासाठी समिती वर्धा :सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी :-  जिल्ह्यातील वर्धा-सेवाग्राम रस्त्याच्या रुंदीकरणातील दोन किमी काम तातडीने थांबविण्यात यावे. तसेच या रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी पर्याय सुचविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिवांनी पर्यावरण, जिल्हाधिकाऱ्यांसह संयुक्त पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) अशोक चव्हाण यांनी दिले.         वर्धा सेवाग्राम रस्त्याच्या रुंदीकरणासंदर्भात श्री. चव्हाण यांच्या …

Read More »

मराठा आरक्षणाला स्थगिती,सुप्रीम कोर्टाचा अंतरीम आदेश

🔷मराठा समाजाला मोठा धक्का नवी दिल्ली(दि.9सप्टेंबर):- सन २०२०-२०२१ या वर्षात मराठा समाजाला नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थामध्ये आरक्षणाचा लाभ मिळणार नसल्याचे सुप्रीम कोर्टाने आपल्या अंतरिम आदेशात म्हटले आहे. मात्र प्रकरण घटनापीठाकडे वर्ग केलं आहे. न्यायमूर्ती एल नागेश्वरराव यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. परंतु या निर्णयामुळे महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का बसला आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचा निर्णय येईपर्यंत 2020-2021 या वर्षासाठी कोणतेही प्रवेश मराठा …

Read More »

पत्रकारांना कोरोनावरील उपचार व आयसोलेशन साठी 50 बेड आरक्षित करण्याची मागणी – महाराष्ट्र पत्रकार संघ बल्लारपूर

बल्लारपूर : कोरोना या विषाणूजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर आपल्या जीवाची कोणतीही पर्वा न करता आपले कर्तव्य बजावताना अनेक पत्रकार बांधवांना प्रसंगी कोरोनाची लागण झाली व यात काही पत्रकार बांधवांना मृत्यूलाही सामोरे जावे लागले यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार बंधूंना उपचार सुरू असताना व्हेंटिलेटर उपलब्ध व्हावा तसेच पत्रकारांसाठी आयसोलेशनसाठी किमान 50 बेड आरक्षित करण्यात यावेत, पत्रकारांसाठी 50 लाखाचा विमा त्वरित काढण्यात यावा, …

Read More »

जाणून घेऊया! काय सुरू, काय बंद

🔹चंद्रपूर, दुर्गापूर, पडोली, उर्जानगर व बल्लारपूर शहरात रविवार पर्यंत जनता संचारबंदी 🔸नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने जनता संचारबंदीत सहभागी व्हावे – ना. वडेट्टीवार चंद्रपूर(दि.9सप्टेंबर):-चंद्रपूर शहर तसेच लगत असणारे दुर्गापूर, पडोली, उर्जानगर व बल्लारपूर शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे. कोरोनाचा प्रसार आणखी वाढु नये, संसर्गाची साखळी खंडित व्हावी यासाठी लोकप्रतिनिधी तसेच व्यापारी असोसिएशनच्या संमतीने 10 सप्टेंबर गुरुवार ते 13 सप्टेंबर रविवार पर्यंत जनता …

Read More »

तीन दिवस उलटून सुध्दा वृषालीची तब्येत गंभीरच

ब्रम्हपुरी(दि.9सप्टेंबर):- तालुक्यातील झिलबोडी येथील वृषाली दिगांबर शेन्डे या तीन वर्षीय बालिकेला दि. ०७ सप्टेंबरला पहाटे ४ वाजताच्या दरम्यान अत्यंत विषारी प्रजातींच्या पट्टेरी मन्यार सापाने दंश केल्यामुळे तिला तात्काळ ग्रामीण रुग्णालय, ब्रम्हपुरी येथे व नंतर ख्रिस्तानंद रूग्णालयात दाखल करण्यात आले.ही बातमी दि. ०८ सप्टेंबरला जवळपास सर्वच वर्तमानपत्रात प्रकाशित करण्यात आली. बातमीमध्ये वृषालीच्या वडीलांची आर्थिक स्थिती हलाखीची असल्यामुळे मदतीचे आवाहन करण्यात आले …

Read More »

मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात यावे

🔹उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर चिमुर(दि.9सप्टेंबर):- राष्ट्रीय मुस्लिम हक संघर्ष समिती चिमुर चे वतिने मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नावाने असलेले निवेदन . उपविभागिय अधिकारी साहेब उपवीभागिय कार्यलय चिमुर यांना सादर करण्यात आले. मुस्लिम समाजला आरक्षण मिळाले पाहिजे ही मुख्य मागणी निवेदनात आहे .निवेदन देताना चिमूर नगर परिषद चे बांधकाम सभापति अ. कदीर भाई शेख , पप्पु भाई शेख सामाजिक …

Read More »

जनरल डब्यांसह संपूर्ण गाडी एसी करण्याची योजना

कमी खर्चात प्रवाशांना आणखी आरामदायी प्रवास उपलब्ध होणार भारतीय रेल्वेमध्ये आजवर वेळोवेळी प्रवाशांच्या आरामदायी प्रवासाच्या दृष्टीने अनेक बदल झाले आहेत. त्यातच आता पुन्हा एकदा रेल्वे कात टाकणार असून आणखी एक महत्वाचा बदल करण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार, आता कमी खर्चात नागरिकांना एसी डब्यातून प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. म्हणजेच रेल्वेने जनरल डब्यांसह सर्व डबे एसी करण्याची योजना आखली …

Read More »

उद्धव ठाकरे उद्या तुमचं गर्वहरण होईल, कंगनाने व्यक्त केला संताप

कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यापासून वादाला सुरुवात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी धमकी दिल्याचा आरोप करताना मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यापासून अभिनेत्री कंगना रणौतवर टीकेची झोड उठली आहे. यासोबतच मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवल्यानेही मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरं जावं लागलं होतं. यानंतर सोशल मीडियावर कंगनाला सेलिब्रेटींसह सर्वसामान्य मुंबईकरांनी कंगनाला ट्रोल केलं होतं. यावेळी कंगनाला काही जणांनी मुंबईत पुन्हा येऊ नको …

Read More »