Breaking News

Vishwbharat

मोठा झटका…AstraZeneca ने थांबवली ऑक्सफर्ड लसीची चाचणी

भारतातही या लसीची चाचणी सुरु करण्यात आली होती करोनाविरोधातील लढ्यात मोठा धक्का बसला आहे. करोना संकट रोखण्यासाठी सर्वात जास्त अपेक्षा असणाऱ्या ऑक्सफर्डच्या AZD1222 लसीची तिसरी आणि अंतिम टप्प्यातील चाचणी रोखण्यात आली आहे. ब्रिटनमधील एका व्यक्तीला ऑक्सफर्डची करोना लस देण्यात आली होती. मात्र ही व्यक्ती आजारी पडल्यानंतर करोना लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी रोखण्यात आली आहे. ब्लूमबर्गने यासंबंधी वृत्त दिलं आहे. ब्रिटनमधील …

Read More »

भंडारा शहरांमध्ये ३ दिवस जनता कर्फ्यू

दिनांक ११, १२,व १३ सप्टेंबर शुक्रवार शनिवार रविवार रोजी राहणार जनता कर्फ्यू भंडारा : – भंडारा शहरांमध्ये कोविड -१९ ची सातत्याने वाढ होत असल्या  कारणाने पुढील काळात भंडारा शहरात कोरोना चा सामूहिक प्रसार होण्याचे नाकारता येत नाही त्या अनुषंगाने पुढील काळात कोणाचा  प्रसार थांबविण्याकरिता नगराध्यक्ष तथा  भंडारा गोंदिया क्षेत्राचे खासदार सुनील जी मेंढे ,उपाध्यक्ष श्री सुनील जी भुरे, नगर परिषदेतील सर्व …

Read More »

मुंबईत येण्यापूर्वीच कंगनाला आणखी एक दणका; सिनेमॅटोग्राफरने चित्रपट करण्यास दिला नकार

…म्हणून पीसी श्रीराम यांनी चित्रपट करण्यास दिला नकार बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. त्यातच तिच्या मुंबईतील ‘मणिकर्णिका फिल्म्स’ या कार्यालयात बेकायदेशीर काम केल्यामुळे बीएमसीने तिला नोटीसदेखील बजावली आहे. बीएमसीने दिलेल्या या दणक्यानंतर कंगनाला आणखीन एक दणका बसल्याचं दिसून येत आहे. कंगनाची मुख्य भूमिका असलेला …

Read More »

सी सी बँकेतील साहित्य खरेदी घोटाळा प्रकरण

पोलीस चौकशीत गोलमाल चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बहुचर्चित साहित्य खरेदी घोटाळ्याप्रकरणी मनोहर पाउणकर आणि माई एंटरप्राइजेस हे विनोद गिरी आणि सचिन साळवे हे न्यायालयीन कोठडीत आहेत . मात्र या प्रकरणाच्या केंद्र स्थानी असलेला डेटा स्टॉक समितीतील पार संचालक आणि तांत्रिक सल्लागारांना चौकशीतून वगळण्यात आल्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी केलेल्या चौकशीत मोठा गोलमाल झाल्याची कुरबुरी सुरू झाली आहे. 

Read More »

सी.सी.आय. व्दारे वर्धा जिल्हयात जास्तीत जास्त कापुस खरेदी केन्द्र सुरु करण्यात यावे – खासदार रामदास तडस

केन्द्रीय मंत्री श्रीमती स्मृती इरानी यांच्याकडे वर्धा जिल्हयात जास्तीत जास्त कापुस खरेदी केन्द्र देण्याची मागणी करणार वर्धा:सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी:- वर्धा कृषि उत्पन्न बाजार समिती, वर्धा अंतर्गत सन 2020-2021 करिता वर्धा जिल्हयाने सी. सी. आय. मार्फत सर्वप्रथम विदर्भात नोंदणीकृत शेतक-यांचा कापूस खरेदी केला. मागील हंगामात सी. सी. आय. ने वर्धा बाजार समिती अंतर्गत नोंदणी केलेल्या संपुर्ण शेतक-यांचा कापूस हमी भावात …

Read More »

सप्टेंबर महिन्याचे शिधावस्तु वितरण जाहिर

वर्धा जिल्हा प्रतिनिधी : -राष्ट्रीय अन्न  सुरक्षा योजनेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना सप्टेंबर महिन्याचे  अन्न धान्य वितरण जाहिर करण्यात  आले आहे.             प्राधान्य कुंटूंबातील लाभार्थ्यांना  गहू प्रति व्यक्ती  3 किलो 2 रुपये दराने, तांदूळ प्रति व्यक्ती 2 किलो 3 रुपये दराने, अंत्योदय योजना गहू प्रति शिधापत्रिका 15 किलो, तांदूळ प्रति शिधापत्रिका 20 किलो. एपीएल शेतकरी योजना गहू प्रति व्यक्ती 3 किलो, तांदूळ  प्रति व्यक्ती  2 किलो. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत …

Read More »

कोरोना रुग्णांच्या वैद्यकीय देयकांच्या तपासणीसाठी समिती गठीत, रुग्णांच्या तक्रारीसाठी दोन्ही रुग्णालयात दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित

वर्धा: जिल्हा प्रतिनिधी:- कोरोना रुग्णांच्या वैद्यकीय देयकांमध्ये पारदर्शकता राहावी म्हणून कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम आणि विनोबा भावे रुग्णालय सावंगी येथे कोरोनाचा उपचार घेतलेल्या रुग्णांच्या देयकांची तपासणी करण्यासाठी  जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी तीन सदस्यीय समिती गठीत केली आहे. सदर समिती दर मंगळवारी दोन्ही रुग्णालयातील उपचार घेतलेल्या रुग्णाच्या देयकांची तपासणी करून त्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करतील. जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असताना लोकांमध्ये अनेक …

Read More »

सेवाग्राम व सावंगी रुग्णालयातील आणखी तीन इमारती कोरोना उपचारासाठी अधिग्रहित

वर्धा,जिल्हा प्रतिनिधी:- कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव तसेच जिल्ह्यातील वाढणारी कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता, कोरोना रुग्णांना तात्काळ उपचार मिळण्याचे दृष्टिने, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार  यांनी  कस्तुरबा रुग्णालय, सेवाग्राम येथील 1आणि आचार्य विनोबा भावे सावंगी रुग्णालयातील 2 इमारती सर्व उपकरणे व सुविधांसह, अधिग्रहित केल्या आहेत. जिल्ह्यात मागील 15 दिवसांपासून सातत्याने रुग्णसंख्येत वाढ होत आहे.  जिल्ह्यात एकूण 1775 कोरोनाबाधित रुग्ण झाले असून ऍक्टिव्ह पॉझिटीव्ह रुग्ण 738 …

Read More »

वर्धा :कोरोना ब्रेकिंग :जिल्ह्यातील दोन्ही कोविड रुग्णालय झाले सरकारी रुग्णालय,कोरोना उपचारासाठी आता रुग्णांकडून कोणतीही फी आकारली जाणार नाही

सेवाग्राम व सावंगी रुग्णालय सरकारी रुग्णालय म्हणून अधिग्रहित            वर्धा:सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी :- महाराष्ट्रामधील सर्व नागरीकांसाठी वीस पॅकेजेस या योजनेअंतर्गत कोविड-१९ च्या रुग्णांच्या उपचारासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना मंजुर करण्यात आली आहे. मात्र कोरोनाची सौम्य लक्षणे किंवा कोणतीही लक्षणे नसणाऱ्या रुग्णांना या योजनेचा लाभ मिळत नाही.  अशा रुग्णांचा वैद्यकीय उपचारासाठी कमीत कमी खर्च व्हावा …

Read More »