Breaking News

राजकारण

राज्यात मध्यावधी निवडणुका होणार? अजित पवार काय म्हणाले…

विश्व भारत ऑनलाईन : राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता अजिबात नाही. आमदारांना निवडणुकांचा खर्च परवडणारा नाही, असे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आई- वडिलांना शिव्या दिल्या तरी चालेल, या आशयाचे केलेले विधान म्हणजे त्यांची ‘विनाशकाले विपरीत बुध्दी’ असल्याची टीकाही त्यांनी केली.पिंपरीत पत्रकारांशी बोलताना पवार यांनी राज्यात मध्यावधी निवडणुका होणार नसल्याचे स्पष्ट केले. पवार …

Read More »

निवडणूक आयोगाचे ठाकरेंना पत्र, उद्या दुपारी 2 पर्यंत उत्तर द्या

विश्व भारत ऑनलाईन : राज्यात शिवसेनेत उभी फूट पडली आहे. पक्षातील फुटीनंतर पहिल्यांदाच होऊ घातलेल्या अंधेरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीपूर्वी पक्षाचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह ठाकरे गटाकडे राहणार की शिंदे, याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यावर शुक्रवारी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली आहेत. निवडणूक आयोगाने आता ठाकरे गटाला उद्या (दि. 8) दुपारी 2 पर्यंत ठाकरे …

Read More »

आमदार, खासदारांची संख्या ठरविणार धनुष्यबाण कुणाचे? शिंदेंचं पारडं जड?

विश्व भारत ऑनलाईन : धनुष्यबाण कुणाचा, शिंदे की ठाकरे यावर आजच फैसला अपेक्षित आहे. केंद्रीय निवडणूक आयोग साधारणपणे दोन गोष्टींचा प्रामुख्याने विचार करते. एक म्हणजे इलेक्टीव्ह विंग, ज्याला लेजिसलेटीव्ह म्हणतात. म्हणजेच राजकीय पक्ष स्वरुपात आणि दुसरी ऑर्गनायझेशनल विंग म्हणजेच संघटनात्मक स्वरुप. आता इलेक्टीव्ह विंगसंदर्भात विचार करताना आमदार, खासदार कोणाच्या बाजूने आहेत हे महत्तवाचं ठरतं. तर ऑर्गनायझेशनल विंगमध्ये संघटनेचे पदाधिकारी कोणाच्या …

Read More »

धनुष्यबाण कुणाचे? आज फैसला

विश्व भारत ऑनलाईन : शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेला धनुष्यबाण कोणाला मिळावा, यासाठी शिंदे आणि उद्धव ठाकरे गट एकमेका विरुद्ध उभे आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगात या संदर्भात शुक्रवारी सुनावणी होणार आहे. या सुनावणीमध्ये शिंदे गटाने सादर केलेल्या पुराव्यावर निवडणूक आयोग निवडणूक चिन्हाबाबत काय निर्णय घेते? का फक्त सुनावणी करते? हे निश्चित होणार आहे. दोन्ही गटाचे वकील केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये युक्तिवादही करणार …

Read More »

ठाकरेंना धक्का देण्यासाठी बावनकुळे, शेलार अमित शाहांच्या भेटीला

विश्व भारत ऑनलाईन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेला मोठे भगदाड पडले. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात शिवसेनेसाठी वाद सुरू असतानाच अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात निवडणूक लागली आहे. ठाकरेंसाठी महत्त्वाची मानली जाणारी ही निवडणूक भाजपनेही मनावर घेतल्याचे समजते.   या निवडणुकीपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. …

Read More »

ठाकरेंची सेना खिळखिळी करण्याचा शिंदेंचा प्रयत्न : खासदार कृपाल तुमानेंचा गौप्यस्फोट

विश्व भारत ऑनलाईन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांसह बंडखोरी करत उद्धव ठाकरेंना सत्तेतून खाली खेचले. शिंदेंनी केलेले बंड हे उद्धव ठाकरेंसाठी मोठा झटका ठरले.पण, त्यानंतर शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेवरच प्रहार केला. आमदारांपाठोपाठ खासदार आणि राज्यभरातले जिल्हाप्रमुख इतर पदाधिकारीही फोडले. त्यानंतर शिंदे उद्धव ठाकरेंना पुन्हा एक झटका देणार आहे. शिंदे गटाचे रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी हा गौप्यस्फोट केला. दसऱ्याच्या मुहूर्तावर …

Read More »

बंदद्वाराआड फडणवीस-पटोले भेट…भुवया उंचावल्या

विश्व भारत ऑनलाईन : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात बंदद्वाराआड 20 मिनिट भंडाऱ्यात चर्चा झाल्याची माहिती आहे. दोघेही एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. अशात पटोले आणि फडणवीस यांच्या भेटीने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. सोमवारी फडणवीस भंडारा दौऱ्यावर होते. त्यात बैठकही झाली. मात्र, अन्य आमदार बाहेर पडल्यावर फडणवीस आणि पटोले यांच्यात चर्चा झाली. ही राजकीय …

Read More »

नागपूर जिल्हा परिषद निवडणूक 17 ऑक्टोबरला

विश्व भारत ऑनलाईन : नागपूर जिल्हा परिषदेच्या आगामी सव्वादोन वर्षासाठी 17 ऑक्टोबरला अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे. यंदा अनुसूचित जमातीसाठी अध्यक्षपद राखीव आहे. भाजपकडे या प्रवर्गातील एकही सदस्य नाही. त्यामुळे पुन्हा काँग्रेसच्या एखादा सदस्याला अध्यक्ष पदाची संधी मिळू शकते, त्यादृष्टीकोनातून अंतर्गत राजकारण सुरु झालेय.

Read More »

खडसे घेणार फडणवीसांची भेट..चर्चाना उधाण

विश्व भारत ऑनलाईन : मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंच्या बाबतीत बोलताना मोठा दावा केला. खडसे यांनी देवेद्र फडणवीस यांना आपण तिघं बसून जे काही आहे ते सगळं मिटवून टाकू,असे सांगितल्याचे गिरीश महाजन म्हणाले. यावर खुद्द आमदार खडसे यांनी आता आपली बाजू मांडली. ते म्हणाले “मी देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांची भेट घेणार आहे. नाशिक मध्ये एका …

Read More »

नाना पटोलेंना लम्पी आजाराची लागण… कोणी केली टीका… वाचा

विश्व भारत ऑनलाईन : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काहीतरी वादग्रस्त आणि अजब विधान करून नेहमी चर्चेत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेशातून आणलेल्या चित्त्यांमुळे गायींमध्ये लम्पी आजार पसरला आहे. चित्त्यांच्या अंगावरील ठिपके आणि लम्पी आजारामुळे गायीला येणारे ठिपके सारखेच आहेत, अशा आशयाचं विधान नाना पटोले यांनी केलं. पटोलेंच्या या विधानानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाना पटोलेंवर जोरदार टीका केली …

Read More »