Breaking News

विश्व भारत

गडचिरोलीत हत्तीचा हल्ला : एक ठार, पिकाचेही नुकसान

कोरची तालुक्यात हत्तींचा धुमाकूळ सुरुच आहे. शुक्रवारी रात्री हत्तीने एका (७० वर्षीय) वद्धास पायाखाली तुडवून ठार केली.ही घटना तलवारगड गावात घडली. धनसिंग टेकाम असे ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. या हत्तींनी गावातील काही घरे आणि धानपिकांचेही नुकसान केले. तलवारगड हे गाव दुर्गम व नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल असून, टिपागड डोंगराच्या पायथ्याशी वसलेले आहे. गावात ८ घरे आहेत. शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास …

Read More »

मोबाईल : 6 वर्षीय मुलाने आईच्या बँक खात्यातून उडविले 1 लाख 78 हजार

पालकांचे मोबाइल वापरत त्यावर दिवसभर ऑनलाईन गेम मुले खेळतात. ऑनलाईन गेमचा फटका आता लहान मुलांसह त्यांच्या पालकांनाही सहन करावा लागतोय. एका अवघ्या ६ वर्षीय मुलाने ऑनलाईन गेम खेळण्याच्या नादात त्याच्या आईच्या बँक खात्यातून १ लाख ७८ हजार रुपये उडविले. बँक खात्यातून पैसे कमी झाल्याचे लक्षात येताच पालकांनी सायबर सेलकडे धाव घेतले. पोलिसांनी मोबाइल तपासला असता मुलाने गेमच्या नादात आई वडिलांचे …

Read More »

भारत जोडोत जात असताना काँग्रेस नेते नसीम खान यांच्या गाडीचा अपघात

काँग्रेस पक्षाच्या मुंबईतील प्रमुख चेहऱ्यांपैकी एक माजी मंत्री नसीम खान यांच्या गाडीचा नांदेडमध्ये अपघात झालाय. नांदेडच्या भिलोली टोलनाक्यावर शनिवारी हा अपघात झाला. यावेळी नसीम खान प्रवास करत असलेल्या कारला एका दुसऱ्या कारने समोरून धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, दोन्ही कारच्या बोनेटचा भाग पूर्णपणे चेपला गेला आहे. सुदैवाने या अपघातात नसीम खान यांना फारशी दुखापत झालेली नाही. केवळ …

Read More »

कर्मचाऱ्यांना शासकीय निवासात मुक्कामाची सक्ती : नातेवाईकांकडे थांबल्यास कारवाई

मुंबईहून नागपूरला येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरकारी निवासातच मुक्काम करावा लागेल. नातेवाईकांकडे थांबल्यास हिवाळी अधिवेशनात सरकारी खोलीत जागा मिळणार नाही, असे विधिमंडळ सचिवालयाने स्पष्ट केले आहे. मुंबईहून येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवास व्यवस्था नागपुरातील सिव्हिल लाईन्समधील १६० खोल्यांच्या इमारतींमध्ये केली जाते. प्रत्येक खोलीत पाच जणांची व्यवस्था असते. कर्मचाऱ्यांनी मुंबई सोडण्यापूर्वीच नागपुरातील खोली वाटपाचे नियोजन झालेले असते व त्यानुसार कर्मचाऱ्यांना नागपुरात पोहोचल्यावर मिळालेल्या …

Read More »

विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला जीवदान

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील करंदी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला जीवदान मिळाले. शिरूर वन विभाग व प्राणीमित्रांना यश आले आहे. करंदी येथील कौडाळ मळा येथील अशोक पर्‍हाड हे शनिवारी (दि. 5) दुपारच्या सुमारास शेतात गेले असता त्यांना विहिरीमध्ये बिबट्याचा बछडा पडल्याचे दिसून आले. यासंदर्भात माहिती त्यांनी शिरूर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांना दिली. वनरक्षक बबन दहातोंडे, वनमजूर आनंदा हरगुडे, …

Read More »

प्रवाशांची गैरसोय : विदर्भ, महाराष्ट्र एक्सप्रेस रद्द

सालवा येथे करण्यात येणाऱ्या दुरुस्तीच्या कामासाठी रविवार ६, साेमवार ७ आणि मंगळवार ८ नोव्हेंबरची विदर्भ आणि महाराष्ट्र एक्सप्रेस रद्द करण्यात आलीय. दुरंतो, शालिमार-एलटीटी अप-डाऊन ट्रेनच्या मार्गामध्येही बदल करण्यात आला आहे. भडली येथे करण्यात येणाऱ्या कामासाठी १२११४ नागपूर-पुणे मंगळवारी ८ नोव्हेंबर आणि १२११३ पुणे-नागपूर बुधवारी ९ नोव्हेंबर या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मार्गावरील गाड्या रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांना वेळेवर मोठ्या …

Read More »

तरुण वयातच म्हातारपण : हाडे मजबूत करा…

निरोगी आरोग्य ठेवणे अर्थातच तारेवरची कसरत आहे. यासाठी व्हिटॅमिन्स खूप महत्त्वाचे असतात. कारण व्हिटॅमिन्सशिवाय आपल्याला उत्तम आरोग्य मिळू शकत नाही. व्हिटॅमिनमध्येही अनेक प्रकार आहेत. मात्र बहुतेकांना वय झाल्यावर किंवा तरूणपणातच हाडे दुखण्याचा त्रास होतोय. हाडं मजबुत करण्यासाठी विविध पदार्थ सेवन केल्यास त्याचा लाभ होतो. व्हिटॅमिन बी-12 चे दोन प्रकार ज्यामध्ये मिथाइलकोबालामीन आणि एडेनोसिलकोबालामिन हे जर आपल्या शरीरात असतील तर आपण …

Read More »

डेंग्यूच्या रुग्णांनी काळजी घ्यावी : ज्यूस प्यावेत, वाढतील प्लेटलेट्स

यंदा अनेक शहरात डेंग्यूने डोकं वर काढलं आहे. त्यामुळे अनेक शहरात डेंग्यूचा आकडा वाढत आहे. रूग्णांमध्येही या आजाराची भीती वाढत आहे. डेंग्यू ताप आल्यावर शरीरातील प्लेटलेट्स कमी होतात. जर रुग्णाच्या प्लेटलेट्स सतत कमी होऊ लागल्या तर मृत्यू देखील होऊ शकतो. डेंग्यू तापात प्लेटलेट्स कमी होणे कठीण होऊ नये. यासाठी आम्ही असे काही घरगूती उपाय सांगणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही …

Read More »

भाजपला मोठा धक्का ! मोदींसोबत काम केलेल्या बड्या नेत्याचा राजीनामा

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून योग्य उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. या प्रक्रियेत तिकीट मिळण्याची शक्यता नसलेल्या सर्वच पक्षातील नेत्यांमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. याच कारणामुळे मागील तीन दशकांपासून भाजपामध्ये असलेले तसेच विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्रीपद भुषवलेले जय नारायण व्यास यांनी भाजपाला रामराम ठोकला आहे. काँग्रेस किंवा आप पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. व्यास …

Read More »

मुलगा पाण्यात पडला, वाचवण्यासाठी आईचीही उडी…

पोटच्या गोळ्यासाठी आई जगातील सर्व संकटांना तोंड देऊ शकते, हे म्हणतात ते काही खोटं-नाट नाही. आई मुलांसाठी जीवही द्यायची वेळ आली तरी मागे हटत नाही. राजस्थानमधील डुंगरपूर जिल्ह्यात असेच एक प्रकरण घडले आहे. एका आईने मुलाला बुडण्यापासून वाचवण्यासाठी जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेतली. खूप प्रयत्न करूनही ती ना मुलाला वाचवू शकली ना स्वतःला वाचवू शकली. त्यानंतर तेथे पोहोचलेल्या …

Read More »