Breaking News

विश्व भारत

शिंदे गटाला ‘तलवार’ : ठाकरेंना कोणते चिन्ह मिळेल?

विश्व भारत ऑनलाईन : ठाकरे, शिंदे या दोन्ही गटाला निवडणूक आयोगाने मोठा धक्का देत धनुष्यबाण चिन्ह गोठविले. तसेच शिवसेना हे नावही वापरण्यास मनाई केली. आता यापुढे हे दोन्ही गट कोणते चिन्ह वापरणार?असा प्रश्न उभा राहीला आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिंदे-सेनेचे तलवार चिन्ह असणार का? ही शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात शिवसेनेतील बंडखोरीनंतर आयोगाने शनिवारी दिलेला निर्णय हा दोन्ही गटांसाठी धक्कादायक …

Read More »

वाळूमाफियाने तहसीलदारांच्या बंगल्याला ठोकले कुलूप

विश्व भारत ऑनलाईन : अमरावती जिल्ह्यातील वरुडचे तहसीलदार गजेंद्र मालठाणे गुरुवारी त्यांच्या शासकीय बंगल्यात होते. रात्री अज्ञाताने त्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या मुख्य दरवाज्याला बाहेरुन कुलूप लावून घेतले. हा प्रकार तहसीलदार मालठाणे यांना शुक्रवारी (दि. ७) सकाळी साडेपाचच्या सुमारास लक्षात आला. त्यांनी तत्काळ पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर पोलिस बंगल्यावर पोहोचले. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकाराने वरुडमध्ये चांगलीच …

Read More »

दिवाळीत ट्रॅव्हल्स, रेल्वे फुल्ल : तिकीट दरही दुप्पट

विश्व भारत ऑनलाईन : दिवाळीत प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांची चांदी होत असते. कोरोना नियंत्रणात आल्याने या वर्षी प्रवासाला पसंती दिली आहे. त्यामुळेच मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचे १० नोव्हेंबरपर्यंतचे तिकीट आरक्षण फुल्ल झाले आहे. रेल्वेची ही परिस्थिती पाहता खासगी ट्रॅव्हल्सचालकांनी हात धुऊन घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नागपूरहुन पुण्याकडे जाणाऱ्या तिकीट दरात तब्बल दुपटीने वाढ करण्यात आली आहे. दिवाळीत प्रवासी वाहतूक करणाऱ्या …

Read More »

ठाकरे आणि शिंदेंना धक्का, धनुष्यबाण चिन्ह गोठवले… पण…

विश्व भारत ऑनलाईन : ‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबत सुरू असलेला वाद अखेर संपुष्टात आला. आज निवडणूक आयोगाचा याबाबत मोठा निर्णय घेत ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठावण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय काय? दोन्ही गटाला ‘धनुष्यबाण’ चिन्ह वापरता येणार नाही. तसेच दोन्ही गटाला शिवसेना हे नावही वापरता येणार नाही. मात्र, दोन्ही दोन्ही गटाला ठाकरे …

Read More »

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे : बियाणे खरेदीत फसवणूक, खूणचिट्ठी तपासा

विश्व भारत ऑनलाईन : अलीकडे बऱ्याच शेतकऱ्यांची बोगस बियाण्याच्या नावावर फसवणूक झालेली आहे. शेतकर्‍यांनी खरेदीसाठी घाई केल्यास आणि पुरेसे बियाणे बाजारात उपलब्ध नसल्यास शुद्ध बियाणे मिळवताना फसवणूक होऊ शकते. त्यामुळे बियाणे खरेदी करताना शेतकर्‍यांनी शक्यतो कृषी विद्यापीठे किंवा त्यांच्याशी संलग्न असणारी संशोधन केंद्र यांचेकडे बियाणे उपलब्ध असल्यास तेथूनच खरेदी करावी. तसेच बियाणे महामंडळाचे किंवा इतर कंपन्यांचे बियाणे खरेदी करावयाचे असल्यास …

Read More »

विजेचा धक्का : ४ भावांचा मृत्यू

विश्व भारत ऑनलाईन : विद्युत वाहिनीचा जोराचा धक्का लागून आंघोळीला गेलेल्या ४ सख्ख्या चुलत भावांचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी गावाअंतर्गत येठेवाडीच्या वांदरकडा परिसरातील नाल्याच्या काठावर आज शनिवारी दुपारी घडली. दर्शन अजित बर्डे (वय ६), विराज अजित बर्डे (वय ५), अनिकेत अरुण बर्डे (वय ८), ओमकार अरुण बर्डे (वय ७, सर्व रा. येठेवाडी नांदूर खंदरमाळ) …

Read More »

राज्यात मध्यावधी निवडणुका होणार? अजित पवार काय म्हणाले…

विश्व भारत ऑनलाईन : राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता अजिबात नाही. आमदारांना निवडणुकांचा खर्च परवडणारा नाही, असे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आई- वडिलांना शिव्या दिल्या तरी चालेल, या आशयाचे केलेले विधान म्हणजे त्यांची ‘विनाशकाले विपरीत बुध्दी’ असल्याची टीकाही त्यांनी केली.पिंपरीत पत्रकारांशी बोलताना पवार यांनी राज्यात मध्यावधी निवडणुका होणार नसल्याचे स्पष्ट केले. पवार …

Read More »

भूमाफिया सक्रिय : शासकीय जमिनींवर दोन लाख अतिक्रमणे

विश्व भारत ऑनलाईन : राज्य सरकारची चक्क १० हजार ८९ हेक्टर जमीन अतिक्रमणांखाली अडकली आहे. त्यावर तब्बल दोन लाख २२ हजार १५३ बेकायदा बांधकामे असल्याचे अत्यंत विदारक चित्र आहे. खुद्द मुंबई उच्च न्यायालयानेही याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. याबद्दल स्वतःहुन जनहित याचिका दाखल करून घेतली आहे.सर्व अतिक्रमणे चालू वर्षअखेरपर्यंत हटवण्याची कारवाई कशी करणार याचा स्पष्ट आराखडाच न्यायालयाने १७ नोव्हेंबरपर्यंत …

Read More »

कलाकारांना मिळेल आर्थिक मदत-सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार

विश्व भारत ऑनलाईन : कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे केवळ अत्यावश्यक सेवा सुरू होत्या. त्यामुळे चित्रीकरण बंद करण्यात आले होते. केवळ चित्रिकरणाच्या उत्पन्नावर अवलंबून असणाऱ्या कलाकारांना अनेक समस्यांना सामारे जावे लागलं. याच कलाकारांसाठी राज्य सरकारने मदतीची घोषणा केली होती. या कोविड पार्श्वभूमीवर कलाकारांना देण्यात येणारी मदतीची मुदत ३१ मार्च २०२३ पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. …

Read More »

अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, पण संधीही द्यावी ; उपमुख्यमंत्री फडणवीस

विश्व भारत ऑनलाईन : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आरोग्य विभागातील कर्मचारी अनुपस्थित असल्यासंदर्भात विचारणा केली. त्यावेळी आरोग्य विभागात अकाऊंटिबिलिटीची गरजेची आहे. सरकार बदलले आहे. त्यामुळे अकाऊंटिबिलिटी ठरली पाहिजे. मात्र प्रत्येक वेळी मोठी कारवाई गरजेची नाही, कधी कधी वॅार्निंग द्यायला हवी. पण जे कामावरच येत नाहीत, अशांवर कठोर कारवाई व्हायला हवी. शिस्त लागण्यासाठी अशी कारवाई आवश्‍यक आहे. …

Read More »