भारतीय सर्वेक्षण विभागातर्फे तब्बल 30 वर्षांनंतर महाराष्ट्रात ‘टोपोशीट’ बसविण्याचे काम खासगी कंपनीला देण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात तब्बल 556 टोपोशीट बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे नव्याने नकाशे तयार करण्यासाठी या टोपोशीटचा वापर होणार आहे. यासह राज्यात कोरस बसविण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येक रोअर बेस स्टेशनच्या परिघातील अक्षांश व रेखांश टाकल्यास जागेचा महसूल नकाशा मिळतो. या दोन्ही सुविधांमुळे राज्यातील शहर, जिल्हे, गावांचे …
Read More »राज्य अर्थसंकल्पात तुम्हाला काय मिळाले? वाचा ठळक मुद्दे
राज्याचा अर्थसंकल्प ठळक मुद्दे अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित 1) शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी 2) महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास 3) भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास 4) रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा 5) पर्यावरणपूरक विकास अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित 1) शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी 2) महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास 3) …
Read More »मंत्र्याची व्यथा व अश्रू : 7/12वर नाव लावण्यासाठी दिग्गज नेत्याचा संघर्ष
पतीच्या निधनाला 18 वर्ष झाली. पण यानंतर मलाही संघर्ष करावा लागला, असे माजी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या, यावेळी त्यांच्यासोबत घडलेल्या एका प्रसंगाबाबतची माहितीही त्यांनी दिली. ‘घरासाठीचे प्रॉपर्टी राईट्स आपण किती दिवसांपासून आणले आहेत. आपण नियम बनवले आहेत. 7/12 वर महिलांची नावं चढतात का? माझं उत्तर आहे नाही. मी दुसऱ्यांचं उदाहरण देणार नाही, मी माझं स्वत:चं उदाहरण तुम्हाला …
Read More »नागपुरात समृद्धी महामार्गावर द्राक्षाचा ट्रक उलटला
बंगलोर येथून द्राक्षे भरून नागपूरला येणारा ट्रक समृद्धी महामार्गावर बुधवारी सकाळी उलटला. या आठवड्यात समृद्धी प्रवेश व्दारावर घडलेला हा तिसरा अपघात आहे. या घटनेत ट्रक चालक अभिजीत मंडल जखमी झाला.बंगलोर येथून द्राक्षे भरून ट्रक क्र डब्ल्यू बी ६७ सी १३४४ ने समृद्धी महामार्गाने नागपूरला येत असताना अनियंत्रित होऊन उलटला. ट्रकमधील द्राक्षाचे बॉक्स रस्त्यावर पडले होते. पोलीस घटनास्थळी दाखल झाले.जखमी चालक …
Read More »आयएएस अधिकाऱ्याने केली होती बच्चू कडूविरोधात पोलिसात तक्रार : शिक्षा
माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. 2017 सालच्या एका आंदोलनादरम्यान बच्चू कडू यांनी सरकारी कामांत अडथळा आणला होता. त्यावेळी नाशिक महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी बच्चू कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची सुनावणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होती. आज अखेर न्यायालयाने बच्चू कडू यांनी दोन वर्षांची शिक्षा सुनावली …
Read More »नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार भरघोस मदत : अधिवेशनात घोषणा!
जळगाव,धुळे, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यांना मागील दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने झोडपले.अवकाळी पावसात कांदा, गहू, मूग आणि हरभरासह भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे मंत्री गिरीश महाजन यांनी धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्याची पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आल्याचेही गिरीश महाजन यांनी सांगितले.अवकाळी पावसामुळे नुकसानीचा तात्काळ पंचनामे करून नागरिकांना लवकरात लवकर मदत देण्याचे अश्वासनही …
Read More »नागपूर झेडपी सभापतीने शासकीय फर्निचर दिले आंदणात : राजकीय चर्चा
नागपूर जिल्हा परिषदेतील विषय समिती सभापतींच्या सरकारी निवासस्थानांवरील फर्निचर गायब झाल्याची जोरदार चर्चा झाली. हा मुद्दा अलीकडे चांगलाच गाजला. यामुळे सत्तापक्ष अडचणीतही आला होता. सुरुवातीला हा मुद्दा लावून धरणाऱ्या विरोधीपक्षाला सर्वसाधारण सभेदरम्यान मात्र या मुद्दाचा विसर पडला. विरोधकांनी रागाच्या भरात सभात्याग केला आणि माजी सभापतींचा जीव भांड्यात पडला. परंतु, यामुळे काहीजण दुखावल्याची चर्चा आहे. फर्निचर कोणी नेले? जिल्हा परिषद अध्यक्ष, …
Read More »बडनेऱ्यात महाप्रसादाच्या कार्यक्रमातून 5 महिलांचे मंगळसूत्र चोरी
अमरावतीच्या बडनेरा येथील झीरी मंदीर परिसरात मॉ कनकेश्वरी यांचे प्रवचन होते. प्रवचनानंतर महाप्रसादाचे आयोजन केले होते. दरम्यान महाप्रसादाच्या वेळी भाविकांची प्रचंड गर्दी झाली. याच गर्दीचा फायदा घेवून एकाचवेळी पाच महिलांच्या गळ्यातील ६८ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र चोरीला गेले. ही चोरी करणाऱ्या चार महिलांना तत्काळ नागरिकांनी पकडले. त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही घटना रविवारी (दि. ५) सायंकाळी घडली. वर्षा रविन्द्र घ्यार …
Read More »नागपुरात नाना पटोलेंच्या निवासस्थानी सराफा व्यापाऱ्याचा गोंधळ
नागपुरातील एका कार्यक्रमासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले वेळ देऊनही आले नसल्याने या व्यापाऱ्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. पटोले यांच्या नागपुरातील घरी जाऊन व्यापाऱ्यांने गोंधळ घातला. पटोले वचनाप्रमाणे कार्यक्रमाला येतील असा विचार करून आम्ही सर्व तयारी केल्याचं व्यापारी म्हणाला. आम्ही दोन ते अडीच लाख रुपये खर्च केले, मात्र पटोले न आल्याने लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागल्याचं हा सराफा व्यापारी म्हणाला. छत्रपती …
Read More »Maharashtra Unseasonal Rain | नंदुरबारमध्ये वादळी पावसाने बाजारपेठ उध्वस्त : जनावरांचाही मृत्यू
Maharashtra Unseasonal Rain विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्याने आणि पावसाने थैमान घातल्याने पीक व बाजारपेठेचे मोठे नुकसान झाले. नवापूर आणि नंदुरबार येथे वीज पडून चार जनावरांचा मृत्यू झाला, तर काही ठिकाणी झाडे कोसळले व घरांचे पत्रेही उडाले. तळोदा अक्कलकुवा धडगाव आणि नंदुरबार या तालुक्यांमध्ये आज सोमवार 6 मार्च रोजी दुपारी तीन ते पाच वाजताच्या दरम्यान धुळीच्या वादळासह अचानक आलेल्या पावसाने मोठे …
Read More »
विश्वभारत News Website