Breaking News

विश्व भारत

शिंदे-फडणवीसविरुद्ध आक्षेपार्ह ट्विट : नागपुरात तरुणावर गुन्हा, भाजप आमदाराची तक्रार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्वीट केल्यावरून नागपूर पोलिसांनी मुंबईतील एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी कसबा पोटनिवडणूक संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाने आक्षेपार्ह मजकूर टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदाराची तक्रार नागपुरातील लकडगंज पोलिस स्टेशनमध्ये सार्थक कपाडी या तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे. तो मुंबईतील …

Read More »

अवघ्या 15 दिवसात मोडले महिला अधिकाऱ्याचे लग्न : हुंड्यासाठी न्यूझीलंडमधून पतीने दिला त्रास

आयुष्य जगताना अडीअडचणी येतात. त्यावर कौशल्यपूर्वक मात केल्यास बाहेर पडता येते. अशीच प्रचिती एका महिला अधिकाऱ्यासोबत घडली आहे. तिने कशोशीने प्रयत्न करून युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या कोमल गणात्रा यांची ही गोष्ट. त्यांच्या आयुष्यात अनेक समस्या आल्या. पण त्यांनी त्याच्यावर धैर्याने मात केली. त्यांची जीवनकहाणी अडचणींनी भरलेली आहे. कोमल यांचा पती लग्नाच्या 15 दिवसांनंतरच त्यांना …

Read More »

भटक्या कुत्र्यांच्या मुद्दावर बच्चू कडूंचा वादग्रस्त उपाय

महाराष्ट्र विधानसभेत भटके कुत्रे आणि त्यांच्यामुळे होणाऱ्या त्रासावर चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान प्रहार जनशक्तीचे पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी वादग्रस्त विधान केले आहे. भटक्या कुत्र्यांची समस्या सोडवण्यासाठी त्यांना आसामला पाठवा, कारण आसामची लोक कुत्रे खातात, असे वादग्रस्त विधान बच्चू कडू यांनी केले.आसाममध्ये कुत्र्यांना 8 हजार रुपयांचा दर मिळू शकतो, यामुळे राज्यातली भटक्या कुत्र्यांची समस्या दूर होईल आणि कुत्र्यांची लोकसंख्याही …

Read More »

भाजप करतेय शिवसेनेला ‘अंडरएस्टीमेट’!

✍️मोहन कारेमोरे मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि शिंदे गटात हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. त्यात भाजप आहेच. शिवसेनेला डिवचण्याचे काम भाजप पद्धतशीरपणे करीत आहे. तसेच सेनेला ‘अंडरएस्टीमेट’करून आपणच कसे योग्य आहोत, हे दाखविण्याचा खटाटोप भाजप करतेय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. सेनेचीही भाजपवर आगपाखड यापूर्वी शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’तून शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका करण्यात आली आहे. भाजप आणि शिंदे गटाकडून …

Read More »

चंद्रपुरातील 30 वाघांचे संभाजीनगर,गोंदिया, कोल्हापूर, अमरावती जिल्ह्यात स्थलांतरण

चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या मृत्यूच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. तसेच अलीकडील घटना लक्षात घेता मानव-वन्यजीव संघर्ष वाढत आहे.जिल्ह्यात २०३ वाघ आहेत. लवकरच जिल्ह्यातील ५ वाघ नवेगाव-नागझिराच्या जंगलात स्थलांतरित केले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात सह्याद्री, मेळघाट, संभाजीनगर येथे २५ वाघ स्थलांतरित केले जाणार आहे, अशी माहिती राज्याचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. सावली तालुक्यातील पेंढारी मक्ता …

Read More »

गडकरींच्या संकल्पनेला ‘काँग्रेस’ची मान्यता ; महामार्गावरील बांबू बॅरिअरचा पहिला प्रयोग विदर्भात

200 मीटर लांबीचे हे बॅरिअर सध्या वणी ते वरोरा महामार्गावर लावण्यात आले आहे. या बॅरिअरचे नाव ‘बाहुबली’ ठेवण्यात आले असून, राष्ट्रीय वाहन चाचणी ट्रॅकसह पिथमपूर, इंदूर आणि इतर काही ठिकाणी याच्या चाचण्या घेण्यात आल्या. रूरकीच्या केंद्रीय इमारत संशोधन संस्थेत याची अग्निरोधक चाचणी घेण्यात आली. या चाचण्यांनंतर भारतीय रोड काँग्रेसने याला मान्यता दिली आहे. अपघात होऊ नये म्हणून महामार्गाच्या कडेला लावण्यात …

Read More »

नागपुरात यू-ट्यूब बघून अल्पवयीन मुलीने स्वत:चीच केली प्रसूती

गर्भवती असल्याची माहिती दडवून ठेवणाऱ्या अल्पवयीन मुलीने यू-ट्यूब पाहून स्वत:च प्रसूती करून बाळाला जन्म दिल्याची घटना नागपुरातून समोर आली. हे बाळ रडल्यास साऱ्यांना माहिती होईल, आपले बिंग फुटणार या भीतीतून नंतर पट्ट्याने गळा आवळून त्याचा जीव घेतला. हृदयाचा थरकाप उडविणारी ही घटना शुक्रवारी मध्यरात्री शहरातील अंबाझरी पोलिस स्टेशनच्या हद्दीत उघडकीस आली. मुलीची प्रकृती चिंताजनक असून, तिच्यावर शासकीय इस्पितळात उपचार सुरू …

Read More »

बारावी पेपरफुटीप्रकरणी पाच जणांना अटक

बारावी गणिताचा पेपर फुटल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. साखरखेर्डा पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून यात दोन शिक्षकांचा समावेश आहे. पेपर सुरु होण्याचा अर्धा तासापूर्वी गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. एकच खळबळ उडाला होती. याप्रकरणात दोन शिक्षकांसह आजुबाजुच्या गावातल्या तीन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यावर कलम 420 आणि 120 ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र …

Read More »

नागपूर-बिलासपूर ‘वंदे भारत एक्सप्रेस’ला प्रवासी मिळेना

दहा वंदे भारत एक्सप्रेस देशातील वेगवेगळ्या शहरादरम्यान धावत आहेत.या गाड्यांची लोकप्रियताही कमालीची वाढली आहे. वेगवेगळ्या पक्षाच्या खासदारांनी त्यांच्या मतदारसंघात वंदे भारत एक्सप्रेस सुरू व्हावी, अशी मागणी रेल्वेमंत्र्याकडे केली आहे. नेमकी उलट स्थिती नागपूर ते बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसबाबत आहे. मध्य भारतात या गाडीकडे प्रवाशांनी पाठ फिरविली आहे. 55 टक्के प्रवासी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर-बिलासपूर वंंदे एक्सप्रेसला 11 डिसेंबर 2022 …

Read More »

महिला पुरवठा अधिकारी लाच घेताना अटकेत

पाच हजार रुपयांची लाच घेताना पुरवठा निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. गुरुवारी दुपारी साडेपाच वाजता दरम्यान यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील तहसील कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. स्नेहल राजेंद्र देशमुख (वय 36) असे या पुरवठा निरीक्षकाचे नाव आहे. आर्णी तालुक्यातील तळणी येथील रास्तभाव दुकानदाराला अंत्योदयमधील कमिशनचे बिल काढण्यासाठी पाच हजाराची लाच मागितल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यावरून गुरुवारी …

Read More »