Breaking News

विश्व भारत

मुलगा पाण्यात पडला, वाचवण्यासाठी आईचीही उडी…

पोटच्या गोळ्यासाठी आई जगातील सर्व संकटांना तोंड देऊ शकते, हे म्हणतात ते काही खोटं-नाट नाही. आई मुलांसाठी जीवही द्यायची वेळ आली तरी मागे हटत नाही. राजस्थानमधील डुंगरपूर जिल्ह्यात असेच एक प्रकरण घडले आहे. एका आईने मुलाला बुडण्यापासून वाचवण्यासाठी जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेतली. खूप प्रयत्न करूनही ती ना मुलाला वाचवू शकली ना स्वतःला वाचवू शकली. त्यानंतर तेथे पोहोचलेल्या …

Read More »

काँग्रेसचे २२ आमदार भाजपच्या संपर्कात… वाचा

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर आता २९ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. या सुनावणीनंतर शिंदे -फडणवीस सरकार पडणार आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे २२ आमदार फोडण्याची रणनिती आखली आहे, असा दावा शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. ते औरंगाबाद येथे शिवसेनेच्या बैठकीत बोलत होते. या विधानामुळे राज्याच्या …

Read More »

अभियंत्याला ५० लाखांची लाच घेताना अटक

मुंबई महापालिकेच्या पूर्व विभागाचे कार्यकारी अभियंता यांना अनधिकृत शेड न तोडण्यासाठी ५० लाखांची लाच घेताना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली. कार्यकारी अभियंता सतीश पवार यांनी एका कंपनीची अनधिकृत शेड न तोडण्यासाठी ५० लाखांच्या लाचेची मागणी केली होती. यानंतर कंपनीच्या मालकांनी कार्यकारी अभियंता सतीश पवार यांच्याविरोधात मुंबई पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली …

Read More »

तुळशी विवाहासाठी पूजेची करा तयारी, मातेचा घ्या आशीर्वाद

कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवउठनी एकादशी म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांनी योगनिद्रातून जागे होतात. आणि भगवान शिवाकडून पदभार स्वीकारतात. या दिवशी उपासना आणि उपवास करण्याचे विशेष महत्त्व आहे. तुळशी विवाह दरवर्षी कार्तिक शुक्ल एकादशीला केला जातो. पंचांगानुसार यंदा तुळशी विवाह शनिवार,5 नोव्हेंबरला होत आहे. या दिवशी तुळशीचा विवाह भगवान विष्णूचे आराध्य दैवत शालिग्रामशी होतो. शास्त्रानुसार या एकादशीचे …

Read More »

तुळशीच्या बिया पानासोबत खा : इम्युनिटी बूस्ट होईल, पचन सुधारेल, सर्दीपासूनही आराम

पान खाण्याचे शौकीन अनेक आहेत. सुपारी, कात आणि चुना मिसळून पान खातात. हे आरोग्यासाठी खूप हानिकारक मानले जाते, परंतु असे म्हणतात की प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. त्याचप्रमाणे पान खाण्याचे अनेक फायदे आहेत. परंतु याचे सेवन कात-चुना टाकून न करता तुळशीच्या बिया टाकून करणे फायदेशीर ठरते. विड्याची पाने थोडी कडवट, तुरट असली तरी आरोग्यासाठी कोणत्याही औषधापेक्षा कमी नाहीत. अनेक रोगांचे …

Read More »

शिवसेना फुटीला उद्धव ठाकरे जबाबदार – आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट

राज्यात एकनाथ शिंदेंसह ४० आमदारांनी भाजपाला साथ देत सरकार स्थापन केलं. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. यानंतर शिवसेनेत फूट कोणामुळे पडली, अशा चर्चा रंगू लागल्या. काही जणांनी यासाठी भाजपाला, तर काहींनी राष्ट्रवादीला जबाबदार धरलं. यावर शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आमदार आदित्य ठाकरेंनी यावर भाष्य केलं आहे. आदित्य ठाकरेंनी शिवसेनेतील बंडखोरीवरून गौप्यस्फोट केला आहे. “शिवसेनेतील फुटीला उद्धव ठाकरे आणि …

Read More »

सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकाऱ्याला पुण्यातून अटक

सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकारी रामनारायण लक्ष्मीनारायण गगराणी (वय -65, रा. शारदानगर, नांदेड) यांना नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने शुक्रवारी पुण्यातील कोथरूड-कर्वेनगर परिसरातून अटक केली. गगराणी यांच्याविरूध्द नांदेड जिल्ह्यातील वजीराबाद पोलिस ठाण्यात अपसंपदा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्या गुन्हयात गगराणी यांना अटक करण्यात आली आहे. गगराणी यांना पुण्याच्या कर्वेनगर परिसरातून पथकाने नांदेड अ‍ॅन्टी करप्शनच्या टीमने ताब्यात घेतले. गगराणी यांनी त्यांच्या ज्ञात उत्पन्नापेक्षा 28 …

Read More »

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्याकडून मंत्रालयात प्रवेश करताना वाद

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. गुरुवारी मंत्रालयात प्रवेश करताना संतोष बांगर यांनी पोलिसांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. मंत्रालयाच्या गार्डन गेटमधून कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यावरुन वादाला सुरुवात झाली. कार्यकर्त्यांची नोंद न घेता थेट प्रवेश द्यावा, या मागणीसाठी बांगर आग्रही होते. तेव्हा पोलिसांनी कार्यकर्त्यांना नियमाप्रमाणे जाऊ न दिल्यानं बांगर संतापले आणि त्यांनी शिवीगाळ करीत हुज्जत घातली. हा वाद सोडवण्यासाठी …

Read More »

कापसाचा दर 15 हजार ? शेतकऱ्यांची अपेक्षा

पांढऱ्या सोन्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आयुष्याचं सोनं होण्याची आशा दिसत आहे. नगदी पीक असलेल्या कापसाला मागील वर्षाचा हंगाम संपताना 14 हजारांवर भाव मिळाला होता. यावर्षीही कापसाचं पीक शेतकऱ्यांसाठी नवा आशेचा किरण घेऊन आलं आहे. यावर्षी हरियाणा राज्यातील पालवाल जिल्ह्यात या हंगामातील नवीन कापसाची आवक सुरु झाली आहे. इथे कापसाला 10 हजार रुपयांचा दर मिळाला आहे. हरियाणा आणि पंजाबच्या इतर भागात सप्टेंबरपासून …

Read More »

मुलांपेक्षा मुली अधिक तणावाखाली : लुक्सबाबत चिंतित ; आई-वडील नेहमी बोलतात

मुलांपेक्षा मुली जास्त तणावाखाली दिसतात. बालपणापासून किशोरवयीन होईपर्यंत तर किशोरवयीनपासून तारुण्यापर्यंत अनेक मानसिक दडपणातून मुली जातात. या कालखंडात ते साहजिकच कदाचित सर्वात जास्त तणावग्रस्त असल्याचे दिसून आले आहे. एकंदरीत मुलींमध्ये नैराश्य आणि चिंता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, असे न्यूरोसायंटिस्टचे म्हणणे आहे. ‘गर्ल्स ऑन द ब्रिंक: हेल्पिंग अवर डॉटर्स थ्राईव्ह इन एरा ऑफ इन्क्रिज्ड अ‌ॅन्झायटी, डिप्रेशन अँड सोशल मीडिया’ या पुस्तकात …

Read More »