Breaking News

विश्व भारत

तहसीलमध्ये अडकले महिला, वृद्धांचे अनुदान

संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना लाभार्थींमध्ये सर्वसाधारण, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती असे गट पाडून अनुदान वितरणाला सुरुवात झाली आहे. या लाभार्थींना अनुदान सध्या उपलब्ध झाले आहे. आतापर्यंत एप्रिल ते सप्टेंबर पर्यंतचे अनुदान वितरीत झाले. तरी ऑक्टोबरचे अनुदान अद्याप वितरीत करण्यात आलेले नाही. ऑक्टोबर महिन्याचे अनुदान प्रोसेसमध्ये असल्याचे संजय गांधी योजना कार्यालयाने सांगितले. सहा योजनांच्या माध्यमातून एक लाख …

Read More »

बैल चारत असताना वाघाचा हल्ला : शेतकरी ठार

बैल चारत असताना वाघाने हल्ला करुन एका शेतकऱ्यास ठार केले. ही घटना गुरुवारी (दि.३) दुपारी दोन वाजताच्या सुमारास गडचिरोलीपासून ८ किलोमीटर अंतरावरील राजगाटा चेक गावानजीक घडली. सुधाकर भोयर (वय ५० रा.राजगाटा चेक) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सुधाकर भोयर हे आज बैल घेऊन शेतावर गेले होते. शेतालगतच्या जंगलात बैल चारत असताना अचानक भोयर यांच्यावर वाघाने हल्ला केला. यात ते …

Read More »

कुरकुऱ्याचा ट्रक नदीत कोसळला

मुंबई-आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील सावळदेजवळ तापी नदीच्या पुलावरून कठडा तोडून ट्रक नदीपात्रात कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात चालकाचा मृत्यू झाला असून क्लीनरला वाचवण्यात यश आले आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून पुणे येथून मध्य प्रदेशकडे एक आयशर कुरकुरे घेऊन जात होता. हा आयशर शिरपूर तालुक्यातील सावळदे गावाजवळील तापी नदीच्या पुलावर आला असता चालकाचे अचानक गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे हा ट्रक …

Read More »

तुळशी विवाहानंतर लग्न योग : जूनपर्यंत ५८ मुहूर्त

कार्तिक एकादशीला दीपावली उत्सवाची सांगता होत असते.५ नोव्हेंबरला कार्तिक शुक्ल द्वादशी असून या दिवसापासून ते कार्तिक शुक्ल पौर्णिमा अर्थात ८ नोव्हेंबर पर्यंत तुळशी विवाह साजरा करण्याची रुढ परंपरा आहे. ५ नोव्हेंबरला चातुर्मास समाप्ती आणि शनी प्रदोष व शाकव्रत समाप्ती असल्याने या दिवसापासून विवाह सोहळे सुरू होणार आहेत. यावर्षी जवळपास ५८ विवाह मुहूर्त असल्याचे समजते. भारतीय पंचांगानुसार तत्कालीन पर्यावरणीय वर्तमाननुसार पावसाळा …

Read More »

हिवाळ्यात गुडघेदुखीचा त्रास : ‘या’ 3 गोष्टी उपयोगात आणा

सांधेदुखीच्या रुग्णांसाठी हिवाळा त्रासदायक असतो. थंडीमुळे हाडे आणि गुडघे दुखू लागतात. हाडांच्या सांध्यांमध्ये युरिक अॅसिड वाढल्याने सांधेदुखी सुरू होते. तज्ज्ञांच्या मते, भारतात दर पाचपैकी एकाला संधिवात आहे. पूर्वी हा आजार फक्त वयोवृद्ध लोकांमध्ये दिसून येत होता, पण आता तरूणांनाही सांधेदुखी आणि सांधेदुखीचा त्रास होत आहे.त्यामुळे चालणे सर्वात कठीण होते. त्यामुळे चला जाणून घेऊया हिवाळ्यात सांधेदुखीच्या रुग्णाने कोणत्या गोष्टी खाव्यात. लसूण …

Read More »

दम देऊ नका, घरात घुसून मारू : रवी राणा, कुठे यायचे ते सांगा, मार खायला तयार : बच्चू कडू

दम देऊन बोलत असतील, तर घरात घुसून मारण्याची हिंमत ठेवतो. जशास तसे उत्तर देईल. ते ज्या स्तरावर म्हणतील, त्या स्तरावर उत्तर देईन, असा इशारा बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांनी बुधवारी बच्चू कडू यांना दिला. ते अमरावतीत बोलत होते. बच्चू कडू आणि माझा वाद सीएम, डेप्टी सीएम मिटवला. मी स्वःतही तो वाद मिटवला. मात्र, कुणी मला जर दम देत असेल, तर …

Read More »

डॉक्टरांनी मृत मुलात ओतलाय जीव… वाचा कसं दिलं जीवदान

प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू हा निश्चित आहे. मृत्यू कधी कसा येईल? हे कोणीच सांगू शकत नाही. असं असलं तरी डॉक्टरांना देवाचा दर्जा देण्यात आला आहे. पण कधी कधी डॉक्टरही रुग्णाला वाचवताना हतबल होऊन जातात. सर्वकाही देवाच्या हातात असं सांगून नातेवाईक मनाची समजूत घालतात. अशा प्रसंग आपण चित्रपटात पाहतो आणि अनेक चमत्कार पाहतो. मृत्यूचा दाढेतून रुग्ण परत येतो. असाच काहीसा चमत्कार प्रत्यक्षात …

Read More »

मासेमारीला गेलेल्या व्यक्तीचा तलावात मृत्यू

चंद्रपूर : सावली तालुक्यातील केरोडा येथील तलावात मासेमारीसाठी गेलेल्या एका व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. सुखदेव बापू राऊत (वय ६०) असे मृतकाचे नाव आहे. केरोडा येथील सुखदेव राऊत हे तीस वर्षांपासून मासेमारीचा व्यवसाय करूनच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. सोसायटीच्या वतीने केरोडा गावातीलच तलावात मासेमारी करण्यात आली. संस्थेतंर्गत असलेल्या काही गावातील मत्स्य व्यवसायिक केरोडा …

Read More »

नागपुरात मिहानमध्ये टाटा करणार गुंतवणूक : गडकरी, फडणवीस प्रयत्नशील

राज्यातील गुंतवणूक बाहेर जात असल्याच्या आरोप सध्या होत आहे. या सध्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर टाटा समूहाने नागपुरातील ‘मिहान’मध्ये गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे. यासंदर्भात पत्र टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पाठविले आहे. तसेच विदर्भात उद्योग प्रकल्प यावेत, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही प्रयत्नशील आहेत. गडकरी यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन यांना पत्र पाठवून नागपुरातील ‘मिहान’मध्ये गुंतवणुकीची …

Read More »

शिंदे सरकार कोसळणार?राष्ट्रपती राजवटीचा पर्याय

महाराष्ट्रात सत्तासंघर्ष अजूनही सुरूच आहे. सर्वोच्च न्यायालयाने 29 नोव्हेंबरपर्यंत सुनावणी पुढे ढकलली असली तरी यातून शिंदे सरकार कोसळणार की पायउतार होणार? हा चर्चेचा विषय आहे. याबाबत घटनातज्ज्ञ काय म्हणतात… वाचा “पक्षांतर बंदी कायद्यानुसार सुरुवातीला बाहेर पडणारे १६ आमदार दोन-तृतीयांश आमदार नाहीत. पण त्यानंतर एक-एक करत अनेक आमदार बाहेर पडले आणि त्यांनी दोन तृतीयांशसाठी आवश्यक असणारा ३७ चा मॅजिक आकडा गाठला. …

Read More »