Breaking News

राज्य

नाशिक, नगरमध्ये ढगफुटी! शेतीचे नुकसान

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात आज शुक्रवारी सकाळपासून ढगफुटी सारखा पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे नुकसान झाले असून काहींच्या घराची मोडतोड झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातही पावसाने कहर केला आहे. काही ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झालेला आहे. सप्टेंबर मध्ये आणखी पाऊस वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात पाऊस असमाधानकारक आहे. औरंगाबाद मधील सर्वच गावातील शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा …

Read More »

मंत्रीमंडळ विस्तार ऑक्टोबरमध्ये? नाराजीची भीती

– मोहन कारेमोरे मुंबई : मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्ताराला ऑक्टोबर महिना उजाडण्याची शक्यता आहे. मंत्रीमंडळात स्थान न मिळालेल्या नाराजांना १५ सप्टेंबरपर्यंत मंत्री करण्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. पण, विस्ताराला होणारा विलंब लक्षात घेता नाराजी उघडपणे दिसण्याची शक्यता आहे. शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर ३८ दिवसांनी मंत्र्यांचा शपथविधी झाला. त्यात शिंदे गटातील काही आमदारांच्या नावावर फुली मारली गेल्याने …

Read More »

पाऊस रुसलेलाच, बळीराजा चिंतेत औरंगाबाद जिल्ह्यात बाप्पाचे जल्लोषात आगमन

औरंगाबाद : जिल्ह्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र, जिल्ह्यात अजून ३९ टक्के तूट आहे.२४ जून रोजी ५१.२ मिमी तर ४ ऑगस्टला ४७.५ मिमी, ७ ऑगस्ट रोजी २२ मिमी, १५ ऑगस्ट रोजी १०.५ पाऊस पडला होता. त्यानंतर पावसाने दडी मारली होती.१ जून ते ३१ ऑगस्टपर्यंत एकूण ४८६.२ मिमी पावसाची नोंद आहे. आता परतीच्या पावसाला सुरुवात झाली, असे म्हणता येईल. मात्र …

Read More »

आज नागपूर, चंद्रपूरमध्ये जोरदार पावसाची शक्यता

नागपूर : नागपूर, चंद्रपूरसह काही जिल्ह्यात विजांसह काही ठिकाणी आज बुधवारी मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, पुणे, अहमदनगर,औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, यवतमाळ जिल्ह्यांचा समावेश आहे. मागील काही दिवसापासून पावसाने दडी मारली आहे.आता पुन्हा पाऊस धो-धो बरसेल, असे हवामान विभागाने सांगितले आहे. त्यामुळे …

Read More »

*सिंचन घोटाळ्यात थातूरमातुर कारवाई* मुख्य याचिकाकर्ते मोहन कारेमोरे यांचा आरोप

मुंबई : राज्यातील सिंचन गैरव्यवहारात थातूरमातुर कारवाईचे गाजर दाखविण्यात येत असून निव्वळ राजकारण सुरु आहे, असा आरोप अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक आणि मुख्य याचिकाकर्ते मोहन कारेमोरे यांनी केला आहे. तसेच यात ठोस कारवाई न झाल्यास पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती कारेमोरे यांनी दिली. तसेच या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्याविरोधात कारवाईची मागणी करणारे पत्र कारेमोरे यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री, …

Read More »

अधिकाऱ्यांच्या जंबो बदल्यांचा आठवडा! मोहन कारेमोरेंची पारदर्शकतेची मागणी

नागपूर : महसूल, परिवहन, वन, सिंचन, शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, गृह विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या या आठवड्यात होणार आहेत. मात्र, यात होणारा गैरव्यवहार थांबवावा, अशी मागणी अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी केली आहे. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात काम केल्यानंतरही काही सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांवर अन्याय झालेला आहे. काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीला एक-दोन वर्ष शिल्लक असूनही घराजवळ नोकरीचे स्वप्न …

Read More »

तर-फडणवीस महाराष्ट्राचा मित्र की शत्रु ?.

तर-फडणवीस महाराष्ट्राचा मित्र की शत्रु ?. महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या न्याय हक्कसाठी लढणारे मराठी हृदय सम्राट कुठे आहेत?. रेमडीसीविर इंजेक्शन साठेबाजी करणाऱ्या गुजराती व्यापाऱ्यांसाठी कुप्रसिद्ध माजी मुख्यमंत्री व आजचे विरोधी पक्षनेते पोलीस ठाण्यात रात्री बारा नंतर उपस्थित राहून पोलिसांवर दबाव आणतात त्याविरोधात कुठेच खल्याळ खटायकआवाज ऐकू आला नाही.मराठी माणसाचे ठेकेदार समजणारे महाराष्ट्राचे मित्र आहेत की शत्रू?. जगात सर्वत्र कोरोनाने हाहाकार माजवला आहे. जगात …

Read More »

महाराष्ट्रात लॉकडाउन? दोन दिवसांत उद्धव ठाकरे निर्णय घेणार मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान

महाराष्ट्रात लॉकडाउन? दोन दिवसांत उद्धव ठाकरे निर्णय घेणार मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान राज्यात ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंधांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आलेली दिसत नाही. दैनंदिन रुग्णसंख्या वाढत असून राज्य सरकारची चिंता वाढली आहे. दरम्यान राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन लागण्याचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री …

Read More »

मेघे परिवार भाजपसोबतच : माजी खासदार दत्ता मेघे

पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार महापौर संदीप जोशी यांनी घेतली सदिच्छा भेट नागपूर, ता. १० : नागपूर पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार महापौर संदीप जोशी यांनी आज विदर्भातील ज्येष्ठ नेते माजी खासदार दत्ता मेघे यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. मेघे परिवार भाजपसोबतच असून पदवीधर मतदारसंघातील भाजप उमेदवाराचा विजय पक्का आहे, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. या भेटीच्या वेळी दत्ता मेघे …

Read More »

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 4 हजार 700 कोटी : विजय वडेट्टीवार

नागपूर : सरकारी मदतीची वाट पाहणाऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. जून ते ऑक्टोबर या कालावधीत विविध जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व पुरामुळे बाधीत झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नुकसान भरपाईच्या पहिल्या हप्त्यापोटी 2297 कोटी 6 लाख 37 हजार रुपयांचा निधी वितरीत करण्याचे आदेश आज काढण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पूरग्रस्त भागाचा दौरा करून 10 हजार कोटींची नुकसानभरपाई देण्यात येईल असे …

Read More »