सिरीया व टर्कीत आलेल्या भूकंपाने हाहाकार माजवला होता. टर्की आणि सीरीया देशातील भूकंपात हजारो लोकांचे प्राण गेले असून, लाखो जखमी झाले आहेत. अद्यापही बचावकार्याची प्रक्रिया टर्कीत सुरु आहे. अशातच राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्थेने (एनजीआरआय) मोठा इशारा दिला आहे. उत्तराखंडमध्ये कधीही भूकंप होण्याची शक्यता एनजीआरआय संस्थेने व्यक्त केली आहे. तर, मुंबईला थोडाफार धोका आहे. नागपूरला कमी धोका असल्याचे म्हटले आहे. एनजीआरआय …
Read More »एप्रिलपासून वीज दरवाढ!
नागरिकांच्या खिशाला पुन्हा महागाईचा झटका मिळण्याची शक्यता आहे.मुंबईतील तिन्ही वीज कंपन्यांची प्रस्तावित दरांबाबतची सुनावणी पूर्ण झाली आहे. सुनावणीत सहभागी झालेल्यांना आता 23 फेब्रुवारीपर्यंत हरकती नोंदवता येतील. त्यानंतर 1 एप्रिलपासून प्रस्तावित दर लागू होण्याची शक्यता आहे. वीज वितरण कंपन्यांची पंचवार्षिक वीज दरनिश्चिती 1 एप्रिल 2020 पासून झाली. तिसरे वर्ष संपताना या पंचवार्षिक वीज दरवाढीचा फेरआढावा घेतला जातो. त्यानुसार वीज कंपन्या अंतिम …
Read More »शरद पवार, संजय राऊत यांनीच फोडली शिवसेना : गंभीर आरोप
भाजपा नेते राम शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “या राज्यात शरद पवार व संजय राऊत यांनी पहिल्यांदा शिवसेना फोडण्याचं काम केलं,” असा आरोप राम शिदेंनी केला. तसेच सकाळ-दुपार-संध्याकाळ फडफड बोलणाऱ्या संजय राऊतांनी यावरही बोलावं, असं म्हणत हल्ला चढवला. राम शिंदे म्हणाले, “संजय राऊत सकाळ-दुपार-संध्याकाळ फडफड बोलतात. मात्र, त्यांनी शिवसेनेला पहिल्यांदा …
Read More »नागपुरात बाळ तस्करीचा पर्दाफाश!18 पेक्षा अधिक बाळांची विक्री, सूत्रधार अटकेत
बाळाची तस्करी करणाऱ्याला नागपुरातून अटक करण्यात आली आहे. या रॅकेटची सूत्रधार आयशा खान ऊर्फ श्वेताने अटकेतील रेखा अप्पाजी पुजारी (वय 54, रा. निर्मल कॉलनी) या महिलेच्या माध्यमातून आतापर्यंत 18पेक्षा अधिक बाळांची विक्री केली, अशी धक्कादायक आहे. रेखाला पाच दिवसाची पोलिस कोठडीत असून, गुन्हेशाखा पोलिस तिची कसून चौकशी करीत आहेत. सखोल चौकशीनंतर बाळविक्रीचा आकडा वाढू शकतो. माहितीनुसार, आयशा खान ही धंतोलीतील …
Read More »तुम्ही साखर किती खाताय?आजच थांबवा…!
आयुष्यात किती साखर खातो हे कधी तुम्ही मोजलय का ? काहीजण तर गोड खाल्ल्याशिवाय राहूच शकत नाहीत. पण जर तुम्हीसुद्धा प्रमाणापेक्षा जास्त साखर खात असाल तर सावधान व्हा!तुम्ही ही बातमी पूर्ण वाचा आणि वेळीच सावध व्हा. साखर ही अशी गोष्ट आहे जी न खाता कोणीच राहू शकणार नाही. साखरेचा वापर प्रत्येक गोड पदार्थात केलाच जातो. दररोज बरेच जण कोणत्या ना …
Read More »“मला मारण्याचा डाव”, अशोक चव्हाणांचे खळबळजनक विधान!
काँग्रेसचे दिग्गज नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नावाचे खोटे लेटरपॅड तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. अशोक चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यांच्या अधीक्षकांना भेटून तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आपल्यावर अज्ञात व्यक्तीकडून पाळत ठेवली जात असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.बोगस लेटरपॅडच्या आधारे अशोक चव्हाण मराठा समाजाच्या विरोधात आहेत, असा संभ्रम लोकांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला …
Read More »पहाटेच्या शपथविधीवर कोश्यारींचा गौप्यस्फोट : पवारांवर ताशेरे
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीच्या अनेक गोष्टी अजूनही महाराष्ट्रात चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी फडणवीसांच्या विधानाने ही घटना पुन्हा केंद्रस्थानी आली. पण सगळ्या घटनांचे साक्षीदार असलेले माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी याबद्दल कधीही बोलले नाही. राज्यपाल पदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर कोश्यारींनी पहाटेच्या शपथविधीबद्दल एका चॅनेलवर भाष्य केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी शरद पवारांनाही सुनावले आहे. शपथविधी… राज्यपाल कुणाला बोलवत नाही. …
Read More »चीन भारताला घाबरतोय
“चीनला भारतावर आक्रमण करणे सोपी नाही. भारताकडे सुसज्ज शस्त्र आहे. भारत आज जगाचे नेतृत्व करीत आहे. अमेरिका, रशियानंतर उत्कृष्ट आणि अचूक अंदाजावर मारा करणारे क्षेपणास्त्रही भारताकडे आहे. त्यामुळे कोणत्याही शत्रू राष्ट्राला घाबरण्याची गरज नाही,”असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष सल्लागार डॉ. दिपक वोहरा यांनी केले. विदर्भ मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे डॉ. दिपक वोहरा यांच्या जाहीर व्याख्यानाचे आयोजन नागपूर येथे करण्यात आले …
Read More »महाराष्ट्रात मुंगसाची शिकार, गुजरातच्या चौघांना अटक
नाशकातील दिंडोरी तालुक्यातील अकराळे परिसरातील न्याहारी डोंगराच्या राखीव वन क्षेत्रात मुंगसाची शिकार करणाऱ्याना वनविभागाने जेरबंद केले. प्रकरण असे… दिंडोरी तालुक्यातील नाशिक कळवण रस्त्यालगत असणाऱ्या ऐतिहासिक न्याहारी डोंगराच्या पायथ्याशी वनविभागाचे राखीव वनक्षेत्र आहे.या परिसरात गेल्या काही दिवसापासून वन्य प्राण्यांची शिकार केली जात असल्याची माहिती वन विभागाला मिळाली. त्यानुसार गुरुवारी गुजरात राज्यातील पाच संशयताच्या टोळीने न्याहारी डोंगराच्या पायथ्याशी वनविभागाच्या क्षेत्रात दोन मुंगसाची …
Read More »मनसेतर्फे शिवाजी महाराज जयंती साजरी
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रामटेक तालुक्यातील मनसर येथील वृद्धाश्रमात केक व मिठाई वितरित करण्यात आली. वृद्धाश्रमातील आबाळ-वृद्धांसमवेत रामटेक तालुका मनसे अध्यक्ष शेखर दुंडे यांचे अध्यक्षतेखाली शिव-जयंती उत्सव साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमात राजसाहेब ठाकरे यांचे नेतृत्वातच महाराष्ट्रात पुन्हा रयतेचे राज्य निर्माण होईल,असा आशावाद वृद्धाश्रमातील आबाळ-वृद्धांनी व्यक्त केला.कार्यक्रमाचे कौतुक करीत सहभागी सर्वांना आशिर्वाद दिला. सदर प्रसंगी माजी …
Read More »
विश्वभारत News Website