पतीने तिच्याकडे नेहमी लक्ष द्यावे, अशी प्रत्येक पत्नीची इच्छा असते. परंतु काही वेळा पुरुष कामात इतके व्यस्त होतात की ते पत्नीकडे लक्ष देऊ शकत नाहीत, अशावेळी पत्नी संशय घेऊ शकते. पतीने पत्नीला जाताना आणि परत आल्यानंतर मिठी मारली पाहिजे. तिची स्तुती केली पाहिजे, तिची काळजी घेतली पाहिजे. खालील गोष्टीकडे द्या लक्ष👇 🌹मोबाईल हा आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक झाला आहे. याशिवाय …
Read More »नागपुरात आहे राज्यातील सर्वात उंच शिवमूर्ती
महाशिवरात्रीनिमित्ताने सर्व शिव मंदिरे आकर्षक पद्धतीने सजली आहेत. नागपूर शहरातील नंदनवन भागात असलेली 51 फुट उभी शंकराची मूर्ती ही केवळ नागपुरातीलच नव्हे तर, संपूर्ण महाराष्ट्रात उंच शंकराची मूर्ती आहे. महाशिवारात्रीच्या निमित्ताने या मंदिरात लाखो भक्तांची गर्दी होते. त्याचबरोबर हे मंदिर अनेकांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे. यंदा काय आकर्षण? आदि आणि अनंताची महादेवता अशी महाशिवाची ओळख आहे. नागपूर शहराला गोंड राजवटीसह भोसलेकालिन …
Read More »सावधान!5 पदार्थ लिव्हर आणि किडनीसाठी घातक
जे पदार्थ खातो, त्याबाबत बऱ्याचवेळा आपल्याला माहिती नसते की, याचा आरोग्यावर काय परिणाम होईल. बर्याच लोकांना हे माहित नसेल की अमोनिया अन्नपदार्थांमध्येही आढळतो. बहुतेक प्रक्रिया केलेल्या मांसामध्ये अमोनिया आढळतात. परंतु अशा अनेक भाज्या आहेत, ज्यामध्ये अमोनिया आधीपासूनच आहे. जर ते जास्त प्रमाणात सेवन केले तर ते शरीराला मोठा धोका पोहोचवतात. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर आहारावर नियंत्रण सर्वात महत्त्वाचे …
Read More »…तर भाजपचा नक्कीच काँग्रेस होईल! सत्तेचा अहंकार सोडा; फडणवीस यांचे पदाधिकाऱ्यांना खडेबोल
केंद्रात, राज्यात सत्ता असल्याने अहंकाराने वागू नका. हा अहंकार जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे नेत्यांनी कार्यकर्ते म्हणून काम करावे अन्यथा भाजपची काँग्रेससारखी स्थिती होईल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. शिक्षक मतदारसंघात भाजप समर्थित उमेदवाराचा पराभव, माजी नगरसेवकांच्या विरोधातील असंतोष, कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ या पार्श्वभूमीवर शुक्रवारी भारतीय जनता पक्षाच्या नागपूर शहर कार्यकारिणीची बैठक झाली.बैठकीच्या समारोपाला फडणवीस …
Read More »‘पीडब्लूडी’ला खड्डे दिसतील का? निव्वळ टोलवसुलीकडे लक्ष : व्यथा नागपूर-अमरावती रस्त्याची
नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत, काही ठिकाणी रस्तेही खराब झाले आहेत. या वर्दळीच्या मार्गावरील खड्डे तत्काळ दुरुस्त करावे, खड्डे असलेल्या मार्गावरील टोलवसुली बंद करावी, अशी मागणी नागरिक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (पीडब्लूडी)करीत आहेत. नागपूर-अमरावती महामार्गावर तीन टोल नाक्यावर वाहनांची गर्दी होत असल्याने वाहनधारकांचा वेळ वाया जातो. नाक्यावरील अनेक काउंटर्स बंद असतात. त्यामुळे रांगा लागतात व स्वयंचलित …
Read More »हॉटेलमध्ये पार्टी देण्यासाठी लाच : तलाठ्याच्या खासगी मदतनीसास अटक
सातबारा उताऱ्यावर तक्रारदारांच्या वडिलांचे नाव लावून दिल्याच्या मोबदल्यात हॉटेल पार्टी करीत बिलाचे पैसे घेतल्याप्रकरणी एका खासगी व्यक्तीस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. रवींद्र कारभारी मोरे (42, रा. चांदवड) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे.मोरे हा तलाठी कार्यालयात खासगी मदतनीस म्हणून काम करत असल्याचे समोर आले आहे. चांदवडमधील 31 वर्षीय तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार, कांदा खरेदी विक्रीचा व्यवसाय असून त्यासाठी त्यांनी त्यांच्या …
Read More »खळबळ : तहसील कार्यालयात जप्त वाळूचे ट्रॅक्टर चोरीला
पैठण गोदावरी नदीतून वाळू तस्करी करताना जप्त केलेले ट्रॅक्टर तहसील कार्यालयातून अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली. महसूल विभागाकडून बुधवारी रात्री उशिरा चोरीला गेलेल्या ट्रॅक्टरची तक्रार पैठण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. त्यामुळे महसूल विभागाच्या कामकाजाचे पितळ उघडे पडले आहे. प्रकरण काय? पैठण गोदावरी नदीतून अवैधरित्या वाळू तस्करी करताना महसूल विभागाच्या औरंगाबाद पथकाने 12 जानेवारी रोजी रजनीकांत हिरालाल कटारिया (रा. …
Read More »भाजप आमदाराची मंत्र्याविरोधात आयएएस अधिकाऱ्याकडे तक्रार
भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यात सारं काही सुरळीत सुरु आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचा विचार करताय. या दोन्ही पक्षात सर्व काही आलबेल नसल्याचं काही ठिकाणी पाहायला मिळत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील हा प्रकार आहे. जिल्हा वार्षिक योजना 2022-2023 अंतर्गत निधी वाटपात मोठा असमतोल झाल्याची तक्रार भाजपचे तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नियोजन विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली आहे. …
Read More »महादेवाचे दिव्य रुप पाहून पार्वतीची आई झाली होती बेशुद्ध ; विवाहाला विरोध आणि पार्वतीचे पाऊल…वाचा
सर्व दुःख करणारे भगवंत अर्थात महादेव!महादेवाच्या दर्शनाने भक्तांचे मन प्रसन्न होते, त्यांच्या नामाने,उपासनेने माणसाला सुख, दुःख, रोग, भय इत्यादीपासून मुक्ती मिळते, ज्याच्या दर्शनासाठी प्रभू राम स्वतः तळमळतात, अशा भूतभावन भोलेनाथाला पाहून कोणाला भीती वाटेल का? नाही ना! मग असं काय झालं असेल की, महादेवाला पाहून त्यांची सासू मैना बेशुद्ध पडल्या होत्या. महादेव देवी पार्वतीच्या घरी लग्नाची वरात घेऊन आले असताना …
Read More »वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी दिला वनरक्षकाचा बळी : अवैध वृक्षतोड प्रकरण
वन विकास महामंडळाच्या भिसी उपक्षेत्रातील जंगलात अवैध वृक्षतोड केल्याप्रकरणी वनरक्षक अमोल झलके यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबनानंतर त्यांचे चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड वनपरिक्षेत्र कार्यालयात स्थानांतरण करण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकारी मोकाट असून कनिष्ठ कर्मचाऱ्यावर कारवाई केल्याने संशय वाढला आहे.या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. चिमुर तालुक्यातील भिसी उपक्षेत्रातील नाला खोलीकरणाच्या नावाखाली वनरक्षक अमोल झलके यांनी महालगाव काळू वनविकास महामंडळातील जंगलात …
Read More »
विश्वभारत News Website