Breaking News

विश्व भारत

बेकायदा बांधकामाला पाठबळ : सहायक आयुक्त निलंबित

बेकायदा बांधकामावरील कारवाई करण्यासाठी ज्या दिवशी यंत्रणा उपलब्ध करून दिली होती, त्याचदिवशी ठाण्यातील दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त फारुक शेख यांनी कोणतीही कारवाई केली नाही. दुसऱ्यादिवशी त्यांनी कारवाई सुरु केली पण, ती केवळ दिखाव्यापुरतीच होती. या भागात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे उभी राहत असल्याच्या तक्रारी असल्याने त्यांना कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या.तरीही त्यांच्याकडून कारवाई करण्यास दिरंगाई होत असल्याचे निदर्शनास आले. …

Read More »

टंकलेखन परीक्षेतून मिळतात वर्षाला 25 कोटी : तरीही परीक्षा शुल्क दामदुप्पट करण्याचा निर्णय

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे जवळपास 20 प्रकारच्या परीक्षा घेतल्या जातात. त्यापैकी कालबाह्य मानल्या जात असलेल्या टंकलेखन अर्थात टायपिंगचाही समावेश आहे. वर्षातून दोन वेळा टकटक टायपिंग परीक्षा होते. एका वेळी 2 लाख 87 हजार परीक्षार्थी असतात. त्यांच्याकडून परीक्षा शुल्कापोटी 12 कोटी 49 लाख रुपयांचे उत्पन्न परिषदेला मिळते. वर्षाकाठी हे उत्पन्न 25 कोटींच्या घरात असते. तरीही येत्या परीक्षेपासून परिषदेने परीक्षार्थींचे शुल्क दामदुप्पट …

Read More »

शेतकऱ्यांची पीक विम्यात फसवणूक केल्यास कारवाई

पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेंतर्गत सन 2022-23 अंतर्गत सहभागी शेतकर्‍यांच्या नोंदीचे प्रमाणिकरण करून योजनेत बोगस नोंदी करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिलेल्या आहेत. योजनेतील अनुदान घेण्यासाठी बोगस पीक विमा नोंदी करून फसवणूक करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.ही कारवाई करण्याची संबंधित जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि विमा कंपन्यांची जबाबदारी वाढल्याचे सांगण्यात आले. केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सहाय्यक आयुक्त …

Read More »

एकमेकांना फुल नका देऊ : ‘व्हॅलेंटाईन’च्या दिवशी गायीला द्या मिठी

फेब्रुवारीत चाहूल लागतेय ती प्रेमाची, ओढ अशी वाढते की हा महिना असाच कायम असावा. फेब्रुवारीचा दुसरा आठवडा हा प्रेमी युगुलासाठी हवाहवासा वाटणार असतो. 7 ते 14 फेब्रुवारीपर्यंतचा प्रत्येक दिवस अर्थात प्रपोज डे, रोज डे, चॉकलेट डे, टेडी डे असे अनेक वेगवेगळे दिवस साजरा करण्याचा प्रयत्न केला जातो. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 14 फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’ला पार्टनरप्रती असलेलं प्रेम व्यक्त केले …

Read More »

महिला आमदारावर हल्ला

काँग्रेसचे दिवंगत नेते, माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी तथा विधानपरिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हिंगोली जिल्ह्यात हल्ला करण्यात आला आहे. प्रज्ञा सातव यांनी स्वतः ट्विट करुन ही माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या, “आज माझ्यावर अतिशय निर्घृण असा हल्ला झाला. कळमनुरी येथील कसबे धवंडा येथे हा हल्ला झाला. एका अज्ञात व्यक्तीने पाठीमागून हल्ला केला. मला गंभीर इजा पोहोचवण्याचा या हल्ल्याचा …

Read More »

खवले मांजराची विक्री, आरोपी अटकेत : नागपूर-भंडारा वनविभागाची कारवाई

नागपूर व भंडारा वनविभागाच्या संयुक्त पथकाने खवले मांजर या अत्यंत दुर्मिळ वन्यप्राण्याची विक्री करताना दोघांना अटक केली. रामेश्वर माणिक मेश्राम (रा. तिड्डी, जि. भंडारा, वय 32), सचिन श्रावण उके (रा. खमारी (भोसा), जि. भंडारा, वय २९) अशी आरोपीची नावे आहेत. आरोपींकडून 19.915 कि.ग्रॅ. वजनाचे जिवंत नर खवले मांजर जप्त करण्यात आले. खवल्या मांजराची विक्री केली जात आहे, अशी माहिती पथकाला …

Read More »

खवले मांजराची विक्री, आरोपी अटकेत : नागपूर-भंडारा वनविभागाची कारवाई

नागपूर व भंडारा वनविभागाच्या संयुक्त पथकाने खवले मांजर या अत्यंत दुर्मिळ वन्यप्राण्याची विक्री करताना दोघांना अटक केली. रामेश्वर माणिक मेश्राम (रा. तिड्डी, जि. भंडारा, वय 32), सचिन श्रावण उके (रा. खमारी (भोसा), जि. भंडारा, वय २९) अशी आरोपीची नावे आहेत. आरोपींकडून 19.915 कि.ग्रॅ. वजनाचे जिवंत नर खवले मांजर जप्त करण्यात आले. खवल्या मांजराची विक्री केली जात आहे, अशी माहिती पथकाला …

Read More »

पुण्यात चिकन, मटणचे मोफत सूप दिल्याने हॉटेल चालकावर कोयत्याने वार

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एका हॉटेल चालकाने चिकन,मटणाचा फुकट सूप देण्याचे सुरू केले होते. ग्राहकांचा प्रतिसाद वाढल्याने एका हॉटेल चालकावर कोयत्याने वार करुन बेदम मारहाण करण्यात आली.ही घटना पुण्यातील खडकी भागात घडली. या प्रकरणी दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यावसायिक स्पर्धेतून उपहारगृहाचालकावर हल्ला करण्यात आल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे.मुलायम रामकृपाल पाल (वय 27, रा.दुर्गा माता मंदिराजवळ, मिलिटरी डेअरी …

Read More »

नागपुरात प्रॉपर्टीवरून मित्राचा खून

प्रॉपर्टी डीलिंगच्या व्यवसायात असलेल्या दोन मित्रांमध्ये कमिशनच्या पैशावरून एकाचा खून करण्यात आला.ही घटना नागपूर येथील अग्रसेन चौकात घडली. परवेज शेख उर्फ पापा मिया शेख (वय ३०, रा. खरबी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी संशयीत आरोपी प्रॉपर्टी डीलर परवेज याकुब खान (वय २८, रा. पारडी) याच्यासह त्याच्या चार सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. परवेज खान व परवेज शेख या दोघांची …

Read More »

‘जलयुक्त शिवार’ची कामे तातडीने सुरू करा-जिल्हाधिकारी पांडेय

जलयुक्त शिवार अभियानाबाबत तालुकानिहाय समिती स्थापन करावी. याबाबतची कामे सात दिवसांत सुरू करावे, अशा सूचना औरंगाबाद जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी दिल्या. समन्वयाने शिवार फेरीच्या माध्यमातून गावाचा जलआराखडा तयार करून जलयुक्त शिवार अभियानाचा दुसऱ्या टप्प्याची कामे सुरू करा, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी जलयुक्त शिवार अभियानाच्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. …

Read More »