✍️मोहन कारेमोरे : शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. त्यांचे ५ पैकी 3 जागेवरील उमेदवार निवडून आले आहे. नाशिकमधील जागा महाविकास आघाडीने गमावली असली तरी, नागपूर, अमरावती आणि औरंगाबादमध्ये महाविकास आघाडीने अपेक्षित यश मिळविले आहे. दुसरीकडे निवडणूकीत भाजपला केवळ 1 जागा मिळाली आहे. विधानपरिषदेच्या शिक्षक पदवीधर निवडणूकीत 5 पैकी 3 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आल्याने कार्यकर्त्यांनी …
Read More »“जुनी पेन्शन वाढविणार भाजपचे टेन्शन”
जुनी पेन्शन न दिल्यास भाजपचे टेन्शन वाढू शकते, असे आजच्या पदवीधर शिक्षक निवडणूकीवरून दिसून आले. तसेच जेव्हा टीम म्हणून काम करतो, तेव्हा निकाल आपल्या बाजूनेच लागतात, असे मत काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केले. नागपूर पदवीधर मतदारसंघात अभिजीत वंजारी आणि नागपूर शिक्षक मतदारसंघात सुधाकर अडबाले यांनी मिळवलेल्या विजयाने आमचे टीम वर्क स्पष्ट झाले आहे, असेही केदार म्हणाले आहेत. …
Read More »नागपूर ‘शिक्षक’मध्ये निकालाचा कल मविआच्या बाजूने
नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला गुरुवार,सकाळी 8 वाजता अजनीच्या समुदाय भवनात सुरुवात झाली. 21 टेबलवर मोजणी सुरू आहे. तेथे उमेदवारांचे प्रतिनिधी आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्राथमिक मोजणीत महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेले विमाशिचे उमेदवार सुधाकर अडबाले आघाडीवर असल्याची माहिती आहे. त्यांना 8146 मतं भाजप समर्थित विद्यमान आमदार नागो गाणार यांना 1412 मते मिळाली आहेत. अधिकृतरित्या याला दुजोरा मिळाला नाही. दरम्यान …
Read More »नागपूरजवळ अंधश्रद्धेतून झाली वाघाची शिकार : 7 आरोपीना अटक
महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पातील पवनी बफर वन क्षेत्रात 12 जानेवारीला वाघाची शिकार झाली.या प्रकरणात 7 आरोपींना अटक करण्यात आली. सध्या सर्व आरोपी नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात आहे. आरोपींकडून मिळालेली माहिती पडताळण्याचे काम सुरू आहे. त्यावरून वाघाची शिकार अंधश्रद्धेतून झाल्याची शक्यता वनाधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. यातील अटक केलेल्या जितेंद्र वरखडे या आरोपीने गुन्ह्यात वापरलेले एक हत्यार दाखवले. त्याला वन विभागाने जप्त केले. ताब्यात …
Read More »लग्नाचे शूटिंग केले जिल्हाधिकारी कार्यालयात : चौकशीचे आदेश
भावी संसाराची स्वप्ने रंगविणाऱ्या जोडप्याने चक्क विनापरवानगी प्री-वेडिंग (लग्नापूर्व) शूटिंग केले. हेरिटेज वास्तू असलेल्या नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मंगळवारी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत या जोडप्याचे शूटिंग केले.मात्र,त्यांना कोणीही न हटकल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जातेय. जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी या प्रकाराची दखल घेत चाैकशीचे आदेश दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात तहसीलदार, प्रांत तसेच विवाह नोंदणी अधिकारी कार्यालये आहेत. याच विवाह नोंदणी कार्यालयात …
Read More »घटस्फोट होताच सुनेने पती, सासऱ्याला लगावली कानशिलात : कोर्ट परिसरात हाणामारी
न्यायालयीन परिसरात घटस्फोट घेतल्यानंतर सुनेने सासऱ्याच्या व पतीच्या श्रीमुखात लगावली. त्यामुळे दोन गटात न्यायालयाच्या आवारातच फिल्मी स्टाईल हाणामारी झाली. मंगळवारी दुपारी घडलेल्या या प्रकारानंतर जालना जिल्ह्यातील भोकरदन पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरण काय? पोखरी गावातील युवतीचा विवाह आडगाव भोंबे( ता. भोकरदन) येथील शुभम विनायक साळवे यांच्या सोबत झाला होता. मात्र त्यांच्यात आपसात पटत नव्हते. त्यामुळे ही …
Read More »जळगावात तीनशे रुपयांची लाच घेताना महिला तलाठी जाळ्यात
सातबारा उतार्यावर नाव लावण्यासाठी तीनशे रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या भुसावळ तालुक्यातील साक्री येथील महिला तलाठी एम.एन.गायकवाड यांना जळगाव एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे महसूल विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे. भुसावळ तालुक्यातील साक्री येथील तलाठी एम. एन. गायकवाड यांनी सातबारा उतार्यावर नाव लावण्यासाठी तीनशे रुपयांची लाच मागून ती खडका कार्यालयात स्वीकारली. मंगळवार, दुपारी तीनच्या सुमारास जळगाव एसीबीच्या पथकाने त्यांना सापळा …
Read More »नागपुरात केंद्रीय मंत्र्याच्या नावे कोटींची मागितली खंडणी : चौघांना अटक
नागपुरातील एका मोठ्या कोळसा व्यापाऱ्याला चौघांनी थेट केंद्रीय कोळसा मंत्र्यांच्या नावावर तब्बल १ कोटी खंडणीची मागणी केली. खंडणी न दिल्यास बदनाम करण्याची धमकी दिली. प्रकरणी पोलिसांनी नागपुरातील तीन तोतया पत्रकारांसह चौघांना अटक केली आहे. पीयूष पुरोहित, राष्ट्रभान पोर्टलचा पत्रकार संजय बघेल, संजीत बघेल आणि वंश अग्रवाल ऊर्फ मयंक कुमार अशी आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना चार दिवस पोलिस कोठडीचे आदेश …
Read More »शिवसेना नेत्याने वन कर्मचाऱ्याकडून घेतले बदलीसाठी दोन लाख
उद्धव ठाकरे सरकारच्या काळात बदली करुन देण्यासाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे पुत्र ऋषीकेश खैरे यांनी पैसे घेतले. यासंदर्भात एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये समोरची व्यक्ती काम न झाल्याने ऋषीकेश खैरे यांना बदलीसाठी दिलेले 2 लाख रुपये परत मागत आहे. ऋषीकेश खैरे यांनीही हा व्यवहार झाल्याचे मान्य केले. तर संबंधिताचे पैसे परत देण्यात येतील असे म्हटले आहे. वन …
Read More »नागपुरातील भूमी अभिलेख विभाग भ्रष्टाचाराचा अड्डा : शेतकऱ्यांना अधिकारी देतात त्रास
नागपुरातील भूमी अभिलेख विभाग म्हणजे भ्रष्टाचाराचा अड्डा झाला आहे. या कार्यालयाने एका सत्तर वर्षीय वृद्धाला जिवंत असताना मृत्यू दाखल्याची मागणी केल्याचे प्रकरण ‘विश्व भारत’ने लावून धरले होते. या विभागाकडे शेतकरी मोठ्या आशेने बघतोय. शेत मोजणी करण्यासाठी अनेक अर्ज कार्यालयात येतात. पण, नागरिकांना नाहक त्रास देऊन प्राप्त अर्ज निकाली न काढण्याची किमया या विभागातील अधिकारी-कर्मचारी करतात. अशा भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर …
Read More »
विश्वभारत News Website