मोबाईल आणि मानव यांचं अतूट नातं तयार झालं आहे. मोबाईलला जरासाही आपल्यापासून इकडे-तिकडे जाऊ द्यायचच नाही, असा आग्रह अनेकांचा असतो. पण, काही काळ का असेना आता मोबाईलपासून दूर व्हावे लागेल. यासंदर्भात काय आहे बातमी… वाचा अनेक मंदिरांमध्ये ‘मोबाईल बंद ठेवा’, ‘शांतता पाळा’, ‘फोटो काढण्यास मनाई’ अशा सूचना लिहिलेल्या पाहायला मिळतात. मंदिर प्रशासनाकडून या सूचना दिल्या जातात. पण, आता थेट …
Read More »हृदयरोग व स्ट्रोक टाळायचा असल्यास सकाळी व्यायाम करा!
एका नव्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, सकाळचा व्यायाम हृदयविकार आणि स्ट्रोकपासून वाचवतो. ‘युरोपियन जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह कार्डियोलॉजी’मध्ये याबाबतची माहिती प्रकाशित झाली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, सकाळच्या व्यायामामुळे हृदयरोग व स्ट्रोकचा धोका बर्याच अंशी कमी होतो. हृदयासंबंधीच्या आरोग्यातील गुंतागुंत कमी करण्यासाठी आणि संपूर्ण आरोग्य लाभासाठी व्यायाम करणे हा सर्वात परिणामकारक पर्याय ठरू शकतो. त्यामध्येही सकाळच्या वेळी केलेला व्यायाम …
Read More »नागपूर ‘पीडब्लूडी’चा प्रताप : शासकीय वसाहत दिली किरायाने
✍️मोहन कारेमोरे ‘पीडब्लूडी’ विभाग नेहमीच कोणत्या ना कोणत्या चर्चेत असतो. आता नागपुरातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. येत्या काही दिवसात हिवाळी अधिवेशनाला नागपुरात सुरुवात होईल. मात्र,’पीडब्लूडी’ विभागाने बेकायदेशीर कृती केल्याची बाब उजेडात आली आहे. शासकीय निवास सरकारी कर्मचाऱ्यांना न देता खासगी लोकांना दिल्याची माहिती आहे. प्रकरण काय आहे? नागपुरातील पीडब्लूडीच्या विभाग क्रमांक एकच्या अंतर्गत रविनगर शासकीय रहिवासी वसाहत आहे. …
Read More »राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र : अब्दुल सत्तारांचा करेक्ट कार्यक्रम?
राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अत्यंत आक्षेपार्ह शब्दांत टीका करीत शिवीगाळ केली होती. सत्तार यांच्या या कृतीने राज्यभरात संताप व्यक्त करण्यात आला. मंत्रिपदी असताना एका महिला नेत्याला शिवीगाळ करणाऱ्या सत्तार यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी करत राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं. तसेच काही महिला नेत्यांच्या शिष्टमंडळाने या मागणीसाठी राज्यपाल …
Read More »मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री उद्या नागपुरात : समृद्धी महामार्गाची करणार पाहणी
पंतप्रधानांचा दौरा लक्षात घेता उद्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर ते शिर्डी पर्यंत महामार्गाची पाहणी करणार आहेत. यानिमित्ताने काही अर्धवट कामे मार्गी लागण्याची, त्रुटी दूर होण्याची शक्यता आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्या सकाळी नागपूरला आगमन होणार आहे. सकाळी साडेदहा वाजता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री समृद्धी मार्गाच्या नागपूरकडील झिरो माईल्स येथून …
Read More »शिकारीच्या शोधात बिबट्या पडला विहिरीत
पुण्यातील लोणी खुर्द (मापरवाडी ) परिसरात दत्तात्रेय शंकर घोगरे यांची शेतातील त्यांच्या घराजवळील विहिरीमध्ये शिकार करण्याच्या नादात बिबट्या विहिरीत पडला. या भागात अनेक दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत होते. आजही या शिवारात तीन ते चार बिबट्याची वास्तव आहे, असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. अनेक दिवसांपासून परिसरात बिबट्याचे दर्शन होत असल्यामुळे नागरिकांमध्ये घबरटीचे वातावरण आहे. अनेक वेळा वन विभागास परिसरातील नागरिकांनी माहिती …
Read More »हिवाळ्यात घरच्या घरी तयार करा सूप : जाणून घ्या रेसिपी
हिवाळा सुरु झाला आहे. अशात अनेक लोक सूप पितात. वेगवेगळ्या भाज्यांचे सूप चवदार आणि पोषक तत्वाने भरलेले असतात. हिवाळ्यात भाज्यांचे सूप उबदारपणासाठी फायदेशीर असतात. हे केवळ चवीलाच चांगले नसतात, तर त्यामध्ये असलेले अनेक पोषक घटक आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर असतात. मोठे किंवा लहान मुले सर्वांना सूप प्यायला आवडते. अशाच 5 सूप रेसिपी सांगणार आहोत ज्या तुम्ही हिवाळ्यात घरच्या घरी बनवू शकता. …
Read More »नागपुरात हत्तीने केला तरुणांचा पाठलाग
चवताळलेल्या रानटी हत्तीने तरुणांचा पाठलाग केल्याची घटना नागपूरजवळ उघडकीस आली आहे. या घटनने तरुणांची चांगलीच तारांबळ उडाली असून, त्यांनी गावाच्या दिशेने पळ काढला. ग्रामस्थांनी हत्तींच्या कळपाच्या जवळ जावू नये, असे आवाहन वनाधिकाऱ्यांनी केले आहे. रविवार 27 नोव्हेंबरपासून 23 रानटी हत्तींचा कळप भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील बरडकिन्ही गावालगतच्या जंगलात थांबला होता. शुक्रवारी पहाटे हा कळप शिवणी मोगरा गावाकडून पेंढरीकडे एका शेतातून …
Read More »कमेंट्री करताना दिग्गज क्रिकेटरला हार्ट अटॅक : रुग्णालयात दाखल
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज रिकी पाँटिंगची तब्येत अचानक बिघडली असून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पर्थमध्ये ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी सामना सुरू आहे. पहिल्या कसोटी सामन्यावेळी रिकी पाँटिंग कमेंट्री करत होते. मात्र अचानक छातीत दुखायला लागल्यानतंर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. पाँटिंग यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. रिकी पाँटिंग चॅनेल ७ साठी कमेंट्री करतात. …
Read More »राज्यात 4,122 तलाठ्यांची भरती होणार : एप्रिल-मे मध्ये नियुक्ती
राज्यातील तलाठी पदाच्या चार हजार 122 पदांची भरती प्रक्रिया लवकरच होणार आहे. त्यामध्ये रिक्त एक हजार 12 आणि नव्याने निर्माण केलेल्या तीन हजार 110 या पदांचा समावेश आहे. त्याबाबतची कार्यवाही महसूल विभागाकडून सुरू करण्यात आली असून येत्या पंधरा दिवसांत जिल्हानिहाय माहिती पाठविण्याचे निर्देश दिले आहेत. महसूल विभागाअंतर्गत असलेल्या तलाठ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे सध्या तीन ते चार गावांसाठी …
Read More »
विश्वभारत News Website