Breaking News

विश्व भारत

तुमचा जोडीदार विवाहबाह्य संबंधात अडकला तर नाही ना? यावरून लागेल पत्ता

लग्न करताना नवरा-बायको एकमेकांवर खूप प्रेम करण्याची आणि एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतात. त्यासाठी तसा प्रयत्न देखील करतात. पण असं असलं तरी देखील बऱ्याचदा अशा काही गोष्टी घडतात, ज्यामुळे लोक लग्न झालं असलं तरी देखील दुसऱ्या पर्यायांकडे वळतात. म्हणजेच दुसरा जोडीदार शोधतात किंवा नकळत त्याच्या प्रेमात पडतात. बहुतेक लोकांच्या मनात अनेकदा नसलं तरी देखील असे काही प्रसंग उद्भवतात, जेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल …

Read More »

नियमित बिल भरणार्‍या शेतकर्‍यांनाही फटका : विद्युत रोहित्र बंद करून वसुली!

महावितरण कंपनीने वीजबिल वसुलीसाठी सरसकट रोहित्र बंद करण्याचा धडाका लावला आहे. मात्र, त्यांच्या या अनागोंदी कारभाराचा फटका नियमित बिल भरणार्‍या शेतकर्‍यांनाही बसत आहे. ज्यांच्याकडे थकबाकी आहे, त्यांचे वैयक्तिक कनेक्शन कट करून वसुली केली गेली पाहिजे. मात्र, वर्षभर कर्मचारी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने महावितरण कंपनीही अर्थिक अडचणीत येत आहे. यावर्षी शेतकर्‍यांच्या खरीप पिकांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. महावितरण कंपनीही वसुलीअभावी …

Read More »

जीवन क्षणभंगूर : कार चालवत असतानाच हृदयविकाराचा झटका

स्वतःच्या चारचाकी वाहनाने एकटेच बुलढाणा, जळगाव जामोदकडे निघाले असता वाटेतच हृदयघातरुपी काळाने ‘त्यांना’ गाठले.दुखणे असह्य असतानाही त्यांनी भ्रमणध्वनीद्वारे नातेवाईकांना ही बाब कळविली. मात्र, कुणीही मदतीला येण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. जीवन किती क्षणभंगुर आहे आणि मृत्यू एखाद्याला कसा खिंडीत गाठतो, याचे हे हृदयद्रावक उदाहरण. सोमवारी सकाळी स्थानिक महात्मा फुले शाळेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष मानकर (६५) आपल्या मोटारीने जळगाव जामोदकडे जात होते. …

Read More »

जात प्रमाणपत्र पडताळणी प्रमाणपत्र वेळेत न देणाऱ्या अधिकाऱ्याला पाच हजारांपर्यंत दंड

पात्र व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम व समयोचित लोकसेवा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ लागू करण्यात आला आहे. आता लोकसेवा हक्क अधिनियमामध्ये जात प्रमाणपत्र पडताळणी सेवेचा समावेश केला आहे. त्यामुळे जात पडताळणी प्रमाणपत्र वेळेत देण्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्याला ५०० ते पाच हजार रुपयांपर्यंत दंड केला जाणार आहे. याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात ‘बार्टी’चे महाव्यवस्थापक धम्मज्योती गजभिये …

Read More »

शिव भोजन थाळीचे बील काढण्यासाठी 80 हजाराची लाच : लाचलूचपतच्या पोलीस निरीक्षकही जाळ्यात

✳️पहिली घटना शिवभोजन थाळीचे थकीत देयक काढण्यासाठी 80 हजाराची लाच घेताना वाशिम येथील पुरवठा निरीक्षकाला अटक करण्यात आली आहे. निलेश विठ्ठल राठोड असे पुरवठा निरीक्षकाचे नाव आहे. ही कारवाई अमरावती लाचलूचपत विभागाने केली. ✳️दुसरी घटना नांदेड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या मीना बकाल आणि त्यांचे पती कुलभूषण बावस्कर या दोघांना 60 हजारांची लाच घेताना अटक करण्यात …

Read More »

सुख, शांतीसाठी तुळशीशेजारी कोणतं रोपटं ठेवाल…

ज्या घरामध्ये तुळशीचं रोप आहे, तिथे सदैव सुखसंपत्ती आणि भरभराट नांदते असं म्हटलं जातं. तुम्हाला माहितीये का? हे रोप असणं जितकं महत्त्वाचं त्याहूनही त्याची काळजी घेतली जाणं त्याहून महत्त्वाचं आहे. आपण, सहसा घरामध्ये खिडकीच्या भागात झाडं ठेवतो. तिथं तुळशीसोबत इतरही काही झाडं आपण ठेवतो. पण, या पवित्र रोपाशेजारी कोणतंही झाड किंवा रोप ठेवून चालत नाही. तुळशीशेजारी कोणतं रोप ठेवू नये? …

Read More »

42 लाखांच्या लाचप्रकरणी तहसीलदार, तलाठ्यासह पाच जणांवर गुन्हा

ट्रस्टच्या जागेचे अकृषक प्रमाणपत्र (एनए) मंजुरीसाठी तलाठ्याने स्वतःसाठी व वरिष्ठ अधिकार्‍यांसाठी तब्बल 42 लाखांच्या लाचेची मागणी केली, असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या कारवाईत शिरूरच्या तत्कालीन तहसीलदार रंजना उमरहांडे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणावर गुन्हे दाखल? तत्कालीन तहसीलदार उमरहांडे यांच्यासह शिरूर महसूल सहायक कार्यालयातील तहसीलदार स्वाती सुभाष शिंदे, शिरूरचा तहसीलदार सरफराज …

Read More »

माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा-सून अडचणीत : चौकशीचे आदेश

प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांच्या लातूर एमआयडीसीतील भूखंड प्रकरणात आणखी एका चौकशीचे आदेश सरकारने दिले आहेत. एकाच भूखंडावर दोन टप्प्यात मिळालेल्या कर्जाच्या आरोपांची सखोल चौकशी करण्याचे आदेश सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिले आहेत. सहकार खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे म्हटले आहे. याबाबत लातूर भाजपने एक पत्र …

Read More »

संजय राऊतांना लवकरच अटक? वाचा…

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. संजय राऊत अलीकडेच तुरुंगातून बाहेर आले आहेत. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने त्यांना अटक केली होती. या प्रकरणी जामीन मिळाल्यानंतर आता पुन्हा एकदा राऊतांवर अटकेची टांगती तलवार आहे. प्रकरण काय? ३० मार्च २०१८ मध्ये बेळगावात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी बेळगाव न्यायालयाने राऊतांना समन्स बजावला आहे. १ डिसेंबर रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले …

Read More »

गोपनीय अहवाल अयोग्य असल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना कळवा-हायकोर्ट

एखाद्या कर्मचाऱ्यांचा गोपनीय अहवाल पदोन्नतीच्या पात्रतेस योग्य नसेल तर तो कर्मचाऱ्यास माहिती करून देणे आवश्यक आहे. तो कळवला नसेल तर त्यास पदोन्नती आश्वासित प्रगती योजना अथवा कालबद्ध पदोन्नतीपासून वंचित ठेवता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल नुकताच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला. प्रकरण काय? बुलडाणा जिल्हा परिषदेतून लिपिक संवर्गातून सेवानिवृत्त झालेले अच्युतराव भाऊराव राऊत यांनी दाखल केलेल्या रिट पीटिशन क्रमांक …

Read More »