Breaking News

विश्व भारत

उद्धव ठाकरेंचे अस्तित्व मातोश्रीपुरतेच-नारायण राणे यांची घणाघाती टीका

विश्व भारत ऑनलाईन : ”उद्धव ठाकरेंचे सरकार पायउतार होताच त्यांचे अस्तित्व संपले. यापूर्वीही त्यांचे केवळ मातोश्रीच्या कक्षेतच अस्तित्व होते. देशात आणि राज्यात त्यांचे अस्तित्वच नाही,” असा घणाघात केंद्रीय केंद्रीय लघु, सूक्ष्म मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर केला. शिंदेंनाच परवानगी चित्ता देशात उपलब्ध नव्हते ते पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे आले आहेत, तर अशा चांगल्या गोष्टीचे कौतूक करायला हवे, पण …

Read More »

‘जलयुक्त शिवार’ची चौकशी बंद : देवेंद्र फडणवीस

विश्व भारत ऑनलाईन : उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीने सुरु केलेली जलयुक्त शिवार योजनेची चौकशी बंद करण्यात येणार आहे. शनिवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. जलयुक्त शिवारच्या ज्या कामांमध्ये गडबड नाही व केवळ राजकीय दृष्टीकोनातून प्रेरित होऊन चौकशा केल्या जात होत्या,त्या सर्व कामांची चौकशी बंद केली जाणार आहे. पण, जेथे चुकीचे झाले तिथली चौकशी सुरू राहील, असे फडणवीस …

Read More »

आठ हजार विद्यार्थ्यांचे गडकरींना पत्र, यवतमाळ-अमरावती रस्त्याची दैनावस्था

विश्व भारत ऑनलाईन : रस्ते म्हटलं की, नितीन गडकरी यांचे नाव ओठांवर येतेच. अनेक महामार्ग तयार करणारे गडकरी ‘रोडकरी’म्हणूनही ओळखले जातात. तरीही काही रस्त्यांची डागडुजी अजून झालेली नाही. यवतमाळ-अमरावती रस्त्यांवर खड्यांमुळे सध्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या अपघातामध्ये पुढील क्रमांक आपला तर नाही ना? अशी भीती येथील विद्यार्थ्यांना सतावत आहे. यासाठीच यवतमाळ-अमरावती जिल्ह्यातील तब्बल आठ हजार विद्यार्थ्यांनी थेट केंद्रीय परिवहन …

Read More »

विशेष लेख : विदर्भात गरज रोजगाराभिमुख प्रकल्पाची

लेखक : मोहन कारेमोरे, राष्ट्रीय प्रचारक, अखिल भारत हिंदू महासभा सध्या वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला हलविल्यामुळे मोठा वादंग निर्माण झाला आहे. गुजरातपेक्षा हजारो तरुणांना रोजगार देणारा एखादा उद्योग विदर्भातही द्यावा. विशेष म्हणजे, विदर्भातील नेत्यांनी नागपूर आणि आसपासच्या परिसरात एखादा प्रकल्प उभारण्यास प्रयत्न करावा. अलीकडच्या काळात विदर्भात बेरोजगार तरुणांची संख्या झपाट्याने वाढली. विदर्भातून पुणे, मुंबईकडे रोजगारासाठी तरुणांनी ओढा वाढविला. हे चित्र …

Read More »

औरंगाबाद : अधिकाऱ्याचे अपहरण, आरोपी अटकेत

विश्व भारत ऑनलाईन : औरंगाबाद जिल्ह्यातील इब्राहिमपूर या गावातून शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास राज्याच्या उद्योग मंत्रालयातील निवृत्त अधिकारी विश्वनाथ लक्ष्मण राजळे (६०) यांचे 4 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले. औरंगाबाद ग्रामीणच्या पोलिस पथकाने बदनापूर तालुक्यातील दावलवाडी शिवारातील एका पेट्रोल पंपावर रात्री ९ वाजेच्या सुमारास राजळे यांची सुटका करून सहा संशयित आरोपींना ताब्यात घेतले. विकास भगवान खरात(२२), पांडुरंग विष्णू …

Read More »

‘पीएम किसान सन्मान’चा हप्ता लवकरच… वाचा वृत्त सविस्तर

विश्व भारत ऑनलाईन : केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी किसान सन्मान योजना सुरू केली आहे. योजनेनूसार आतापर्यंत ११ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले असून, सप्टेंबर अखेरपर्यंत १२ वा हप्ता जमा करण्यात येईल, अशी माहिती आहे. दिवाळीच्या तोंडावर या योजनेचा पहिला हप्ता एप्रिल ते जुलै, दुसरा ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि तिसरा डिसेंबर ते मार्च दरम्यान असतो. ऑक्टोबर महिन्यात …

Read More »

अमरावती : पंचशील आश्रमशाळेतील 33 मुलींची प्रकृती बिघडली

विश्व भारत ऑनलाईन : बहिरम येथील पंचशील आश्रमशाळेतील ३३ मुलींना शुक्रवारी रात्री उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकारमुळे एकच खळबळ उडाली. एका मुलीला अमरावती येथे पुढील उपचारासाठी हलविले. तर ८ मुलींना घरी सोडण्यात आले आहे. इतर सर्व मुलींची प्रकृती स्थिर असून डॉक्टर मुलींच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. आश्रम शाळेतील ३ ते ४ मुलींना पोटदुखीचा त्रास सुरू झाला. …

Read More »

राज ठाकरे रविवारपासून नागपूर, चंद्रपूर, अमरावती दौऱ्यावर

विश्व भारत ऑनलाईन : मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे उद्या रविवार 18 सप्टेंबरपासून विदर्भाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आगमन होणार आहे. विदर्भ एक्सप्रेसने मुंबईहुन रवाना झाले असून, उद्या सकाळी 8.30 वाजता त्यांचे नागपुरातील मुख्य रेल्वेस्थानकावर आगमन होईल. त्यानंतर रविभवन येथे कार्यकर्त्यांच्या बैठका घेतील. 15 वर्षांनंतर विदर्भात ठाकरे हे सुमारे 15 वर्षांनंतर विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहे. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर 2005 मध्ये राज …

Read More »

नागपूर : सीताबर्डी उड्डाण पुलावर अपघात

नागपूर : सीताबर्डी उड्डाण पुलावर आज शनिवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास एका कारने दुचाकीस्वारास धडक दिली. यात दुचाकीवरील महिला ठार झाली. काही काळ उड्डाण पुलावर तणावाचे वातावरण तयार झाले आहे. तर, वर्धा मार्गांवरील वाहतूक खोळबली आहे.

Read More »

बिबट सफारी रद्द,अजित पवारांना धक्का…वाचा

विश्व भारत ऑनलाईन : बारामतीमधील प्रस्तावित असलेली बिबट सफारी अखेर शिंदे सरकारने रद्द केली आहे. ही बिबट सफारी आता जुन्नरला होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यामुळे विरोधी पक्षनेते आणि बारामतीचे आमदार अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. त्याचवेळी जुन्नरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके आणि शिवसेनेचे माजी आमदार शरद सोनावणे दोघेही खुश झाले आहेत. नेमके प्रकरण काय? …

Read More »