विश्व भारत ऑनलाईन : मुंबई उपनगर,ठाणे, कल्याण, नवी मुंबई, डोंबिवलीबरोबरच अंबरनाथमध्ये मुसळधार आज शुक्रवारपासून पावसाने हजेरी लावली आहे. पहाटेपासून मुंबईसहित अनेक भागांमध्ये पाऊस कोसळत असल्याने रेल्वेची वाहतूक संथ गतीने सुरु आहे. कमी दाबाचा पट्टा सध्या गुजरातवरुन महाराष्ट्राच्या दिशेने अर्थात दक्षिणेकडे मूळ जागेवर सरकत असल्याने मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याचं सांगितलं जात आहे. तर, विदर्भातही काही ठिकाणी ढगाळ वातावरण असेल.अरबी समुद्रातून …
Read More »शेतकऱ्यांनो सावधान!बोगस सात-बारा ओळखा
विश्व भारत ऑनलाईन : 7/12 उतारा हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा विषय आहे. मात्र, अलीकडच्या काळात बोगस सातबारा वापरून कर्ज उचलून जमिनीचा व्यवहार केल्याची प्रकरणं अनेकदा समोर येतात. बोगस सातबारा वापरून कर्ज घेतलं आणि नंतर संबंधितांवर गुन्हा दाखल झाल्याची प्रकरणंही महाराष्ट्रात घडली आहेत.2 महिन्यांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात अशीच घटना समोर आली.श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरे बुद्रुक गावातील 7 जणांनी संगनमतानं शेतीचे बनावट सातबारा …
Read More »जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरी लावून देण्याचे आमिष… वाचा
विश्व भारत डेस्क : बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीचं आमिष दाखवत तिघांना लाखोंचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तिघांकडून तब्बल १८ लाख ५० हजार रूपये उकळले. पैशांच्या फसवणुकीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये आर्वीतील एका, चंद्रपुरामधील दोन आणि अमरावतीच्या एका आरोपीचा समावेश आहे. माहितीनुसार,आर्वी येथील नरसिंग सारसर या व्यक्तीने आर्वी येथीलच रितेश राजेश …
Read More »एकनाथ खडसे राष्ट्रवादीतही नाराज… वाचा नक्की काय
विश्व भारत ऑनलाईन : भाजपमध्ये पक्ष नेतृत्वाविरोधात आवाज उठविल्याने एकनाथ खडसे यांची कोंडी झाली होती. आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतानाही तीच परिस्थिती एकनाथ खडसे यांच्यासमोर येऊ शकते. निमित्त होते राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा जळगाव दौरा. एका कार्यक्रमात अजित पवारांसमोरच जिल्ह्यातील पक्षाच्या धोरणावर खडसे यांनी नाराजी जाहीर केली आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते घरीच असतात, पण कार्यक्रमांना बोलावलं जात नाही, अशी खंत …
Read More »रेल्वे तिकीट बुकिंग आता आणखीण सोप्पे
विश्व भारत ऑनलाईन : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता तुम्हाला ट्रेनचं तिकीट आणखीण सोप्प्या पद्धतीत बुक करता येणार आहे. त्यामुळे करोडो प्रवाशांसाठी ही दिलासादायक बाब असणार आहे. रेल्वेकडून प्रवाशांना अनेक विशेष सुविधा दिल्या जातात. या सुविधा आणखी सुलभ होण्यासाठी रेल्वे नेहमीच प्रयत्नशील असते. आता अशीच एक सुविधा रेल्वे घेऊन आली आहे. या सेवेमुळे आता तुम्हाला …
Read More »समृद्धी महामार्गांवर किती लागणार टोल… घ्या जाणून
विश्व भारत ऑनलाईन : मुंबई पुणे एक्प्रेस वे चा प्रवास महाग होणार आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे टोलमध्ये ङोणारी १८ टक्के वाढ. मुंबई पुणे एक्स्प्रेस वे मार्गावरच्या टोलमध्ये लवकरच वाड होणार आहे. १ एप्रिल २०२३ पासून या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना जास्त टोल भरावा लागणार आहे. कारण १ एप्रिल २०२३ पासून या टोलमध्ये १८ टक्के वाढ होणार आहे. दर …
Read More »मल्टिप्लेक्समध्ये बघा सिनेमा 75 रुपयांत…पण, कोणत्या तारखेला… वाचा
विश्व भारत ऑनलाईन : मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाकडून राष्ट्रीय सिनेमा दिन साजरा करण्यात येणार आहे.या दिनाचे औचित्य साधून देशभरातील सर्व सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांकडून फक्त ७५ रूपयांचे तिकीट घेऊन सिनेमा दाखवला जाणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हा दिवस साजरा केला जाणार आहे. चित्रपट पाहणाऱ्यांसाठी ही मोठी खुशखबर आणि एकप्रकारे पर्वणीच ठरेल. कुठे बघायला मिळणार? पीव्हीआर, आयनॅाक्स, कार्निवल, सिनेपॅालिस, मिराज, सिटीप्राईड, एशियन मुक्ता …
Read More »शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ई-पीक नोंदीसाठी मुदतवाढ
विश्व भारत ऑनलाईन : शेतकऱ्यांसाठी ई-पीक पाहणीमार्फत नवीन सुविधायुक्त सोपे आणि सुलभ ॲप तयार करण्यात आले आहे. ई-पीक पाहणी मोबाईल ॲपमध्ये काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. आता शेतकऱ्यांसाठी वापरण्यास अत्यंत सोपे व सुलभ मोबाईल व्हर्जन-2 विकसित करण्यात आलं आहे. हे सुधारित मोबाईल ॲप 1 ऑगस्ट 2022 पासून शेतकऱ्यांना वापरासाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. आता ई-पीक करण्याची मुदत 15 …
Read More »अरे देवा!औरंगाबादमध्ये रस्ता दुरावस्थेचा फटका पार्थिवालाही
विश्व भारत ऑनलाईन : औरंगाबाद जिल्ह्यातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. याबाबतची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतदेह ट्रॅक्टरमध्ये नेत असताना खराब रस्त्यामुळे ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाली. या घटनेमुळे अखेरच्या प्रवासातही नरकयातना व अवहेलना सोसाव्या लागल्याचे दिसत आहे. खुलताबाद तालुक्यातील गल्ले बोरगाव येथील ही हृदयद्रावक घटना आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद जवळील मत्तेवाडी येथील नागरिकांना आयुष्याच्या अखेरचा प्रवासही खडतर करावा लागत …
Read More »चिकन खरेदी करताय? मग वाचा…
विश्व भारत ऑनलाईन : श्रावण, गणेशोत्सवात काही दिवस मांसाहाराला विश्रांती दिल्यानंतर आता पुन्हा एकदा खवय्यांची पावलं चिकन, मटण, मासे आणि तत्सम पदार्थांकडे वळली आहेत. पण, काही घरांमध्ये मात्र अद्यापही चिकन आणि मटणवर ताव मारला जात नाही. ठरतोय तो म्हणजे सध्या सुरु असणारा पितृ पंधरवडा. पितृपक्ष सुरु झाल्यामुळं पितरांच्या नावानं अनेक घरांमध्ये घास काढण्याची परंपरा आहे. यामध्ये बऱ्याच भाज्यांचा वापर केला …
Read More »
विश्वभारत News Website