विश्व भारत ऑनलाईन: ‘अग्निबन’, ‘कळा काळजाच्या’, ‘वेदनांची वेधशाळा’, असे कविता संग्रह लिहिणारे आणि ज्येष्ठ गझलसम्राट सुरेश भट यांचे शिष्य निलकांत ढोले (सेवानिवृत्त शिक्षक) यांचे वयाच्या 83 व्या वर्षी निधन झाले. शनिवारी पहाटे नागपुरातील हिंगणा मार्गावरील साईनगर येथे त्यांचे निधन झाले. ‘वेदनांची वेधशाळा’ हा त्यांचा गझलसंग्रह व ‘सोहळे ऋतूंचे’ हा त्यांचा ललित लेखसंग्रह वाचकप्रिय ठरले. निलकांत ढोले यांच्या ‘अग्निबन’ ह्या संग्रहाला …
Read More »भुसावळ-वर्धा पॅसेंजर लवकरच हाेणार सुरु; वेळापत्रकही तयार
विश्व भारत ऑनलाईन : मागील अडीच वर्षांपासून बंद असलेली भुसावळ – वर्धा पॅसेंजर पुन्हा एकदा प्रवाशांच्या सेेवेत रुजू हाेणार आहे. ही रेल्वे मध्यमवर्गीय प्रवाशांना आर्थिक दृष्ट्या लाभदायक ठरणार आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी ही रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या पॅसेंजरद्वारे विदर्भातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेली संत नगरी शेगाव येथे मोठया संख्येत प्रवासी ये-जा करत असतात. आता ही पॅसेंजर सुरू …
Read More »20 सप्टेंबरपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार, कोणत्या जिल्ह्यात अलर्ट… वाचा
विश्व भारत ऑनलाईन : पुणे, सातारा,कोल्हापूर, कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी या भागांसह विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत 20 सप्टेंबरपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर, उत्तर,मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. शुक्रवारी पुण्यासह राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाने अगदी सकाळपासूनच हजेरी लावली. संततधार पावसामुळे कमाल आणि किमान तापमान कमी झाल्याने वातावरणात थंडी …
Read More »आफ्रिकेतून 8 चित्ते भारतात दाखल
विश्व भारत ऑनलाईन : आफ्रिकन देश नामिबियातून आज शनिवारी आठ विदेशी चित्ते तब्बल 70 वर्षांनंतर भारतात पोहोचले आहेत. एक विशेष विमान मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेरमध्ये दाखल झाले. येथून हेलिकॉप्टरद्वारे चित्त्यांना मध्यप्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये नेण्यात येणार आहे. परदेशी चित्ते श्योपूरला पोहोचले नामिबियाचे चित्ते मध्य प्रदेशातील श्योपूर येथे पोहोचले आहेत. हेलिकॉप्टर चित्तांसह ग्वाल्हेरहून श्योपूरला पोहोचले आहे. काही वेळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना …
Read More »मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन विशेष, सिंचनाची श्वेतपत्रिका काढा-कारेमोरे
विश्व भारत ऑनलाईन : राज्यात सर्वाधिक धरणे मराठवाड्यात आहेत. येथे किमान दहा लाख हेक्टर जमिनीचे सिंचन होणे अपेक्षित आहे. मात्र, दाेन ते तीन लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येते. फक्त कागदावरच. पाण्याअभावी शेतकरी आत्महत्याग्रस्त ठरलेल्या मराठवाड्याच्या सिंचनप्रश्नावर मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षात राज्य सरकारने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी केली आहे. मराठवाड्यात पाणी स्थिती …
Read More »महाराष्ट्राचा चौफेर विकास करणार-फडणवीस
विश्वभारत ऑनलाईन : महाराष्ट्रातील नियोजित फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला नेण्यात आला. यामूळे महाराष्ट्रामधील मोठा रोजगार गेला, ही सरकारची खेळी आहे, यावरून राजकीय वातावरण तापले आहे. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे शुक्रवारी (दि.16) विरोधकांवर टीका केली. ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षात राज्याला मागे टाकले आहे, आम्ही आता दोन वर्षांत पुढे नेवू,असे फडणवीस म्हणाले. आता रोजगार वाढणार पुढील काळात …
Read More »बिबट्याचा शेतमजुरावर हल्ला… कुठे घडली घटना… वाचा
विश्व भारत ऑनलाईन : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या मांदळवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजूर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली. लोमेश गुलाब चौधरी असे जखमी शेतमजुराचे नाव आहे. वन विभागाने मांदळवाडी, ढगेस्थळ येथे तातडीने पिंजरा बसवून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. घटनाक्रम असा… मांदळेवाडी येथील विठ्ठल गेनुजी ढगे यांच्या शेतात काम …
Read More »फडणवीस उत्कृष्टच,झापाझापीवर सत्तारांनी सोडले मौन
विश्व भारत ऑनलाईन : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात कोणत्याही प्रकारे खडाजंगी झालेली नाही. कोणतीही योजना प्रसारमाध्यमामध्ये उघड करू नका, असे हसतहसत उपमुख्यमंत्री फडणवीस बोलले,असे म्हणत सत्तारांनी झापाझापी प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मंत्रालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमके काय म्हणाले, त्यादिवशी काय झाले होते. याबाबत अब्दुल सत्तार यांनी सविस्तर सांगितले. ते म्हणाले, खडाजंगी झाली नाही. असेच हसता-हसता मला उपमुख्यमंत्री देवेंद्र …
Read More »शेतकरी चिंतेत : संत्रा बागांवर काळ्या माशीचे संकट
विश्व भारत ऑनलाईन : नागपूर जिल्ह्यातील काटोल, नरखेड, कळमेश्वर, सावनेर तालुक्यातील संत्रा व मोसंबी बागेत सध्यस्थितीत काळया माशीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येत आहे. विदर्भातील हवामान या किडीच्या वाढीसाठी अनुकूल आहे. त्यामुळे बागांचा ऱ्हास होत असल्याची माहीती प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वंडली येथील कीटकनाशक तज्ज्ञ प्रा.प्रवीण दरणे यांनी दिली. माशीमुळे फळाच्या गुणवत्तेवर व उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. काटोल व नरखेड …
Read More »नागपूरजवळ दरीत कोसळली बस, 4 गंभीर
विश्व भारत ऑनलाईन : हिंगणी-सेलू मार्गावर आज शुक्रवारी पेंढरी घाटात खाजगी ट्रॅव्हल्स बसचा अपघात झाला. बसमध्ये 30 प्रवासी होते. 4 ते 5 जण गभीर जखमी असल्याचे कळते. नागपूर कडून हिंगणी-वर्धाकडे जाणारी ट्रॅव्हल्स 20 फूट खाली दरीत कोसळली. पेंढरी घाटावर असलेल्या वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. जखमींना हिंगणा येथील लता मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात …
Read More »
विश्वभारत News Website