Breaking News

विश्व भारत

कॅन्सरवरील औषधे होणार स्वस्त

  विश्व भारत ऑनलाईन : सर्वांना परवडणाऱ्या ३८४ आवश्यक औषधांची यादी तब्बल सात वर्षांनंतर मंगळवारी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी जाहीर केली. या यादीत समावेश करण्यात आल्यामुळे अनेक अँटिबायोटिक्स, कॅन्सर प्रतिबंधक औषधे आणि लशी स्वस्त होतील. ३८४ आवश्यक औषधांच्या नव्या राष्ट्रीय यादीत अंतर्स्रावी, हृदय आणि रक्तनलिकांच्या देखभालीसाठीच्या तसेच गर्भनिरोधक, श्वसन आणि नेत्ररोगाशी संबंधित औषधांचा समावेश करण्यात आला आहे. ‘सर्वांना औषध, …

Read More »

शिंदे-फडणवीस यांच्यात चर्चा,लवकरच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या!

विश्व भारत ऑनलाईन : मुंबई : शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यातील बऱ्याच आयएएस अधिकाऱ्यांना बदलीची प्रतीक्षा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रशियाच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत यासंदर्भात चर्चा केल्याचे समजते. काही मर्जीतील अधिकाऱ्यांची नियुक्ती पुढील आठवड्यात होऊ शकते. तर, यातील काही बदल्या दुसऱ्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे. ठाकरे सरकारच्या मर्जीतील अधिकाऱ्यांना बाजूला करण्याची नियोजन या सरकारचे आहे. अनेक …

Read More »

23 सप्टेंबरला नागपुरात रंगणार भारत-ऑस्ट्रेलिया टी-ट्वेंटी

विश्व भारत ऑनलाईन: नागपूर येथील जामठा स्टेडियमवर विदर्भ क्रिकेट असोसिएशनकडून (व्हीसीए)तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामना आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवार, २३ सप्टेंबरला जामठा येथील स्टेडियमवर विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध हा सामना खेळला जाणार आहे. नव्याने स्थापित केलेल्या एलईडी फ्लड लाइट्स अंतर्गत हा खेळ दिवस-रात्र खेळला जाईल. या स्टेडियमची क्षमता ४४ हजार प्रेक्षकांची आहे. जवळपास तीन वर्षांनंतर नागपुरात आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी सामन्याचे …

Read More »

वैष्णवी बालपांडेचे ‘एमबीबीएस’परीक्षेसाठी यश

नागपूर : वैद्यकीय अर्थात एमबीबीएस (MBBS) प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट (NEET) परीक्षेत नरखेड तालुक्यातील मोहगाव(भदाडे) येथील रहिवासी असलेल्या वैष्णवी विठ्ठल बालपांडे हिने यश मिळविले. तिला 720 पैकी 681 गुण मिळाले. देश पातळीवर 657 व्या क्रमांकावर आपले स्थान निर्धारित केले. वैष्णवीने आपल्या यशाचे श्रेय आई,वडील, शिक्षकांना दिले आहे.

Read More »

शिंदे-फडणवीसांनी मंत्री सत्तारला सुनावले… कारण? वाचा सविस्तर…

विश्व भारत ऑनलाईन : पीएम किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्यातही अशाच योजनेचा विचार सुरु असल्याचे राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार बोलले होते. मात्र,अजून निर्णय झालेला नसताना प्रसारमाध्यमांना प्रसिद्धीसाठी माहिती दिल्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना खडेबोल सुनावले. त्यामुळे प्रसिद्धीलोलुप मंत्र्यांची चांगलीच कोंडी झाली. नवे सरकार सत्तेवर आल्यापासून काही मंत्र्यांनी प्रसिद्धीसाठी दररोज नवनवीन घोषणांचा …

Read More »

पावसाने पिकांचे नुकसान,’महसूल’ने करावा सर्व्हे

विश्व भारत ऑनलाईन : बुलढाणा : संग्रामपूर तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसासह वादळी वाऱ्यामुळे १० सप्टेंबर रोजी उभ्या पिकांचे नुकसान झाले होते. महसूल विभागाने या परिसरातील नुकसानीचा तात्काळ सर्व्हे करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या गावांना फटका तालुक्यातील शिवणी, सोनबर्डी, आलेवाडी, लाडणापूर, वसाळी, पिंगळी, करमोडा, चिचारी, सालवन , दयालनगर , हडियामाल, सोनाळा यासह इतर भागात विजेच्या …

Read More »

गडचिरोली : पर्लकोटा नदीला पूर, भामरागडचा संपर्क तुटला

विश्व भारत ऑनलाईन : अतिवृष्टीमुळे पर्लकोटा नदीला पूर आल्याने जिल्ह्याचे शेवटचे टोक भामरागड शहराचा जिल्हा मुख्यालयापासून संपर्क तुटला आहे. संपूर्ण जिल्ह्यात मागील 48 तासांपासून पूरस्थिती निर्माण झाली असून ८ मार्ग बंद झाले आहेत. बंद मार्ग गडचिरोली-गुरवाळा, माडेमुल-रनमुल,चांदाळा-कुंभी,धानोरा-सोडे,पेंढरी-पाखांजुर,साखरा-कारवाफा,लाहेरी-बिनागुंडा,आलापल्ली -ताडगांव-भामरागड. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यभर अतिवृष्टी होत असल्याने पूरस्थिती निर्माण होत आहे. गडचिरोली जिल्ह्यातही रविवारपासून सतत मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे गोदावरी, प्राणहिता …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबादेत, पैठणला सभा

विश्व भारत ऑनलाईन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सोमवारी औरंगाबाद दौऱ्यावर येणार आहेत. मंत्रिमंडळ बैठकीनंतर आज दुपारी साडेबारा दरम्यान ते शहरात दाखल होतील. त्यानंतर ते मंत्री संदीपान भुमरे यांचे मतदारसंघ पैठणमध्ये सभा घेतील. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री दुसऱ्यांदा औरंगाबादच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे शिंदे गटाकडून त्यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. असा कार्यक्रम दुपारी 12 दरम्यान शिंदे हे …

Read More »

निवडणूक,अतिवृष्टीवर आज मंत्रिमंडळ बैठक

मुंबई : शिंदे- फडणवीस सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची आज सकाळी 10 वाजता बैठक होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळाची बैठक होऊ शकली नाही. आज सकाळच्या सत्रात ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत राज्याच्या नवीन पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. राज्यातील अनेक भागात पावसाने हाहाकार माजवला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी पूर, जमिनीला भेगा पडणे, …

Read More »

आज सर्वोच्च न्यायालयात २०० जनहित याचिकांवर सुनावणी

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात आज, सोमवारी (दिनांक 12) तब्बल २०० हून अधिक जनहित याचिकांवर सुनावणी घेण्यात येईल.नागरिकत्व कायद्यासह (सीएए) अन्य काही महत्त्वाच्या याचिकांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर सोमवारच्या कामकाज यादीत जनहित याचिकांचा समावेश आहे. सरन्यायाधीश उदय लळित यांच्या खंडपीठासमोर ‘सीएए’वरील याचिकांची एकत्रित सुनावणी होणार आहे. २०१९मध्ये न्यायालयाने सीएएअंतर्गत कार्यवाही थांबवण्यास नकार देत केंद्र सरकारला नोटीस बजावली होती. गेल्या …

Read More »