गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर विभागातील वृक्षारोपण घोटाळ्यात दोन कार्यकारी अभियंत्यांसह १३ अधिकाऱ्यांवर दोषारोप निश्चित करण्यात आले. परंतु, ११८ दिवसांनंतरही विभागीय चौकशी तसूभरही पुढे सरकलेली नाही. किंबहुना चौकशीची जबाबदारी अद्याप कोणत्याच अिधकाऱ्याकडे साेपवण्यात आलेली नाही. त्यामुळे न लावलेल्या झाडांचा निधी पचवणारे अधिकारी मोकाटच आहेत. माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ३३ कोटी वृक्षारोपण अभियानाला हरताळ फासण्याचे …
Read More »संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेसंदर्भात मोठी बातमी : वाचा
राज्यात संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेस पात्र ठरण्यासाठी लाभार्थ्यांना 21 हजार रुपये उत्पन्न मर्यादा आहे. ती आता 50 हजार रुपये करण्यासाठी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर केला जाईल, अशी माहिती विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिली. संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेसाठी 21 हजार रुपयांच्या आत उत्पन्न असलेल्यांना पात्र ठरविले जाते. त्यामुळे या योजनांमधील लाभार्थी कमी होत आहेत. निराधार महिलांना …
Read More »IAS सुनील केंद्रेकर यांच्याविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार : केंद्रेकरांची ईडी चौकशी सुरु
शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी तत्कालीन औरंगाबाद विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील 10 लाख शेतकऱ्यांचे एक सर्वेक्षण केले होते. ज्यात एक लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार सुरु आहे, असा अहवाल सरकारकडे देण्यात आला. दरम्यान खळबळजनक अहवालाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटताना पाहायला मिळाले. तर यावरून आता राजकीय प्रतिकिया देखील येत आहे. या अहवालावरच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट …
Read More »पीडब्लूडी नागपुरात अजित पवारांना देणार पोलीस आयुक्ताचा बंगला
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नागपुरातील मुक्काम अनिल देशमुख यांच्या खाजगी निवासस्थानाशेजारी असेल. सुरक्षेच्या दृष्टिकोणातून नागपुरातील सहपोलीस आयुक्तांचा बंगला अजित पवार यांना देण्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा एकमत झालंय. याबाबतचा प्रस्ताव पाठवल्याचा माहिती आहे. PWD चा ३१/१ हा बंगला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या खाजगी निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर आहे. राज्यात सध्या दोन उपमुख्यमंत्री आहेत. पण उपराजधानीत उपमुख्यमंत्र्यासाठी देवगिरी हा एकच बंगला …
Read More »नागपुरात आरटीओ अधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल : सहकारी महिलेने दिली तक्रार
नागपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील महिला कर्मचाऱ्याने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आरटीओ कार्यालयात खळबळ उडाली आहे. सोमवारी यात रात्री उशीरा सीताबर्डी पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. बर्डी पोलिस ठाण्यात भादंवि कलम 355 ए, 509, 294, 506 नुसार आणि अॅट्रासिटी कायद्याच्या कलम 3 (1) (आर), 3 (1) (एस), 3 (2) (व्हीए) नुसार गुन्हा …
Read More »भारी अनियमिता और भ्रष्टाचार के चलते हजारीबाग जिले में सोनपुर नदी पुल धराशाई का खतरा।
भारी अनियमितता और भ्रष्टाचार के चलते हजारीबाग जिले में सोनपुर नदी पुल धराशाई का खतरा? सीबीआई जांच-पड़ताल और कार्यवाई की मांग टी आर सनोडिया शास्त्री पटना। बिहार राज्य के हजारीबाग जिले मे जर्रजर अवस्था मे सोनपुर नदी पुुल निर्माण की सीबीआई जांच पड़ताल की मांग की जा रही है। हजारीबाग जिले मे स्थित सोनपुर नदी का पुल निर्माण में भारी …
Read More »राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे निलंबित
राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांना निलंबित करण्यात आले आहे. शिक्षण विभागात नाेकरी लावण्याच्या आमिषाने उमेदवारांकडून त्यांनी पैसे घेतले. तसेच नाेकरी न लावता फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दखल करण्यात आला होता. फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल पाच महिन्यांनंतर राज्य शासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. प्राप्त माहितीनुसार,राज्य शिक्षण परिषदेचे दोन अध्यक्षांना टीईटी घोटाळ्यात अटक झाल्यानंतर शैलजा दराडे यांची त्या जागी …
Read More »नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी केली शेतात रोवणी : ट्रॅक्टर चालवून केली चिखलणी
नागपूर जिल्ह्यात जवळपास ८६ हजार हेक्टरवर भाताची लागवड होणार आहे. भाताची रोवणी आणि त्याआधी शेताची मशागत याचा प्रत्यक्ष अनुभव जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी घेतला. तंत्रज्ञानातील बदल समजून घेऊन त्यांनी जिल्ह्यामध्ये श्री पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे. पारशिवणी तालुक्यातील कान्हादेवी येथे राम दशरथ लांजेवार यांच्या शेतावर श्री पद्धतीने भात लागवड करण्यात आली. जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी स्वतः धानाच्या बांधीत …
Read More »महसूलच्या 38 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल : बनावट दस्त तयार करून जमीन खरेदी-विक्री
बनावटरित्या महार वतन हाडोळा इनाम जमिनीचे कागदपत्रे तयार करुन जमिनीची खरेदी-विक्री केल्याचे आढळल्याने अहमदनगरचे तत्कालीन अपर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार,सहाय्यक दुय्यम निबंधक,मंडळ अधिकारी तलाठ्यासह एकूण 38 जणांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. एसीबीच्या या कारवाईमुळे अहमदनगर जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली आहे. काय आहे प्रकरण? नगर शहराजवळील वडगाव गुप्ता शिवारातील (गट क्रमांक 203 क्षेत्र 2 हेक्टर 97 आर) एक …
Read More »अजित पवार उपमुख्यमंत्री होताच IAS अधिकाऱ्यांच्या जंबो बदल्या
उपमुख्यमंत्री अजित पवार होताच शासनाने आज २१ जुलै रोजी राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून यात गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, अहेरी प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी अंकित, प्रकल्प अधिकारी, ITDP, गडचिरोली -सह-सहाय्यक जिल्हाधिकारी गडचिरोली डॉ. मैनाक घोष, प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी एटापली SDO, पो. भारमरागड शुभम गुप्ता यांचा समावेश आहे. कुमार आशीर्वाद यांची सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून, अंकित यांची …
Read More »
विश्वभारत News Website