नागपूर : अकोला, बुलढाणा जिल्ह्याच्या विविध भागात कपाशीच्या पिकांवर गुलाबी बोंडअळी आढळून आली आहे. आता त्या पाठोपाठ सोयाबीनची पिकेही किड रोगाच्या कचाट्यात सापडत आहे. अनेक भागात ऐन शेंगा भरण्याच्या काळातच सोयाबीनवर कीड रोगाचा हल्ला होत असल्याने पानांची अक्षरश चाळणी झाली आहे. विविध जिल्ह्यांत गुलाबी बोंडअळी आढळून आल्यानंतर सोयाबीनवर चक्रीभुंगा आढळून येत आहे. चक्रीभुंग्याचा प्रादूर्भाव वाढल्यास कीडग्रस्त झाडास कमी शेंगा लागतात. …
Read More »औरंगाबादेत ‘स्वाइन फ्लू’चा धोका!
औरंगाबाद : शहरात कोरोनानंतर आता स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. असे असताना मात्र महापालिकेने स्वाइन फ्लूसंदर्भात चाचण्या घेतल्याच नसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, स्वाइन फ्लू व कोरोना संसर्गाची लक्षणे सारखीच आहेत. याविषयी विचारणा करताच आता शनिवारपासून चाचण्या घेतल्या जातील, असे महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले. कोरोना पाठोपाठ राज्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने …
Read More »चौकशी प्रलंबित, तरीही पदोन्नतीचा प्रस्ताव
– मोहन कारेमोरे मुंबई : जळगावच्या तत्कालीन एका तहसीलदाराविरोधात विभागीय चौकशी प्रलंबित असताना त्यांचा उपजिल्हाधिकारी पदोन्नतीसाठी प्रस्ताव विभागीय आयुक्ताकडून मागितला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाचे महसूल व वन विभागाचे सहसचिव डॉ. माधव वीर यांनी त्यांचा उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती देण्यासाठी विभागीय आयुक्तांकडून प्रस्ताव मागवला आहे, हे विशेष. असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी केला आहे. त्यासंदर्भात गुप्ता …
Read More »जायकवाडी धरणाजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा
औरंगाबाद : जायकवाडी धरणाच्या मुख्य प्रवेशद्वारातून गुरुवारी २.५ फूट उंचावून पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. शुक्रवारी सायंकाळी आवक वाढल्याने यंदा पहिल्यांदाच २७ पैकी पाच आपत्कालीन दरवाजांसह २५ दरवाजे ४ फुटांनी उंचावून ७९ हजार १२४ क्युसेक विसर्ग गाेदावरीपात्रात सुरू आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जायकवाडीचा पाणीसाठा सध्या ९८.३५ टक्क्यांवर आहे. शुक्रवारी सकाळी धरणाचे १० ते २७ असे …
Read More »माहेरवाशीण गौराईंचे आगमन
अमरावती : ‘आली आली गौराई, सोन्यारूनप्याच्या पावलानं, आली आली गौराई, धनधान्याच्या पावलानं,’ शनिवारी सोनपावलांनी माहेरवाशीण ज्येष्ठा गौरींचे आगमन होणार आहे.गौरींच्या स्वागतासाठी महिला मंडळी सज्ज झाल्याचे दिसतेय. मुहूर्त कोणता? गणपती मांगल्याचे, तर महालक्ष्मी समृद्धीचे प्रतिक आहे.तिच्या प्रतिष्ठापनेनंतर घराघरामध्ये मांगल्य, सुख, समृद्धी, आनंद टिकून राहतो, अशी भाविकांची भावना आहे. माहेरवाशीण असलेल्या गौराई अनेक ठिकाणी पिढ्यापिढ्या बसवल्या जातात, तर काही ठिकाणी हौस म्हणून, …
Read More »काँग्रेसचे आमदार जाणार भाजपात! फडणवीस-चव्हाण यांची भेट
मोहन कारेमोरे मुंबई : सेनेपाठोपाठ आता काँग्रेसला खिंडार पडण्याची शक्यता आहे. काँग्रेसचा एक गट भाजपमध्ये जाण्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या साऱ्या शंका-कुशंकांमध्ये काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याचे वृत्त आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात काँग्रेसचे 2 माजी मंत्री शपथ घेऊ शकतात. यातील एक जण राज्याचा मुख्यमंंत्री राहिलेला आहे. तर, एक जण माजी …
Read More »नाशिक, नगरमध्ये ढगफुटी! शेतीचे नुकसान
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात आज शुक्रवारी सकाळपासून ढगफुटी सारखा पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे नुकसान झाले असून काहींच्या घराची मोडतोड झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातही पावसाने कहर केला आहे. काही ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झालेला आहे. सप्टेंबर मध्ये आणखी पाऊस वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात पाऊस असमाधानकारक आहे. औरंगाबाद मधील सर्वच गावातील शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा …
Read More »नागपुरात ‘स्वाईन फ्लू’चे २० रुग्ण व्हेंटिलेटरवर
नागपूर : नागपुरात कोरोनाचा प्रकोप आटोक्यात आला, मात्र ‘स्वाईन फ्लू’ची दहशत वाढली आहे. पण प्रशासनाकडून नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना होत नसल्यामुळेच व्हेंटिलेटवरील रुग्णांची संख्या वाढत आहे. मागील २४ तासांत विविध रुग्णालयांत नवीन १७ स्वाइन फ्लूबाधितांची भर पडली आहे. विविध रुग्णालयात १६७ रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत, तर २० रुग्ण व्हेंटिलेटवर आहेत. महापालिकेच्या रुग्णालयात स्वाइन फ्लू बाधितावर उपचाराची यंत्रणा नाही. मेडिकल आणि मेयो, …
Read More »मंत्रीमंडळ विस्तार ऑक्टोबरमध्ये? नाराजीची भीती
– मोहन कारेमोरे मुंबई : मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्ताराला ऑक्टोबर महिना उजाडण्याची शक्यता आहे. मंत्रीमंडळात स्थान न मिळालेल्या नाराजांना १५ सप्टेंबरपर्यंत मंत्री करण्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. पण, विस्ताराला होणारा विलंब लक्षात घेता नाराजी उघडपणे दिसण्याची शक्यता आहे. शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर ३८ दिवसांनी मंत्र्यांचा शपथविधी झाला. त्यात शिंदे गटातील काही आमदारांच्या नावावर फुली मारली गेल्याने …
Read More »अमरावती शहरात आढळले बिबट्याचे बछडे
अमरावती : शहरातील महादेव खोरी नजीकच्या जंगलात गुरुवारी दुपारी बिबट्याचे दोन बछडे दिसले. त्यानंतर नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. बछड्यांना वनविभागाच्या पथकाने सुरक्षितरित्या ताब्यात घेतले. त्यांना वडाळी येथील वन उद्यानात ठेवण्यात आले आहे. महादेव खोरी परिसरात यापूर्वीही बिबट्याचा वावर दिसून आला आहे. जवळ असलेल्या पोहरा-मालखेडच्या जंगलाचा हा भाग असल्याचे कळते. तर, बछडे दिसल्यानंतर लोकांनी आरडाओरड केल्याने बिबट मादी पळून गेली. …
Read More »
विश्वभारत News Website