Breaking News

क्राईम

वाळूचा ट्रक सोडण्यासाठी लाच : नायब तहसीलदार अटकेत

विश्व भारत ऑनलाईन : वाळूचा ट्रक सोडण्याच्या प्रकरणात नायब तहसीलदाराला १८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी सायंकाळी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तहसील कार्यालयात केली. शंकर महादेवराव श्रीराव (५४) असे लाचखोर नायब तहसीलदाराचे नाव आहे. अचलपूर तहसीलच्या हद्दीतून वाळू घेऊन जाणारा एक ट्रक श्रीराव यांनी २ ऑक्टोबरला पकडला होता. त्यावेळी कारवाई न करण्यासाठी त्यांनी ट्रक मालकाला …

Read More »

5G च्या नावाने फसवणूक, तुम्हालाही ‘हा’ मेसेज आल्यास सावधान

विश्व भारत ऑनलाईन : देशात 5G सेवा सुरु झाली.या सेवेची घोषणा होताच एअरटेल आणि जिओ या दोन्ही कंपन्यांनी निवडक शहरांमध्ये 5G सेवेला सुरुवात केली आहे. यानंतर ग्राहकांची देखील स्मार्टफोनमध्ये 5G सेवा सुरु करण्याची लगबग सुरु झाली.या संधीचा फायदा घेत काही सायबर चोरट्यांनी फेक मेसेज पाठवत, ग्राहकांना गंडा घालायला सुरुवात केली आहे. त्यामुळे तुम्हालाही असे मेसेज येत असतील तर वेळीच सावध …

Read More »

वाळूमाफीयांकडून तहसीलदारांना ट्रॅक्टरने चिरडण्याचा प्रयत्न ; आठ आरोपींविरूद्ध गुन्हा

विश्व भारत ऑनलाईन : वाळूमाफीयांनी शासकीय कामात अडथळा आणण्यासह तहसीलदार व पथकाच्या अंगावर ट्रॅक्टर नेण्याचा प्रयत्न केला. अकोला जिल्ह्यात ही घटना घडली. पथकाला धक्काबुक्कीही करण्यात आली. या प्रकरणी अकोट पोलीस ठाण्यात आठ आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अकोला-अकोट मार्गावर उगवा गावाजवळ मोर्णा नदीपात्रातून वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती तहसीलदार सुनील पाटील यांना मिळाली. तहसीलदारांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठले. यावेळी …

Read More »

सेल्फीचा नाद : एकाच कुटुंबातील चार जणी बुडाल्या

विश्व भारत ऑनलाईन : सेल्फी घेण्याचा नाद कधी आनंद तर कधी दुःख तयार करतो. असाच सेल्फीचा नाद पुन्हा एकदा जीवावर बेतला आहे. सेल्फी घेण्याच्या नादात एकाच कुटुंबातील चार जणी बुडाल्या आहेत. ठाणेजवळील विरारच्या वैतरणा खाडी बंदरावर ही घटना घडली आहे. दोन महिलांना वाचविण्यात यश आले असून दोघींचा दुर्दैवी मृत्यू झालाय. सुट्टीच्या दिवशी अनेक जण फिरण्यासाठी बाहेर पडत असतात. पण यावेळी …

Read More »

आयएएस अधिकाऱ्याला अटक, तर एक जिल्हाधिकारी बेपत्ता… वाचा काय आहे प्रकरण…

विश्व भारत ऑनलाईन : सक्तवसुली संचालनालयाने (ED) छत्तीसगढमधील आयएएस अधिकारी समीर विश्नोई यांच्यासह दोघांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटक केली. कारवाईनंतर राज्यातील अधिकारी आणि नेते अवैध कोळसा वाहतुकीतून दिवसाला तब्बल दोन ते तीन कोटी उत्पन्न मिळवत असल्याचा दावा ईडीने केलाय. समीर विश्नोई आणि त्यांच्या पत्नीकडून ४७ लाखांची बेहिशेबी रोख आणि ४ किलो सोन्याचे दागिने जप्त केले. प्रकरणात ईडीने आत्तापर्यंत साडेचार कोटींची …

Read More »

सायबर गुन्हेगार : आता ‘पेन्शनर्स’ लक्ष्य ; ‘ओटीपी’ सांगताच रिकामे होते खाते

विश्व भारत ऑनलाईन : सायबर गुन्हेगारांनी युवकांना फसविल्याच्या घटना बऱ्याच घडल्या आहेत. आता सायबर गुन्हेगारांनी आपला मोर्चा आयुष्याच्या संध्याछायेत राहणाऱ्या वृद्ध आणि सेवानिवृत्तीधारकांकडे वळविला आहे. निवृत्तांशी संपर्क साधून निवृत्तीवेतन संचालनालयातून बोलत असल्याचे भासवून त्यांचा ‘ओटीपी’ मिळवून खात्यातील संपूर्ण रक्कम क्षणार्धात ‘गायब’ करायची, अशी पद्धत या निष्णात सायबर गुन्हेगारांनी अवलंबिली आहे. सायबर गुन्हेगारांकडून निवृत्ती वेतनधारकांचे जीवन प्रमाणपत्र ‘ऑनलाइन अपडेट’ करण्यासाठी संपर्क …

Read More »

तलाठी एसीबीच्या जाळ्यात ; टिप्पर, ट्रॅक्टर साेडण्यासाठी मागितले पैसे

विश्व भारत ऑनलाईन : गिट्टीची वाहतूक करताना जप्त टिप्पर आणि ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी तसेच पुन्हा नियमित वाहतूक करु द्यावी यासाठी एका वाहतूकदाराकडून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज कोरची तालुक्यातील बेतकाठी येथील तलाठी नरेंद्र रामचंद्र ठाकरे(४४) यास रंगेहाथ पकडून अटक केली. तक्रारकर्ता ट्रॅक्टर आणि टिप्परद्वारे गिट्टीची वाहतूक करतो. १० ऑक्टोबरला वाहतुकीदरम्यान त्रुटी आढळल्याने तलाठी …

Read More »

नागपुरात 25 कोटींची फसवणूक, तर कुठे 2 कोटींचा दरोडा

विश्व भारत ऑनलाईन : नागपूर पोलिसांनी २५ कोटींहून अधिक रकमेच्या फसवणुकेचे हायप्रोफाईल प्रकरण उघडकीस आणले आहे. या प्रकरणाचा पर्दाफाश नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने केला आहे. नागपुरातील सोशल मीडियाचे तज्ज्ञ म्हणून ओळखले जाणारे अजित गुणवंत पारसे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अजित गुणवंत पारसेने डॉक्टरांना साडेचार कोटींचा गंडा घातला आहे असंही समोर आलं आहे. डॉक्टरला गंडा नागपूर शहरातील एका …

Read More »

दोघा बहिणींचा नोकरीसाठी 16 तरुणांना गंडा

विश्व भारत ऑनलाईन : जिल्हा शासकीय रुग्णालयात कायमस्वरूपी नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन दोघ्या सख्ख्या बहिणींनी सोळा तरुणांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी नाशिक शहरातील भद्रकाली पोलिस ठाण्यात संशयित दोन्ही बहिणींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. अरबाज सलिम खान (24, रा. खडकाळी) या तरुणाने पोलिसांकडे फसवणुकीची फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, संशयित फरिन जुल्फेकार शेख आणि जकीय जुल्फेकार शेख (दोन्ही …

Read More »

गदा चोरण्यापूर्वी घेतले हनुमानाचे दर्शन : नागपूरजवळील कन्हानमधील घटना

विश्व भारत ऑनलाईन : नागपूर जिल्ह्यातील कन्हान येथील चंद्रीका बाजाराजवळ प्रसिद्ध हनुमान मंदिर आहे. या मंदिरातील हनुमानाची पितळेची गदा एक युवक चोरून घेऊन गेल्याने खळबळ माजली आहे. चोरीचा हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झालाय. चोरी करण्यापूर्वी त्या युवकाने हनुमानाला नमस्कार केला, तिथे ठेवलेला प्रसादही ग्रहण केला. आणि नंतर आणलेल्या झोळीत गदा घेऊन निघून गेला. दिवसाढवळ्या मंदिरात झालेल्या या चोरीच्या घटनेने …

Read More »